पाकिस्तानच्या शहरांतील गजबजलेल्या रस्त्यांवर ट्रॅफिक जॅममध्ये गाड्या अडकतात. परंतु, या गजबजलेल्या रस्त्यांतून काही वाहने सहजतेने एक मार्ग काढतात. जसे की, आयकॉनिक टोयोटा हिलक्स पिकअप. या ट्रकला स्थानिक पातळीवर ‘डाला’ म्हणून ओळखले जाते. हिलक्स पाकिस्तानमध्ये एक विश्वासार्ह वाहन म्हणून विकसित झाले आहे. ते आता शक्ती, प्रतिष्ठेचे आणि अगदी वर्गांने विभागलेल्या समाजात भीतीचे प्रतीक ठरत आहे. राजकारणी, उद्योगपतींपासून ते गुप्त कारवाया करणाऱ्यापर्यंत ‘हिलक्स’चा वापर सर्वत्र होताना दिसत आहे. या ट्रकचा आता स्टेटस सिम्बॉल म्हणून उल्लेख केला जात आहे. काय आहे हे पिकअप ट्रक्स? या ट्रकची मागणी वाढण्याची कारणे काय? हे ट्रक ‘स्टेटस सिम्बॉल’ कसे ठरत आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेमका हा प्रकार काय?

कराचीच्या गजबजलेल्या रस्त्यांवर हिलक्स ट्रक वाहनांच्या मागे असताना हळूच दिवे चमकावतात आणि मार्ग मोकळा करीत पुढे सरकतात. ४० वर्षीय राजकारणी उस्मान पेह्यार यांनी एएफपीला सांगितले, “वाहनाची एक प्रतिमा तयार झाली आहे, जी सूचित करते की या वाहनातून जाणारी व्यक्ती एक महत्त्वाची व्यक्ती असावी. त्यात सर्व काही आहे. अतिरिक्त सुरक्षा आणि अनेक लोकांना खुल्या कार्गो बेडवर बसण्यासाठी पुरेशी जागा आहे.” सुरुवातीला ग्रामीण अभिजात वर्गाने त्याच्या विश्वासार्हतेसाठी पसंती दर्शविलेल्या ‘डाला’ला आता शहरी व्यावसायिक मालकांमध्ये लोकप्रियता मिळाली आहे. ही एक एस्कॉर्ट वाहन म्हणून काम करत आहे. चेहऱ्यावर स्कार्फ गुंडाळलेले आणि एके-४७ ने सशस्त्र असलेले गार्ड ट्रकच्या मागे बसू शकतात. त्याच्या खिडक्या काळ्या आहेत. “हे स्टेटस सिम्बॉल आहे. लोकांच्या मागे एक किंवा दोन पिकअप असतात,” असे कराची येथील कार डीलर फहद नजीर म्हणाले.

हेही वाचा : ब्रिटनच्या महिला मंत्र्यांचे बांगलादेशमधील भ्रष्टाचार प्रकरणात नाव; या प्रकरणाचा शेख हसीना यांच्याशी काय संबंध?

पिकअपचे राजकारण

१९६८ मध्ये पहिल्यांदा बाजारात आलेल्या हिलक्सच्या २००० च्या दशकाच्या मध्यात व्हिगो मॉडेल आणि नंतर रेव्हो याने पाकिस्तानमध्ये प्रसिद्धी मिळवली. १० ते १५ दशलक्ष रुपये किंमत असणारे हे ट्रक बाजारात सर्वाधिक वेगाने विकल्या जाणाऱ्या वाहनांपैकी एक आहे. त्यांच्या किमती स्थिर राहिल्या आहेत आणि त्यांचे उत्पादक टोयोटा यांचे वर्चस्व असलेल्या बाजारपेठेत त्यांनी पुनर्विक्री मूल्य कायम ठेवले आहे. डीलर्सचे म्हणणे आहे की, फेब्रुवारीच्या राष्ट्रीय निवडणुकांमध्ये या ट्रकच्या भाड्यात वाढ झाली होती. इम्रान खानच्या पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रांतीय खासदार सज्जाद अली सुमरो म्हणाले, “मला हे माहीत आहे की, तुम्ही रेव्होशिवाय निवडणूक लढवू शकत नाही.” गुजरातच्या पूर्वेकडील शहरातही सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ पक्षाचे राजकारणी अली वाराइच यांना दोन ट्रकच्या एस्कॉर्टसह प्रवास करणे आवश्यक वाटते. ते या ट्रकचा वापर विवाहसोहळे आणि अंत्यसंस्कारांना उपस्थित राहण्यासाठी वापरतात. “या वाहनाशिवाय राजकारण जवळजवळ अशक्य झाले आहे,” असे त्यांनी ‘एएफपी’ला सांगितले. ही मूलभूत गरज झाली आहे,” असेही ते म्हणाले. ज्या राजकारण्यांकडे हे ट्रक नाहीत, त्यांचे समर्थक ट्रक असलेल्या राजकारण्यांकडे जायलादेखील तयार आहेत, असे त्यांचे सांगणे आहे.

टोयोटा हिलक्स पाकिस्तानमध्ये भीती आणि नियंत्रणाचे प्रतीक ठरत आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

पिकअप ट्रकची भीती

टोयोटा हिलक्स पाकिस्तानमध्ये भीती आणि नियंत्रणाचे प्रतीक ठरत आहे, असे कार्यकर्त्यांनी एएफपीला सांगितले. ‘डाला’चा लष्करी गुप्तचर संस्थांच्या गुप्त कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांनाही मे २०२३ मध्ये इस्लामाबादमध्ये निमलष्करी जवानांनी काळ्या डालामधून जात असताना अटक केली होती. खान यांनी नंतर पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वावर आपल्या अटकेची योजना आखल्याचा आरोप केला आणि आरोप केला की, राजकीय हेवीवेट नवाज शरीफ निवडणुकीतील विजय मिळविण्यासाठी ‘विगो डाला’चा वापर करीत आहेत.

या वाहनांचा वापर छापे टाकण्यापर्यंतही करण्यात आला आहे. लष्कराच्या राजकीय सहभागाला आव्हान देण्यासाठी ओळखले जाणारे पाकिस्तानी कवी व कार्यकर्ते अहमद फरहाद यांना एका छाप्यादरम्यान हिलक्समधून ताब्यात घेण्यात आले होते. “कधी कधी, ते ही वाहने माझ्या कारच्या आजूबाजूला किंवा मागे पार्क करतात आणि स्पष्ट संदेश देतात की, आम्ही आजूबाजूला आहोत’,” असा फरहाद यांनी खुलासा केला. “डालामुळे लोकांमध्ये एक भीतीचे वातावरण तयार होते. त्यामुळे दिवसागणिक याचा वापर वाढत आहे,” असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : १० वर्षांनंतर उलगडणार २३९ प्रवाशांसह बेपत्ता झालेल्या विमानाचे गूढ? नेमके प्रकरण काय?

त्याची भीतीदायक प्रतिमा असूनही, हिलक्स कराचीमध्ये वेगळ्या प्रकारची सुरक्षा प्रदान करते, हे शहर रस्त्यावरील गुन्ह्य़ांनी भरलेले आहे. रस्त्यावरील गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्यामुळे संपूर्ण शहरात पोलिस चौक्या वाढल्या आहेत आणि त्यामुळे बहुतेक प्रवाशांची वाहतूक मंदावली आहे. परंतु, हिलक्स चालक या गैरसोई सहजतेने टाळू शकतात. “पोलिस सामान्यत: मला थांबवत नाहीत. कारण- त्यांना वाटते की, मी असा कोणीतरी असू शकतो, जो त्यांच्यावर नकारात्मक प्रभाव टाकू शकतो किंवा त्यांना एखाद्या प्रकारे हानी पोहोचवू शकतो,” असे एका हिलक्स वाहनचालकाने स्पष्ट केले. अधिकाराचे साधन असो किंवा गुन्ह्यांविरुद्ध प्रतिबंधक साधन; हिलक्स हे एक असे वाहन आहे, जे पाकिस्तानमध्ये भीती आणि आदर या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण ठेवते.