२ मे २०११ रोजी अमेरिकेतील नेव्ही सीलच्या एका पथकाने जगातील ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवादी, अल-कायदाचा संस्थापक ओसामा बिन लादेनला गोळ्या घालून ठार केले होते. या ऑपरेशनचे नाव होते ‘नेपच्यून स्पीयर.’ ११ सप्टेंबर २००१ च्या वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ल्याचा सूत्रधार क्रूरकर्मा लादेनला अमेरिकन सैन्याने आपल्या ४० मिनिटांच्या ऑपरेशनमध्ये संपवले. या ऑपरेशनचे नेतृत्व अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी केले होते. हा वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याचा अमेरिकेने घेतलेला बदलाच होता. एकेकाळी अमेरिकेचा मित्र असणारा लादेन कट्टर शत्रू कसा झाला? ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवाद्याचा शोध नेमका कसा घेण्यात आला? आणि ऑपरेशन ‘नेपच्यून स्पीयर’ काय होते? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

मित्र ते कट्टर शत्रू

१९५७ मध्ये सौदी अरेबियातील एका धनाढ्य बांधकाम कंपनीच्या कार्यकारी अधिकार्‍याच्या घरात ओसामा बिन लादेनचा जन्म झाला. ओसामा बिन लादेन नेहमीच अमेरिकेचा कट्टर शत्रू नव्हता. १९८० च्या दशकात अफगाणिस्तानवर सोव्हिएत आक्रमणादरम्यान, त्याने कम्युनिस्ट आक्रमकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिकन लोकांबरोबर काम केले.

police registered two cases over bomb rumors on plane pune
विमानात बाँम्बची अफवा; पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल, अफवा पसरविण्याचे प्रकार वाढीस
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Gulmarg Terrorist Attack
Gulmarg Terrorist Attack : काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला; २ जवान शहीद, २ कुली ठार, ३ जवान जखमी
Jammu and Kashmir Terrorist Attack CCTV Video
काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा CCTV Video समोर; गांदरबलमध्ये ‘त्या’ रात्री काय घडलं?
z morh project attacked by terrorists in kashmir
विश्लेषण : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा झी-मोर्ह प्रकल्पावर हल्ला… हा प्रकल्प संपर्क सुविधेसाठी महत्त्वाचा का?
nia begins investigation in ganderbal terror attack search operations Jammu and Kashmir
काश्मीरमध्ये एनआयएकडून तपास सुरू; सुरक्षा दलांची शोधमोहीम; देशभरात संतप्त प्रतिक्रिया
Farooq Abdullah
काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर फारुख अब्दुल्ला आक्रमक, पाकिस्तानला इशारा देत म्हणाले…
Gurpatwant Singh Pannun Threat Call to Air India Flight
दहशतवादी पन्नूकडून भारतीय विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, तारीखही सांगितली; आंतरराष्ट्रीय प्रवाशांना म्हणाला…
११ सप्टेंबर २००१ च्या वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ल्याचा सूत्रधार क्रूरकर्मा लादेनला अमेरिकन सैन्याने आपल्या ४० मिनिटांच्या ऑपरेशनमध्ये संपवले. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : रशियाकडून कच्चे तेल घेऊन भारताने १३ अब्ज डॉलर्सची बचत कशी केली?

माजी ब्रिटीश परराष्ट्र सचिव रॉबिन कुक यांनी २००५ मध्ये ‘द गार्डियन’मध्ये लिहिले, “८० च्या दशकापासून त्याला सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीची (सीआयए) मदत मिळाली. अफगाणिस्तानवरील रशियन ताब्याविरुद्ध मोहीम पुकारण्यासाठी सौदींनी त्याला आर्थिक मदत पुरवली होती. अल-कायदाची स्थापना करतेवेळी त्याच्याकडे हजारो मुजाहिदीनांची माहिती होती, ज्यांना रशियन लष्कराला पराभूत करण्यासाठी सीआयएच्या मदतीने भरती करण्यात आले होते आणि प्रशिक्षण दिले गेले होते.”

पण, १९९० च्या दशकात परिस्थिती बदलली. इराकच्या सद्दाम हुसेनने कुवेतवर आक्रमण केले आणि कुवेत ताब्यात घेतले. आक्रमणानंतर ओसामा बिन लादेनने त्याचे मुजाहिदीन सैनिक पाठवून सौदी अरेबियाला मदत करण्याची ऑफर दिली. परंतु, राजाने ती ऑफर नाकारली आणि त्याऐवजी अमेरिकन सैन्याची मदत घेतली. पाच लाखांहून अधिक अमेरिकन सैन्य अरबी द्वीपकल्पात तैनात केल्याने, ओसामा बिन लादेनने गैर-मुस्लिमांबद्दल नाराजी व्यक्त केली. त्याने सौदी अरेबियाच्या शासकांना मुर्तद्द (धर्मत्यागी) म्हणून त्यांचा निषेध केला आणि अमेरिकेच्या विरोधात जिहादची घोषणा केली.

बिन लादेनने केलेले हल्ले

१९९२-९३ पर्यंत लादेन आणि त्याच्या अल-कायदाने सोमालियामध्ये १९९३ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला करणार्‍या आणि सुदानमधील इस्लामिक क्रांतीला पाठिंबा देणार्‍या अमेरिकन विरोधी अतिरेक्यांना प्रशिक्षण दिले. १९९६ पर्यंत लादेन सर्वात वाँटेड दहशतवाद्यांपैकी एक होता. त्याने अफगाणिस्तानच्या तालिबानमध्ये आश्रय घेतला. १९९८ मध्ये त्याने केनिया आणि टांझानियामधील अमेरिकन दूतावासांवर बॉम्बस्फोट घडवून आणले, ज्यात २२० लोकं मारले गेले. २००१ मध्ये अल-कायदाने वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला, ज्यात सुमारे तीन हजार लोक मारले गेले.

२००१ मध्ये अल-कायदाने वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

दशकभर चाललेला शोध

११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर लगेचच, अमेरिकन सरकारने ओसामा बिन लादेनचा शोध सुरू केला. ‘पीटर बर्गन, मॅनहंट : द टेन-इयर सर्च फॉर ओसामा बिन लादेन (२०१२)’ मध्ये लिहिले आहे की, सीआयएचे संचालक जॉर्ज टेनेट यांनी ११ सप्टेंबर रोजी दुपारी अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांची भेट घेतल्यावर सांगितले की, हल्ले ओसामा बिन लादेनने केल्याचा संशय आहे.”

पण, कुणालाच लादेनचा नेमका ठावठिकाणा माहीत नव्हता. बुश प्रशासनाने ताबडतोब त्याला अमेरिकन्सकडे सोपवण्याची मागणी केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अशा प्रकारे ऑक्टोबर २००१ मध्ये, अमेरिकेने अफगाणिस्तानवर आक्रमण केले. तालिबानचा पाडाव करण्यासाठी आणि अल-कायदाला मुळापासून संपवण्यासाठी अमेरिकेने हे आक्रमण केले. परंतु, आक्रमणामुळे अमेरिका ओसामा बिन लादेनला शोधू शकला नाही. अमेरिकेच्या लक्षात आले की, लादेनला शोधण्यासाठी आक्रमणांची नाही तर गुप्त ऑपरेशन्सची गरज आहे. अत्यंत अत्याधुनिक प्रणाली वापरून अमेरिकेने पाळत ठेवण्याचे काम सुरू केले आणि गुप्त ऑपरेशन्सची तयारी केली.

२००७ मध्ये, सीआयएला लादेनच्या सर्वात विश्वासूचे नाव कळाले, ज्याचे नाव होते अहमद अल-कुवैती. तो उत्तर पाकिस्तानमध्ये रहात होता. त्याच्या ठिकाणाचे अंदाजे क्षेत्र शोधण्यासाठी एजन्सीला आणखी दोन वर्षे लागली. त्यानंतर इस्लामाबादपासून दोन तासांच्या अंतरावर असलेल्या अबोटाबादच्या गॅरिसन शहरामध्ये त्याचे घर शोधण्यासाठी आणखी एक वर्ष लागले. एजन्सीच्या शोधात असे लक्षात आले की, संबंधित व्यक्तीने आपल्या निवासस्थानी कुणाला तरी आश्रय दिला आहे, तो ओसामा बिन लादेन असावा अशी शंका एजन्सीला होती. मात्र, २०१० च्या उत्तरार्धात हे निश्चित झाले की, तो ओसामा बिन लादेन होता.

ऑपरेशन ‘नेपच्यून स्पीयर’

लादेनला ठार मारण्याचे ऑपरेशन इतके सोपे नव्हते. अबोटाबाद हे पाकिस्तानच्या लष्करी आस्थापनाच्या अगदी केंद्रस्थानी आहे. ओसामा बिन लादेनने जिथे आश्रय घेतला होता, ते स्थान एका शांत उपनगरात होते. त्या गावात मोठ्या संख्येने निवृत्त पाकिस्तानी लष्करी कर्मचारी राहतात. लादेन रहात असलेल्या ठिकाणापासून १.३ किमी अंतरावर पाकिस्तान मिलिटरी अकादमी होती. शहरात लष्करी विमानतळही होते.

अबोटाबादमध्ये लादेन याच घरी लपून होता. (छायाचित्र-रॉयटर्स)

बिन लादेनच्या संरक्षणात पाकिस्तानी आस्थापनांचा सहभाग असू शकतो अशी शंका अमेरिकन सैन्याला होती. त्यामुळे अमेरिकेने १-२ मे रोजी मध्यरात्री पाकिस्तानच्या आत शिरून गुप्त ऑपरेशन करण्याचे ठरवले. १ मे च्या रात्री, ७९ अमेरिकन सैनिकांना घेऊन चार हेलिकॉप्टर अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या जलालाबाद हवाई तळावरून निघाले. स्थानिक वेळेनुसार ते हेलिकॉप्टर्स २ मे रोजी पहाटे १ वाजता अबोटाबाद येथील कंपाउंडमध्ये उतरले. एका हेलिकॉप्टरची मागची बाजू कंपाऊंडच्या भिंतीवर आदळली आणि हेलिकॉप्टर क्रॅश झाले. त्यामुळे वेळेवर सैन्याने योजना बदलली. घराच्या छतावर उतरण्याऐवजी सर्व सैनिक जमिनीवर उतरले आणि घरात शिरले.

हेही वाचा : कैद्यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार पण मतदानाचा नाही, असे का? कायदा काय सांगतो?

बिन लादेनचा विश्वासू अबू अहमद अल-कुवैती यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर सैनिक मुख्य इमारतीत घुसले, जिथे त्यांनी अल-कुवैतीचा भाऊ आणि बिन-लादेनचा मुलगा खालिद यांना ठार मारले. शेवटी, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचताच ओसामा बिन लादेन सापडला. त्यांनी लादेनच्या चेहर्‍यावर गोळ्या झाडल्या आणि त्याला ठार मारले. क्षणाचाही विलंब न करता सैनिकांनी लादेनचा मृतदेह घेऊन सर्व सैनिक हेलिकॉप्टरने बाहेर पडले. अवघ्या काही मिनिटांतच पाकिस्तानी सैन्य कंपाऊंडमध्ये पोहोचले. नेव्ही सीलच्या कारवाईनंतर १२ तासांच्या आत बिन लादेनला अरबी समुद्रात दफन करण्यात आले.