पाकिस्तान सध्या राजकीय अस्थिरतेतून जात आहे. राजकीय संकटासोबतच ढासळलेली अर्थव्यवस्था, वाढती महागाई आणि अन्नधान्याचा अपुरा पुरवठा यांसारख्या समस्यांनी पाकिस्तानला ग्रासले आहे. पाकिस्तान जेव्हा जेव्हा असा संकटात सापडतो, तेव्हा भारताचा सीमाभाग असुरक्षित करण्याचा प्रयत्न होतो. पाकिस्तानी गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (ISI) कडून भारतात दहशतवादी कारवाया वाढविण्याचा धोका निर्माण झाला आहे. जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांकडून नवा गट स्थापन करण्यात आला असून त्यांना सीमेपलीकडून सर्वतोपरी मदत पाठविली जात आहे, अशी माहिती ‘उसानस फाऊंडेशन’ या संस्थेने प्रकाशित केलेल्या एका अहवालात देण्यात आली आहे. या माहितीनुसार आयएसआयने आपल्या कार्यशैलीत बदल केले असून जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात संदेशवहन आणि शस्त्रांचा पुरवठा करण्यासाठी महिला आणि मुलांचा वापर करण्यात येत आहे. ‘फर्स्टपोस्ट’ या वेबसाइटने यासंबंधीचा आढावा घेतलेला आहे.

महिला आणि मुलांचा वापर कसा होतो?

श्रीनगरमधील चिनार कॉर्प्सचे अधिकारी लेफ्टनंट जनरल अमरदीप सिंग औजला यांनी पीटीआयशी बोलताना याबाबतची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, दहशतवाद्यांकडून आता पारंपरिक संदेशवहन पद्धतीचा वापर घटला आहे. बदललेल्या कार्यशैलीनुसार दहशतवाद्यांकडून आता महिला, विधिसंघर्षग्रस्त मुले (juveniles) यांचा संदेश, शस्त्र आणि अमली पदार्थाच्या दळणवळणात वापर करण्यात येत आहे. नियंत्रण रेषेपलीकडे बसलेले लोक आता जम्मू-काश्मीरमधील शांततामय वातावरण खराब करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, त्यामुळे लष्कराला अधिक सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे.

Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर

हे वाचा >> विश्लेषण: लष्करातले हिंदू अधिकारी मुस्लिम नाव का धारण करतात? जम्मू-काश्मीरमध्ये हा पायंडा का पडला?

“सध्या महिला, मुली आणि विधिसंघर्षग्रस्त मुलांचा दहशतवादी कारवायांसाठी वाहक म्हणून वापर होत आहे, ही चिंतेची आणि जोखमीची बाब माझ्या मते निर्माण झाली आहे. लष्कराने मध्यंतरी केलेल्या काही कारवायांमधून ही बाब ध्यानात आली आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय आणि तांझीम्स (tanzeems) या अतिरेकी गटाकडून ही नवी कार्यशैली स्वीकारण्यात आली आहे. आम्ही भारताच्या इतर यंत्रणेसोबत समन्वय राखून या संकटावर मात करण्यासाठी काम करीत आहोत,” असेही औजला यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.

दहशतवाद्यांनी आपल्या कार्यशैलीत बदल केल्यामुळे मोबाइल किंवा आदी तंत्रज्ञानाचा वापर बंद झाला आहे का? असा प्रश्न विचारला असता औजला म्हणाले की, टेकइन्टचा (टेक्निकल इंटेलिजन्स) वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. तसेच दहशतवाद्यांसाठी काम करणाऱ्या ओव्हर ग्राऊंड वर्कर्सची (OGWs) लष्कराकडून धरपकड करण्यात आली आहे. त्यामुळे आता महिला, मुली आणि मुले यांचा संदेशवहनासाठी पर्यायी वापर करण्यात येत आहे.

जम्मू-काश्मीरमधील मूलतत्त्ववाद कमी करण्यासाठी लष्कर स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने काम करत आहे. या समन्वयातून ‘सही रास्ता’ (Sahi Rasta) नावाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून महिला आणि मुले यांच्यामध्ये दहशतवादाबाबत जनजागृती केली जाते. या कार्यक्रमाचे चांगले परिणामदेखील दिसून आले आहेत. काश्मीरमध्ये शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी आपण मोठा संघर्ष केला आहे. पण जर काश्मीरमध्ये चिरकाल शांतता टिकवायची असेल तर अशा छोट्या छोट्या कार्यक्रमातून भक्कम असे काम करीत पुढे जात राहिले पाहिजे, अशीही भावना लष्कर अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

पाकिस्तानचे नाव न घेता लेफ्टनंट जनरल औजला म्हणाले की, शेजारी देशाने आपले कपटी मनसुबे सोडलेले नाहीत. पीर पंजालच्या दोन्ही बाजूंनी सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्तर काश्मीरच्या माछिल सेक्टरमध्ये नुकतेच घुसखोरीचे प्रयत्न झाले, ते हाणून पाडण्यात आले आहेत.

हे वाचा >> काश्मीरमधील जी२० च्या बैठकीला कोणते देश दांडी मारणार? त्याची कारणे काय आहेत?

सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

तसेच अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, काश्मीर खोऱ्यातील सर्व सुरक्षा यंत्रणा आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्व प्रशासनाला खबरदारीचे योग्य ते उपाय राबविण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. शत्रूच्या कोणत्याही कारवाईला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीच्या घटनांमध्ये घसरण झाली असली तरी पीर पंजालच्या दक्षिणेकडे आणि पंजाबच्या प्रांतातून घुसखोरीचे काही प्रयत्न झाले आहेत. त्यामुळे आम्हाला सतर्क राहण्याची गरज असून सुरक्षेच्या उपायांबाबत कोणतीही तडजोड करून चालणार नाही, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही आमची सर्वोच्च जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्यासाठी कोणतीही कमतरता ठेवणार नाही.

संभाव्य धोक्याविषयीची आम्हाला पूर्ण कल्पना असून शांतता टिकवून ठेवण्यासाठी आम्ही आमच्या क्षमतेनुसार पूर्ण प्रयत्न करीत आहोत. सर्वांना सोबत घेऊन एकत्रित प्रयत्न केल्यामुळे कोणताही मोठा धोका न उद्भवता सामान्य परिस्थिती ठेवता येते, असेही औजला यांनी सांगितले.

दहशतवादाचे अदृश्य स्वरूप चिंतेचे कारण

औजला पुढे म्हणाले की, लष्कराने अत्यंत हुशारीने आपल्या योजना राबविल्यामुळे दहशतवाद्यांना काबूत ठेवण्यात लष्कराला यश मिळाले आहे. त्यामुळे बरेच दहशतवादी खोऱ्यातून बाहेर पडले आहेत किंवा त्यांच्या कारवाया शांत झाल्या आहेत. सध्या दहशतवादाचे अदृश्य स्वरूप हे आमच्यासाठी मोठे चिंतेचे कारण बनलेले असून त्यावर मात करण्यासाठी आम्ही संयुक्तपणे काम करीत आहोत. सध्या किती स्थानिक किंवा देशाबाहेरील किती दहशतवाद्यांची संख्या सक्रिय आहे, याचा नेमका आकडा सांगणे कठीण असले तरी मागच्या ३३ वर्षांतली सर्वात कमी संख्या आहे, हे निश्चितपणे सांगता येईल, असा विश्वासही औजला यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा >> जम्मू-काश्मीरमध्ये अजूनही सर्वकाही सुरळीत नाही; काश्मिरी पंडितांच्या संघटनेचे मोदी सरकारला तिखट प्रश्न

या वर्षी दहशतवादी हल्ले किंवा सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवादी यांच्यातील चकमकीच्या संख्येमध्ये कमालीची घट झाली आहे. त्यामुळे खोऱ्यातील सर्व क्षेत्रात शांतता प्रस्थापित होणे आणि परिस्थिती सामान्य होण्याच्या दृष्टीने हे चांगले संकेत आहेत. स्थानिक लोकांचा हिंसाचाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन कमालीचा बदलला आहे. जो अत्यंत कौतुकास्पद असून आगामी काळात तो टिकवून ठेवण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे, असेही ते म्हणाले.

सुरक्षा वातावरणातील बदलांच्या अनुसार आम्हीदेखील आमच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा केली असून अधिकाधिक लोकोत्तर योजना राबविण्यावर भर देत आहोत, अशीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मला आशा आहे की, येणाऱ्या पुढील काही दिवसांमध्ये काश्मीर खोऱ्यात शांतता आणि सामान्य परिस्थिती स्थापन करण्यात आम्ही यशस्वी ठरू. तसेच नुकतेच काश्मीर खोऱ्यात जी २० ची परिषद कोणत्याही अडथळ्याविना पार पडली. त्याबद्दल लेफ्टनंट जनरल औजला यांनी सर्व सुरक्षा दलातील समन्वयाचे कौतुक केले.