श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध अनुक्रमे एकदिवसीय आणि कसोटी मालिकांतील निराशाजनक पराभवांनी गौतम गंभीर यांच्याविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. गंभीर यांना प्रशिक्षकपदाची जबाबदारी घेऊन केवळ तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, त्यांच्या संघाबाबतच्या निर्णयावरही अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गंभीर यांच्याकडून नेमके काय चुकते आहे, तसेच द्रविड व गंभीर यांच्या मार्गदर्शनातील फरक काय, याचा घेतलेला हा आढावा.

द्रविड, गंभीर यांच्यात फरक काय?

भारताने ट्वेन्टी-२० विश्वचषक उंचावल्यानंतर द्रविडचा प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपुष्टात आला. द्रविड यांनी रवी शास्त्री यांच्याकडून प्रशिक्षकाची सूत्रे स्वीकारली. त्यांच्या काळातही भारताने चमकदार कामगिरी केली. भारतीय संघ एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला. अनेक युवा खेळाडू त्यांच्या कारकीर्दीत नावारूपास आले. यामध्ये यशस्वी जैस्वाल व शुभमन गिल यांचे विशेष नाव घ्यावे लागेल. द्रविड खेळाडू असतानाही नेहमी संयमाने खेळत होते. प्रशिक्षणातही त्यांचा संयम पाहायला मिळाला. निकालापेक्षा खेळाडू घडवण्यावर द्रविड यांचा भर राहिलेला आहे. भारताच्या १९ वर्षांखालील व भारताच्या ‘अ’ संघाला मार्गदर्शन करताना त्यांनी असे खेळाडू तयार केले, जे आज वरिष्ठ संघाकडून खेळताना दिसतात. दुसरीकडे, गंभीर आपल्या आक्रमक व रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांचे लक्ष निकाल मिळवण्यावर अधिक असते. त्यामुळे नेहमीच आक्रमक क्रिकेट खेळण्याकडे त्यांचा कल अधिक असतो. द्रविड यांच्यासारखा पूर्णवेळ प्रशिक्षकाचा अनुभव गंभीर यांच्याकडे नाही. गंभीर प्रथमच राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक झाले आहेत. त्यांनी ‘आयपीएल’ व दिल्ली क्रिकेटमध्ये सल्लागार तसेच, प्रेरक म्हणून काम केले आहे.

How is the President of the United States elected Why is voting indirect
अमेरिकेचे अध्यक्ष कसे निवडले जातात? मतदान अप्रत्यक्ष का असते? समसमान मते मिळाल्यास काय? 
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
devendra fadnavis on amit thackeray
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…”
indian team poor performance against new zealand
न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाला अतिआक्रमकतेचा फटका? गंभीरच्या धाडसी निर्णयाचा पुनर्विचार आवश्यक आहे का?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Maharashtra assembly elections 2024
इडीने छळले. सत्तेशी जुळले, धन फळफळले
Khar Gymkhana Cancel Cricketer Jemimah Rodrigues Membership
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जचं खार जिमखाना सदस्यत्व रद्द; वडिलांतर्फे आयोजित धार्मिक कार्यक्रमांमुळे कारवाई

हेही वाचा >>>Ant Farmers: ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी मानवाने नाही तर ‘या’ कीटकाने केली शेतीला सुरुवात; नवीन संशोधन काय सांगते?

बीसीसीआयचा वरदहस्त?

द्रविड यांनी प्रशिक्षकपद सोडल्यानंतर गंभीर यांच्या नावाची चर्चा सुरू होती. त्यांच्यामुळे गेल्या ‘आयपीएल’ हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाला जेतेपद मिळवता आले होते. त्यामुळे तेच भारताच्या संघाची जबाबदारी घेण्यात सक्षम आहेत, असे वातावरण निर्माण करण्यात आले. त्यांनी पदाची जबाबदारी घेण्यापूर्वी ‘बीसीसीआय’समोर अटी ठेवल्या. विशेष म्हणजे ‘बीसीसीआय’ने या अटी मंजूरही केल्या. गंभीर यांनीच कोलकाताचे साहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर व रायन डॉयशाते यांना भारताच्या साहाय्यक प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आल्याची चर्चा आहे. यानंतर मॉर्ने मॉर्केल यांची संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली. त्यातच गंभीर यांच्याना संघ निवडीतही सूट देण्यात आल्याचे कळते. त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दौऱ्यासाठीही निवड समितीच्या बैठकीत सहभागी करण्यात आले होते. मात्र, सध्याची स्थिती पाहता संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चमक न दाखवल्यास आगामी काळात गंभीर यांच्यावर काही बंधने येण्याची शक्यता आहे. गंभीर यांनी जबाबदारी घेतल्यानंतर भारताने २७ वर्षांनंतर प्रथमच श्रीलंकेत एकदिवसीय मालिका गमावली आणि न्यूझीलंडने भारताविरुद्ध निर्भेळ यशही संपादन केले. त्यामुळे खेळाडूंसह गंभीर यांच्यावर आता सर्वांचे लक्ष असणार आहे. गंभीर यांना प्रशिक्षकपद देण्यात यावे, यासाठी सध्याचे सचिव आणि आगामी ‘आयसीसी’ अध्यक्ष जय शहा प्रयत्नशील असल्याचे चर्चा होती. मोठ्या दौऱ्यासाठी संघ निवडताना तो रात्री उशिरा जाहीर करणे तसेच, पत्रकार परिषदांना सामोरे न जाणे, ही ‘बीसीसीआय’ची भूमिका अनेकांना पटलेली नाही.

गंभीर यांच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह का?

प्रशिक्षकाची जबाबदारी ही खेळाडूंसाठी चांगली योजना आखण्याची असते. मात्र, फिरकीपटूंविरुद्ध भारतीय फलंदाज अडखळत असतानाही मुंबईत पूर्णपणे फिरकीला अनुकूल खेळपट्टी तयार करण्यासंदर्भात गंभीर यांच्याविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गंभीर यांना खेळाडूंकडून कुठल्याही परिस्थितीत एकच दृष्टिकोन अपेक्षित आहे. मात्र, भारतीय क्रिकेट जाणकारांनी गंभीर यांच्या दृष्टिकोनाबाबत आता सवाल उपस्थित केले आहेत. मुंबईमध्ये झालेल्या कसोटीत दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळी मोहम्मद सिराजला रात्रप्रहरी म्हणून पाठवणे आणि पहिल्या डावात लयीत असलेल्या सर्फराज खानला आठव्या स्थानी फलंदाजीला उतरवणे, हा गंभीर यांचा निर्णय अनेकांना पटलेला नाही. ‘‘गंभीर यांना असे अधिकार देण्यात आले, जे यापूर्वी रवी शास्त्री व राहुल द्रविड यांच्याकडेही नव्हते. ‘बीसीसीआय’च्या नियमानुसार प्रशिक्षकाला निवड समितीच्या बैठकांमध्ये सहभागी होता येत नाही. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गंभीरना बैठकीत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. महत्त्वाचा दौरा असल्यामुळे असे करण्यात आले,’’ असे सूत्रांकडून सांगण्यात आले. दिल्ली आणि कोलकाता नाइट रायडर्सचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा तसेच, आंध्र व सनरायजर्स हैदराबादचा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी यांना बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी भारतीय संघात स्थान मिळाले. गंभीर यांच्या मागणीनंतरच संघात त्यांना स्थान मिळाल्याची चर्चा आहे. तसेच, डॉयशाते यांना साहाय्यक प्रशिक्षकाची जबाबदारी दिल्यानंतरही अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

हेही वाचा >>>Queen Nefertiti bust: ३,३७० वर्षे प्राचीन इजिप्तची राणी परंतु तिचा पुतळा जर्मनीत; नेफरतितीचा अर्धपुतळा इजिप्तला परत मिळणार का?

‘गॅमबॉल’ भारतीय क्रिकेटसाठी किती पूरक?

भारताने बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारताचा आघाडीचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने गौतम गंभीरच्या शैलीला ‘गॅमबॉल’ असे संबोधले. इंग्लंडची ‘बॅझबॉल’ शैली ही सर्वश्रुत आहे. ब्रेंडन मॅककलम यांनी इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर संघाने आक्रमक शैलीचा अवलंब केला. यानंतर भारताने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी दरम्यान आक्रमक खेळ करत सामना जिंकला. यानंतर अश्विनने ‘गॅमबॉल’ असे भारताच्या शैलीला म्हटले. मुळात इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ शैलीचा फटका इंग्लंडला याआधीही बसला आहे. भारत दौऱ्यावर असताना इंग्लंडने पहिला कसोटी सामना जिंकला. मात्र, वेगाने धावा करण्याच्या नादात उर्वरित चार कसोटी सामने गमावले. नुकत्याच झालेल्या पाकिस्तानविरुद्ध मालिकेतही पाहुण्यांनी पहिला कसोटी सामना जिंकत आघाडी मिळवली. मात्र, उर्वरित दोन सामन्यांत त्यांना पराभूत व्हावे लागले. भारताने बांगलादेशसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध चुणूक दाखवली. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध भारताला ही शैली फारशी कामी आली नाही. आगामी ऑस्ट्रेलिया दौरा जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या दृष्टीने भारतासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे भारतीय संघ या दौऱ्यात कोणत्या दृष्टिकोनातून मैदानात उतरतो हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. सध्याची कामगिरी पाहता संपूर्ण भारतीय संघावर चांगल्या कामगिरीचा दबावही असणार आहे.