प्राचीन काळात भारत एक समृद्ध देश होता. भारताला देण्यात येणाऱ्या अनेक उपमांपैकी एक उपमा म्हणजे ‘सोनेकी चिडियाँ’. भारताच्या समृद्धीमागील एक कारण म्हणजे भारताचा इतर देशांशी होणारा व्यापार! सातासमुद्रापलीकडे असणाऱ्या देशांशी होणाऱ्या या व्यापारामुळे भारतात समृद्धी नांदत होती. याचे उत्तम उदाहरण म्हणजे रोम आणि भारत यांच्यात होणारा व्यापार. प्राचीन भारतीय साहित्यात यवन हा शब्द अनेकदा येतो. बहुतांश अभ्यासक यवन हा शब्द ग्रीक-रोमन लोकांसाठी वापरल्याचे मान्य करतात. भारताला विस्तृत मोठी किनारपट्टी लाभलेली आहे. भारतीय इतिहासात सागरी मार्गाच्या व्यापारातील भूमिकेविषयी चर्चा करताना नेहमीच भारत- रोम संबंधाला प्राधान्य दिले जाते. परंतु भारतीय सागरी व्यापाराचा इतिहास हा केवळ इंडो- रोमन व्यापारापुरताच मर्यादित नाही. मध्ययुगीन काळात भारताच्या पूर्व किनारपट्टीवरून समुद्रमार्गे मोठ्या प्रमाणात व्यापार होत होता. या किनारपट्टीवरून भारताचा व्यापार आग्नेय आशियाशी मोठ्या प्रमाणावर झाल्याचे पुरातत्त्वीय पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे आग्नेय आशियावर भारतीय संस्कृतीचा प्रभाव असल्याचे लक्षात येते. आग्नेय आशियाप्रमाणे भारतीय किनाऱ्यावरून आफ्रिकेसोबतही व्यापार होत होता, आफ्रिकेसोबतच्या व्यापारामुळे भारतीय इतिहासात गुजराती बनियांचे प्रस्थ निर्माण झाले. आफ्रिकन हस्तिदंत आणि सुवर्णाने भारतीय गुजराती बनिया समाजाला १७ व्या आणि १८ व्या शतकात श्रीमंत केले. त्यामुळे त्यांच्या या व्यापारी प्रगतीविषयी जाणून घेणे रंजक ठरणारे आहे.

गुजराती व्यापाऱ्यांचा उदय

हिंदी महासागराचे आजच्या जागतिक व्यापारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगातील जवळपास ८०% व्यापार याच महासागरातून होतो. याच महासागराने प्राचीन काळात भारताला जगाशी जोडण्याचे काम केले होते. अभ्यासकांनी नमूद केल्याप्रमाणे मध्ययुगीन काळात भारत-आफ्रिका यांमधील व्यापार हिंदी महासागरातून होत असे, या व्यापारातून सुपारी, तांदूळ आणि आंबा यासह कापड आणि खाद्यपदार्थांची देवाणघेवाण झाली. १४ व्या शतकापर्यंत, इथोपियन आणि अ‍ॅबिसिनियन लष्करी गुलाम भारतात आणले जात होते, तेच हबशी म्हणून ओळखले जातात, त्यांचा वावर अगदी बंगालपर्यंत असल्याचे सांगणारे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. थोडक्यात जिथे मुस्लिम, सुलतानी राजवट होती तिथे या गुलामांचा वावर असल्याचे लक्षात येते.

Prithviraj Patil asserted that protection of democracy and freedom is a salute to Gandhiji
लोकशाही रक्षण हेच गांधीजींना अभिवादन- पृथ्वीराज पाटील
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Spontaneous response to exhibition of Shiva era weapons in Karad
शिवकालीन शस्त्रे पाहताना आबालवृद्ध भारावले, कराडमधील प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
lokmanas
लोकमानस: लोकशाही की एकाधिकारशाही?
Akola Amravati and Malegaon are main centers that issue certificates to Bangladeshis alleges Kirit Somaiya
“बांगलादेशींना प्रमाणपत्र देणारे अकोला, अमरावती आणि मालेगाव मुख्य केंद्र,” किरीट सोमय्या यांचा आरोप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
pune capital cultural programs activities
लोकजागर : सांस्कृतिक म्हणजे काय?
Indian state Rahul Gandhi
राहुल गांधी यांच्याविरोधात आसाममध्ये एफआयआर, राजकीय स्टंट असल्याची काँग्रेसची टीका

अधिक वाचा :नेताजींच्या मृत्यूचे गूढ खरंच तैवानमध्ये दडलंय का?

१३ व्या शतकाच्या उत्तरार्धात गुजरातमध्ये सुलतानशाहीची स्थापना झाली, यामुळे गुजरातच्या किनाऱ्यावर व्यापाराच्या क्षेत्रातील नवे पर्व सुरु झाल्याचे अभ्यासक मानतात. १३९२ पासून आफ्रो-युरेशियन व्यापार भरभराटीस आला. गुजराती व्यापारी हे प्रामुख्याने प्रादेशिक व्यापारी होते. परंतु या कालखंडात त्यांनी लवकरच संपूर्ण हिंदी महासागरात आपले प्राबल्य निर्माण केले.

आफ्रिकेत गुजराती व्यापारी

इतिहासकार मायकेल एन. पीअरसन यांनी आपल्या ‘पोर्ट सिटीज अॆण्ड इन्ट्रुडर्स : द स्वाहिली कोस्ट, इंडिया, अॆण्ड पोर्तुगाल इन द अर्ली मॉडर्न पिरिएड’ या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे १४९८ साली जैन व्यापारी हे मालिंदीमध्ये (आफ्रिका) आढळून येत होते आणि १५०७ मध्ये, ब्राह्मण व्यापारीदेखील तेथे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. हे व्यापारी तेथे प्रामुख्याने सोने आणि हस्तिदंत तसेच कापडाचा व्यापार करण्यासाठी जात होते. त्या काळात अहमदबादचा कापूस आणि नीळ यांचीच सर्वाधिक निर्यात हिंद महासागरातून केली जात होती. किंबहुना अरबस्तान, आफ्रिका आणि इंडोनेशियाच्या व्यापारात कापूस आणि नीळ यांचाच व्यापार मोठ्या प्रमाणात होत होता. याच दरम्यान गुजराती व्यापाऱ्यांनी, आफ्रिकन सोने आणि हस्तिदंत अनुकूल दराने मिळविले, तसेच गुजराती कारागिरांनी हे सोने आणि हस्तिदंत उच्चभ्रूंसाठीच्या मौल्यवान वस्तू तयार करण्यासाठी वापरले. त्यामुळे या व्यापारावर त्यांची मक्तेदारी निर्माण झाली.

महत्त्वाचे बंदर ‘दीव’

इतिहासकार एडवर्ड ए. आल्पर्स यांनी त्यांच्या ‘गुजरात अॆण्ड द ट्रेड ऑफ इस्ट आफ्रिका, 1500 टू 1800’ या शोधनिबंधात गुजराती व्यापारांच्या उदय आणि पतनाचा मागोवा घेतला आहे. त्यांनी नमूद केल्याप्रमाणे १५२० साला पर्यंत, ‘दीव’ हे गुजरात सुलतानाच्या कालखंडातील सर्वात महत्त्वाचे बंदर होते, तसेच या बंदरानजीक अरब, तुर्क, पर्शियन आणि इजिप्शियन व्यापाऱ्यांचे वसतिस्थान होते. असे असले तरी, या बंदरावरून होणार व्यापार पूर्णपणे गुजराती व्यापाऱ्यांच्या हातात होता, ज्याला सुलतानशाहीचे प्रोत्साहन दिले होते.

अधिक वाचा : इंग्रज ताजमहाल चोरून नेणार होते? इतिहासातील पुरावे काय सांगतात?

पोर्तुगीज आणि गुजराती व्यापारी यांच्यातील संघर्ष

दीव बंदराच्या महत्त्वामुळे पोर्तुगीजांनी आपले लक्ष्य या बंदराकडे वळविले होते. १६व्या शतकात पोर्तुगीजांनी या बंदरावर हल्ला करून हिंदी महासागरातील व्यापारावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. याच संघर्षात गुजराती व्यापाऱ्यांनी इजिप्त आणि तुर्क वसाहतकारांची मदत घेतली. पोर्तुगीजांविरोधात इजिप्शियन आणि तुर्कांशी युती करून पोर्तुगीजांचा प्रतिकार केला, १५५० मध्ये त्यांना पोर्तुगीजांविरोधात यश आले. पोर्तुगीजांनी त्याच काळात या किनाऱ्यावरील मुस्लिम व्यापाऱ्यांच्या मालकीच्या बोटी जप्त केल्या, ही गोष्ट गुजराती बनिया व्यापाऱ्यांच्या पथ्यावर पडणारी ठरली. त्यामुळे त्यांची मक्तेदारी अधिक दृढ झाली. या वेळेपर्यंत, गुजराती बनियांनी विविध बंदरांवर महाजन परिषदांसारख्या सामूहिक संस्था देखील विकसित केल्या होत्या, ज्यांनी वस्तूंच्या किंमती निश्चित करण्यासाठी आणि राज्यकर्त्यांशी संबंध समन्वयित करण्यासाठी अनेक जाती गटांना एकत्र आणले. ‘एस्टाडो दा इंडिया’मध्ये म्हणजेच पोर्तुगीजांच्या काळात दीव हे व्यावसायिक कर भरणारे गोव्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे बंदर होते. यावरूनच या बंदराचे महत्त्व पुरते लक्षात येते.

पोर्तुगीज सत्तेच्या अधिपत्याखाली गुजराती बनिया

गोव्याप्रमाणे दीव देखील पोर्तुगीजांच्या दीर्घकालीन अधिपत्याखाली होते. ज्या वेळेस दीव पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली आले त्या वेळेस गुजराती बनियांचे व्यापारातील चातुर्य पाहून आपल्या राज्यात त्यांनी गुजराती हिंदू बनियांवर बंदी घातली होती. परंतु लवकरच ही बंदी कालबाह्य ठरली. गुजराती बनिया हे आशियातील महत्त्वाचे व्यापारी ठरले, त्यांनी पोर्तुगीजांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या मलाक्काशी व्यापार करण्यास सुरुवात केली. पोर्तुगीज नौदल शक्तीने दीवच्या गव्हर्नरला आफ्रिकन हस्तिदंतांवर मक्तेदारी मिळवून दिली होती. परंतु या पोर्तुगीज गव्हर्नरने गुजराती बनियांशी व्यापारासंदर्भात संगनमत करणे पसंत केले होते. यामुळे दीवच्या बनियांची भरभराट होत राहिली. १६४६ मध्ये दीवमध्ये त्यांची संख्या ३०,००० इतकी होती असे पोर्तुगीज भारतीय अर्थव्यवस्थेचे अभ्यासक पिअर्सन यांनी आपल्या ‘वेल्थ अॆण्ड पॉवर : इंडियन ग्रुप्स इन द पोर्तुगीज इंडियन इकनॉमी (२०११)’ या शोधनिबंधात नमूद केले आहे. पोर्तुगीजांचे आफ्रिकेच्या व्यापारावर वाढते प्रभुत्त्व पाहून ओमानी अरबांनी पूर्व आफ्रिकेतील पोर्तुगीजांच्या विरोधात प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आणि त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्याला घाबरून पोर्तुगीजांनी (एस्टाडो दा इंडियाने) १६८६ सालामध्ये मोझांबिक-दीव व्यापाराची मक्तेदारी “कंपनी ऑफ माझानेस” म्हणजेच गुजराती महाजनांना दिली, हा एक दीवचा वरिष्ठ व्यापारी समूह होता. १६ व्या शतकात गोव्यात धार्मिक छळासाठी जेसुइट्स जबाबदार असले तरी १७ व्या आणि १८ व्या शतकापर्यंत त्यांचे व्यापाऱ्याच्या निमित्ताने गुजराती बनियांशी मैत्रीपूर्ण संबंध होते.

दरम्यान, गुजराती व्यापाऱ्यांच्या इतर समुदायांनाही हिंदी महासागरातील पोर्तुगीज विरुद्ध अरब या संघर्षांचा फायदा झाला. मस्कतमधील एका गुजराती समूहाने १७२० मध्ये आफ्रिकेतील पोर्तुगीजांना लुटण्यासाठी ओमानींना जहाजे उधार दिली होती. पोर्तुगीज आणि बनिया यांच्यातील गुंतागुंतीचे नाते १७६० च्या दशकात मोझांबिकमधील दीव व्यापार्‍यांचे नेते ‘पोंजा वेल्गी’ नावाच्या व्यापाऱ्याच्या उदाहरणावरून लक्षात येते. पोर्तुगीज अँटोनियो अल्बर्टो डी आंद्राडे यांनी आपल्या Relações de Moçambique Setentista मध्ये पोंजा वेल्गी बद्दल नोंदी केल्या आहेत. त्याच्ंया आयातीवर बेटावरील पोर्तुगीज राज्याच्या एकूण उत्पन्नापेक्षा जास्त देय दिले जात होते. या व्यापारामुळे गुजराती व्यापारी सधन होत राहिले. त्यांचा हा व्यापार ब्रिटिशांच्या काळातही सुरूच राहिला.

Story img Loader