तुलसीदासांनी रामचरितमानसची रचना केली. रामायणातील कथांचा आधार घेऊन त्यात श्रीरामांचे चरित्र सांगितले आहे. त्याचे नाट्य-संगीतमय सादरीकरण म्हणजे रामलीला होय. नवरात्रीच्या काळात, विशेषतः शेवटच्या दिवशी रामलीला सादर करून रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. चांगल्या गोष्टींचा वाईटावरील विजय दर्शवण्यासाठी रामलीलाचे सादरीकरण होते. रामायण, रामाच्या कथांचे उल्लेख अन्य देशांमध्ये दिसतातच. पण उत्तर भारतात सादर होणारी रामलीला कॅरिबियन बेटांमधील त्रिनिदादलाही सादर करण्यात येते. त्रिनिदादमध्ये भारतीयांची संख्या अधिक आहे.

हेही वाचा : ‘व्हिसा शॉपिंग’ म्हणजे काय ? युरोपियन देशांमधील प्रवासासाठी हे आवश्यक आहे का ?

Deepika Padukone And Ranveer Singh Spotted with baby dua after delivery video viral
Video: पहिल्यांदाच लाडक्या लेकीबरोबर दिसले दीपिका पादुकोण अन् रणवीर सिंह, एअरपोर्टवरील व्हिडीओ होतोय व्हायरल
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sharda Sinha, Chhath Puja songs, Bihar,
शारदा सिन्हा… छठ पूजा गीतांना अजरामर करणारी ‘बिहार कोकिळा’
Loksatta vyaktivedh Dairy personality Ravindra Pandurang Apte former president of Gokul passed away
व्यक्तिवेध: रवींद्र आपटे
sussane khan share photo of son hridaan and hrehaan
हृतिक रोशन-सुझान खानची मुलं झाली मोठी, फोटो पाहून चाहते म्हणाले, “ते बॉलीवूडचे…”
kiara advani and mithun chakravarti
मिथून चक्रवर्ती ते कियारा अडवाणी, बॉलीवूडमधील ‘या’ लोकप्रिय कलाकरांची खरी नावे माहित आहेत का?
Ashok MaMa Colors Marathi New Serial
मुहूर्त ठरला! ‘अशोक मा.मा.’ मालिकेत झळकणार प्रसिद्ध अभिनेत्याची लेक अन् ‘कलर्स मराठी’ची लोकप्रिय नायिका, पाहा प्रोमो
What Rahul Gandhi Said?
Rahul Gandhi : “महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर महिलांना प्रति महिना ३ हजार रुपये आणि बस प्रवास मोफत”, राहुल गांधींची गॅरंटी

रामलीलाचा त्रिनिदादपर्यंतचा प्रवास

१९व्या शतकाच्या सुरुवातीस ब्रिटनमधील गुलामगिरी विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. १८०७ मध्ये गुलामांच्या व्यापारावर बंदी घालण्यात आली आणि शेवटी १८३४ मध्ये ब्रिटीश साम्राज्याने गुलामांचा व्यापार थांबवला. परंतु, ब्रिटिशांची अर्थव्यवस्था गुलाम कामगारांवरच अवलंबून होती. गुलामांचा व्यापार थांबल्यामुळे ब्रिटिश वसाहतींमध्ये मोठी समस्या निर्माण झाली. त्रिनिदाद बेट हे साखर उत्पादनाचे महत्त्वाचे केंद्र असणारे ठिकाण होते. तेथेही गुलामांच्या अभावी समस्या निर्माण झाली.

१८३८ मध्ये, त्रिनिदादमध्ये मुक्ती कायदा लागू झाल्यानंतर साखर उद्योग क्षेत्रातील मुक्त झालेल्या गुलामांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले. आपली अर्थव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी करारबद्ध कामगार आणण्याचे ठरवले. हे पहिले करारबद्ध कामगार भारतातून नेण्यात येणार होते. ३० मे, १८४५ रोजी करारबद्ध भारतीय कामगारांची पहिली बोट त्रिनिदादला आली.

हेही वाचा : इस्रायलच्या सैन्यात अरब लोकांचा समावेश कसा झाला ? कोण आहेत बेड्वन सैनिक ?

गुलामगिरी नसली तरी कामासाठी राबवेच लागत होते. या कामगारांना काही उद्योजकांनी श्रीमंतीची, पैशाची आमिषे दाखवली होती. त्याच लोभाला बळी पडून हे कामगार त्रिनिदादला आले होते. करार संपेपर्यंत त्यांच्या वेतनाचा काही भागही कापून घेण्यात येत होता, हा भाग त्यांना करार पूर्ण झाल्यावर मिळेल असे सांगण्यात आले होते.

१९१७ पर्यंत अनेक भारतीय कामगार त्रिनिदादला गेले. आज त्यांचे वंशजही तिथे कार्यरत आहेत. त्रिनिनादमधील लोकसंख्येच्या सुमारे ३५ टक्के भारतीय तिथे आहेत.

”या करारबद्ध कामगारांना कोणत्याही भौतिक साधने जवळ बाळगू शकत नव्हत्या. पण त्यांनी तिथे जाऊन आपली संस्कृती जपली. जरी भारतीय हिंदूंनी त्रिनिदादला काही सामान आणले नाही, पण त्यांनी रामचरितमानस आणले. रामचरितमानस त्यांच्या स्मरणात होते, काहींकडे पुस्तकरूपात होते,” पॉला रिचमन यांनी ‘रामलीला इन त्रिनिनाद’मध्ये लिहिले आहे. त्यांनी नमूद केल्यानुसार हे कामगार पाठ केलेला मजकूर म्हणत, तसेच काही तो पुस्तकात वाचून म्हणत. अशा प्रकारे त्रिनिदादमध्ये रामलीलाचे आगमन झाले. त्रिनिनादमधील ग्रामीण भागात भारतीय लोक भोजपुरी बोलतात, पोळ्या बनवतात, रामलीला सादर करतात.

”रामलीलाची परंपरा वडिलोपार्जित जपण्यात आली. वडील भूमिका करत असताना पुढील पिढ्या ते शिकत होत्या. लहान मुले पण त्यामध्ये सहभागी होत. रामलीला सुरु असताना महिला स्वादिष्ट स्वयंपाक करत. रामलीला संपल्यावर सर्वजण आनंदाने एकत्र जेवत असत,” असे रिचमनने लिहिले.

रामलीला संस्कृतीचा लोपाकडे सुरू असलेला प्रवास
कालांतराने रामलीलाचा प्रभाव कमी होत गेला. भोजपुरीची जागा इंग्रजीने घेतली. शालेय औपचारिक शिक्षण घेण्यात येऊ लागले. त्यामुळे मुलांना रामचरितमानस माहीत नव्हते.
तरुण पिढ्या रामलीला बघण्याच्या ऐवजी खाद्यपदार्थांवर ताव मारायच्या. त्यांना रामलीलाची हिंदी भाषा फारशी कळायची नाही. त्यामुळे त्यांनी नाटकाकडे पाठ फिरवली. आता रामलीलानाटकाऐवजी त्याचा स्लाईड शो होऊ लागला आहे, ” असे रिचमन यांनी लिहिले आहे. अनेक भारतीय शहरी भागांमध्ये राहण्यास गेले. तेथील संस्कृती त्यांनी स्वीकारली. कार्निव्हल, तेथे होणारे फेस्टिव्हल यामध्ये ते सहभागी होत. त्यामुळे रामलीलाचे प्रयोग कमी झाले.

रामलीला नवीन स्वरूपात
”रामलीला टिकवण्यासाठी नवीन प्रयोग करण्यात आले. जातीय निर्बंध सैल केले, महिलांही रामलीला मध्ये सहभागी होऊ लागल्या. नवीन नाट्यतंत्र स्वीकारण्यात आले. संवादरचना बदलण्यात आली. भारतीय त्रिनिनादच्या राजकारणात सक्रिय भाग घेऊ लागले. याचा परिणाम नाटकाला मिळणाऱ्या आर्थिक साहाय्यावर झाला. रामलीलाला नवीन वलय चढवण्यात आले. रामचरितमानस ही कथा कायम आहे. सुरुवात हिंदीमध्ये करून पुढील संवाद इंग्रजीमध्ये सादर करण्यात येतात. सोपी हिंदी आणि इंग्रजी रामलीला साठी वापरण्यात येते,” असे रिचमन यांनी सांगितले आहे.
त्रिनिनादमध्ये आलेल्या भारतीयांनी ज्याप्रकारे स्वतः ला विकसित केले तसेच त्यांनी रामलीलाही विकसित केली.