प्राचीन काळात भारत एक समृद्ध देश होता. भारताला देण्यात येणाऱ्या अनेक उपमांपैकी एक उपमा म्हणजे ‘सोनेकी चिडियाँ’. भारताच्या समृद्धीमागील एक कारण म्हणजे भारताचा इतर देशांशी होणारा व्यापार! सातासमुद्रापलीकडे असणाऱ्या देशांशी होणाऱ्या या व्यापारामुळे भारतात समृद्धी नांदत होती. याचे उत्तम उदाहरण म्हणजे रोम आणि भारत यांच्यात होणारा व्यापार. प्राचीन भारतीय साहित्यात यवन हा शब्द अनेकदा येतो. बहुतांश अभ्यासक यवन हा शब्द ग्रीक-रोमन लोकांसाठी वापरल्याचे मान्य करतात. भारताला विस्तृत मोठी किनारपट्टी लाभलेली आहे. भारतीय इतिहासात सागरी मार्गाच्या व्यापारातील भूमिकेविषयी चर्चा करताना नेहमीच भारत- रोम संबंधाला प्राधान्य दिले जाते. परंतु भारतीय सागरी व्यापाराचा इतिहास हा केवळ इंडो- रोमन व्यापारापुरताच मर्यादित नाही. मध्ययुगीन काळात भारताच्या पूर्व किनारपट्टीवरून समुद्रमार्गे मोठ्या प्रमाणात व्यापार होत होता. या किनारपट्टीवरून भारताचा व्यापार आग्नेय आशियाशी मोठ्या प्रमाणावर झाल्याचे पुरातत्त्वीय पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे आग्नेय आशियावर भारतीय संस्कृतीचा प्रभाव असल्याचे लक्षात येते. आग्नेय आशियाप्रमाणे भारतीय किनाऱ्यावरून आफ्रिकेसोबतही व्यापार होत होता, आफ्रिकेसोबतच्या व्यापारामुळे भारतीय इतिहासात गुजराती बनियांचे प्रस्थ निर्माण झाले. आफ्रिकन हस्तिदंत आणि सुवर्णाने भारतीय गुजराती बनिया समाजाला १७ व्या आणि १८ व्या शतकात श्रीमंत केले. त्यामुळे त्यांच्या या व्यापारी प्रगतीविषयी जाणून घेणे रंजक ठरणारे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा