ऑस्कर पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा आणि मानाचा पुरस्कार समजला जातो. ९६वा ऑस्कर सोहळा नुकतचं कॅलिफोर्नियामधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. यंदा ओपनहायमर चित्रपट हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. ओपनहायमरने तब्बल सात पुरस्कार जिंकले. सर्वोत्कृष्ट चित्रपटासह सर्वोत्कृष्ट अभिनेता किलियन मर्फी, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनिअर, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन, फिल्म एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी, ओरिजनल स्कोअर असे सात पुरस्कार एकट्या ओपनहायमरने जिंकले.

सोहळ्यादरम्यान दिवंगत भारतीय कला दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन डिझायनर नितीन चंद्रकांत देसाई यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. खरे तर अमेरिकन चित्रपटांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी हा सोहळा सुरू करण्यात आला होता. परंतु आज भारतासह जगभरातील चाहते, अभ्यासक या पुरस्कार सोहळ्याची वाट पाहतात. जगभरात ऑस्कर पुरस्काराला इतकं का मानतात? ‘हा’ जगातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार कसा झाला? पुरस्कारांची सुरुवात कधी झाली? याबद्दल जाणून घेऊ.

Allu Arjun
‘पुष्पा’साठी राष्ट्रीय पुरस्कार घेताना अल्लू अर्जुन दु:खी का होता? स्वत: सांगितलं कारण
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Ranji Trophy Goa Batters Highest Ever Partnership in 90 Year Old History
Ranji Trophy: ६०६ धावांची विक्रमी भागीदारी अन् गोव्याच्या २ फलंदाजांची त्रिशतकं, रणजी ट्रॉफीच्या ९० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही
author samantha harvey wins the booker prize 2024 with orbital novel
समांथा हार्वे यांच्या ‘ऑर्बिटल’ला बुकर ; अंतराळावरील कादंबरीचा पहिल्यांदाच सन्मान
Border Gavaskar Trophy IND vs AUS Memorable Innings in Marathi
Border Gavaskar Trophy Best Innings: सचिन, द्रविड, पंत अन् बुमराहचा स्लोअर बॉल…, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासातील संस्मरणीय क्षण
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…
Border Gavaskar Trophy History Stats Records Head to Head All You need To Know About India vs Australia Test Series
Border Gavaskar Trophy: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला ‘बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी’ हे नाव का देण्यात आलं? सर्वाधिक मालिका कोणी जिंकल्यात? वाचा इतिहास
Gaitonde
कलाकारण: बाजारप्रणीत इतिहासाच्या पलीकडले गायतोंडे

ऑस्करचा इतिहास

ऑस्कर पुरस्काराची संकल्पना मांडण्यात आली, तेव्हा याचे स्वरूप इतके भव्य-दिव्य नव्हते. चित्रपट इतिहासकार डेव्हिड थॉमसन यांच्या मते, १९२७ मध्ये मीडिया फर्म मेट्रो-गोल्डविन-मेयरचे प्रमुख लुई बी. मेयर यांनी ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ची स्थापना केली. यावेळी हॉलीवूडची सकारात्मक प्रतिमा तयार करण्याचे आणि चित्रपटांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांना सोपवण्यात आले होते. तेव्हाच कला क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणार्‍यांचा सन्मान म्हणून ऑस्कर पुरस्काराची सुरुवात झाली.

१९२७ मध्ये ऑस्कर पुरस्काराचा पहिला सोहळा पार पडला. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

‘द न्यूयॉर्क टाईम्स’च्या म्हणण्यानुसार, १९२७ मध्ये ऑस्कर पुरस्काराचा पहिला सोहळा पार पडला. हा सोहळा केवळ १५ मिनिटे चालला आणि सोहळ्याचे थेट प्रक्षेपणही झाले नाही. या १५ मिनिटांच्या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक असे एकूण १२ पुरस्कार देण्यात आले होते. सर्वप्रथम ऑस्कर पुरस्काराला १९३० मध्ये रेडिओवर प्रसारित केले गेले. १९५३ सालापासून ऑस्कर पुरस्कार टीव्हीवर प्रसारित होऊ लागला. सुरुवातीला विजेत्यांच्या नावांची घोषणा तीन महिन्यांपूर्वीच करण्यात यायची. सीलबंद लिफाफ्यातील विजेत्यांच्या नावाची घोषणा १९४१ नंतर सुरू झाली.

१९५३ मध्ये पहिल्यांदा टीव्हीवर पुरस्कार कार्यक्रमाचे प्रसारण झाले, तेव्हापासून ऑस्कर पुरस्कार मनोरंजन क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट व्यक्तींचा सन्मान करणारा महत्त्वाचा कार्यक्रम ठरला. ऑस्करमधील चित्रपट तज्ञ डेव्ह कार्गर यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला सांगितले, “अकादमी पुरस्कार टीव्हीवर प्रसारित झाल्यानंतर या कार्यक्रमाचे महत्त्व अधिक वाढले.”

ऑस्कर पुरस्काराला इतकं का मानतात?

ऑस्करची नामांकन प्रक्रिया अकादमीच्या सदस्यांद्वारे ठरवली जाते. ऑस्करच्या वेबसाइटनुसार, चित्रपट व्यवसायाशी संबंधित कलाकार या अकादमीचे सदस्य असू शकतात. अकादमीच्या एकूण १८ शाखा आहेत, यात कलाकारांपासून ते लेखकांपर्यंत, प्रोडक्शन डिझाईनपासून शॉर्ट फिल्मपर्यंत सर्व शाखांचा समावेश आहे. अकादमीचे सदस्यत्व दोन प्रकारे मिळते. यात जर का, एखाद्या अभिनेत्याला किंवा दिग्दर्शकाला चित्रपटासाठी ऑस्कर नामांकन मिळाले असेल, तर त्याला सहज सदस्यत्व मिळते. परंतु ज्याला कधीही ऑस्कर नामांकन मिळालेले नाही, अशा व्यक्तिला जर का सदस्यत्व हवे असल्यास अकादमीचे दोन सदस्य त्याच्या नावाची शिफारस करतात.

ऑस्कर पटकावल्यानंतर कलाकारांचे आयुष्य पालटते. २००७ मध्ये ‘द गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता मॅट डॅमन याने याने सांगितले की, १९९७ मध्ये ‘गुड विल हंटिंग’ चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार जिंकणे त्याच्यासाठी एखाद्या स्वप्नासारखे होते. “लोकांना हे एका रात्रीतलं यश वाटतं. पण यासाठी मी अकरा वर्ष मेहनत करत होतो. पुरस्कार मिळण्याआधी कोणी माझ्याकडे ढुंकूनही पाहत नसे. ऑस्कर पटकावल्यानंतर मला ओळख मिळाली.” असे तो म्हणाला.

ऑस्कर अकादमी जगभरातील कानकोपर्‍यातील चित्रपटांना संधी देत आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास बोंगजून-हो दिग्दर्शित कोरियन चित्रपट ‘पॅरासाइट’ला ९२ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट चित्रपटासह चार ऑस्कर पुरस्कार मिळाले. याने कोरियन चित्रपटांना जगात नवीन ओळख दिली. आता लोक इतर चित्रपटांप्रमाणे कोरियन चित्रपटदेखील तितक्याच आवडीने पाहतात.

ऑस्कर पुरस्कारातील वाद

इतर पुरस्कार सोहळ्यांप्रमाणेच हा पुरस्कार सोहळादेखील वादविवादाशिवाय पूर्ण होत नाही. पक्षपातीपणा, वर्णभेद असे एक ना अनेक वाद या पुरस्कार सोहळ्यादरम्यान बघायला मिळतात.

२०१७ मध्ये पहिल्यांदा #मीटू कॅम्पेनमार्फत अनेक अभिनेत्रींनी चित्रपट निर्माता हार्वे वाइनस्टीनवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. मिरामॅक्स आणि वेनस्टीन कंपनीचे सह-संस्थापक वाइनस्टीन हॉलीवूडमधील नावाजलेले चित्रपट निर्माते आहेत. त्यांच्या प्रॉडक्शन कंपनीतील तब्बल ८१ चित्रपटांना ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. वाइनस्टीन यांच्यावर प्रतिस्पर्धी चित्रपटांबद्दल अफवा पसारविण्याचेदेखील आरोप आहेत. अकादमीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये राहून ते शक्य तितक्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही सांगण्यात येते.

हेही वाचा : ही चालकविरहीत मेट्रो चालते तरी कशी?

‘द वॉशिंग्टन पोस्ट’शी बोलताना अमेरिकन चित्रपट उद्योग विश्लेषक स्टीफन फॉलोस म्हणाले की, अकादमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेले चित्रपट वर्षभरात प्रदर्शित झालेले सर्वोत्कृष्ट चित्रपट असतीलच असे नाही. ते म्हणाले की, जितके मी पाहिले किंवा ऐकले तितके मला जाणवले की हे राजकीय नेतृत्वावरदेखील अवलंबून आहे. २०१५ मध्ये, ऑस्कर नामांकने जाहीर झाल्यानंतर #ऑस्कर्स सो व्हाईट असा हॅशटॅग ट्रेंड सुरू झाला होता. अभिनय श्रेणीतील सर्व २० नामांकने श्वेतवर्णीय कलाकारांना मिळाले होते. त्याच्या पुढील वर्षी, प्रमुख अभिनय आणि दिग्दर्शन श्रेणींमध्ये फक्त एकच नामांकित व्यक्ती श्वेतवर्णीय नव्हती. २०२० मध्ये, वर्णभेदाच्या आरोपांनंतर, अकादमीने पुरस्कारांसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे विकसित करण्याची घोषणा करण्यात आली.