२६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपींपैकी एक असलेला तहव्वूर राणा आपले अमेरिकेतून भारतात प्रत्यर्पण टाळण्यात अपयशी ठरला. अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने राणाची पुनरावलोकन याचिका फेटाळून लावल्यानंतर आता त्याच्यासमोरचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. मात्र राणाखेरीज भारतात गुन्हे करून परदेशांत पळालेले अनेक जण यंत्रणांच्या रडारवर असून सरकारच्या मते यातील दोन तृतियांश आरोपी हे एकट्या अमेरिकेत आहेत. तहव्वूर राणानंतर इतरांनाही परत आणण्याचा प्रयत्न होणार का, याविषयी…

राणावर दहशतवादी हल्ल्यात कोणते आरोप?

पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योजक असलेल्या राणावर मुंबई हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे. त्याने शहरातील महत्त्वाच्या स्थळांची माहिती, छायाचित्रे घेऊन ती हल्ल्याच्या पाकिस्तानस्थित मास्टरमाइंडना पुरविल्याचा ठपका मुंबई पोलिसांनी ठेवला आहे. राणाने काही काळ पाकिस्तानी सैन्यातही काम केले असून त्याचे लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी घनिष्ठ संबंध असल्याचे मानले जाते. डेन्मार्कमधील वृत्तपत्र ‘ज्युलांड्स-पोस्टेन’च्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्यात तो दोषी आढळून आला आहे. २००९मध्ये त्याच्यावरील आरोप सिद्ध झाल्यानंतर २०११मध्ये, अमेरिकेतील केंद्रीय न्यायालयानेही लष्कर-ए-तोयबाला मदत केल्याबद्दल राणाला दोषी ठरवले. मे २०२३मध्ये मुंबई हल्ल्याप्रकरणी राणाच्या प्रत्यर्पणास मंजुरी दिल्यानंतर त्याने केंद्रीय न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र त्याचा हा अखेरचा प्रयत्नदेखील फसला आहे.

Protest by a pro-Khalistan mob outside the Indian High Commission in London met counter-protest
Video : लंडनमध्ये खलिस्तान समर्थकांना भारतीयांनी दिलं सडेतोड उत्तर; भारतीय दूतावासाबाहेर निदर्शनं सुरू होताच…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Saif attacker tag costs Colaba resident his job, marriage
Saif Attacker Tag : “लग्न मोडलं, नोकरीही गेली..”, सैफवर हल्ला करणारा संशयित या एका आरोपाने कसं बदललं तरुणाचं आयुष्य?
Yogi Adityanath News
Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य, “सनातन धर्म हाच आपला राष्ट्रधर्म आहे, सगळ्यांनी…”
Why Bombay HC said use of loudspeakers is not essential to religion
लाऊडस्पीकरचा वापर कोणत्याही धर्मासाठी आवश्यक नाही; मुंबई उच्च न्यायालयाने नेमके काय म्हटले?
पॅराक्वॅट विषबाधा म्हणजे काय? ग्रीष्माने तिच्या प्रियकराची हत्या कशी केली? (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Paraquat Poisoning : पॅराक्वॅट म्हणजे नेमकं काय? त्यामुळे विषबाधा कशी होते?
Minor boy arrested for killing infant G
१५ वर्षांचा प्रियकर, २२ वर्षांची प्रेयसी; चार महिन्यांचे बाळ आणि माणुसकीला काळीमा फासणारा गुन्हा…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…

खलिस्तानी दहशतवाद्यांच्या प्रत्यर्पणासाठी प्रयत्न?

भारताने बंदी घातलेल्या ‘खालिस्तान टायगर फोर्स’ या अतिरेकी संघटनेचा नेता अर्शदीप सिंह गिल उर्फ अर्श दल्ला हा कॅनडामध्ये मोकाट आहे. ५० हून अधिक खून, खुनाचा प्रयत्न, ब्लॅकमेलिंग आणि अन्य दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा त्याच्यावर आरोप असून त्याच्या प्रत्यर्पणासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. अर्श दल्ला याला जानेवारी २००४ मध्ये ‘दहशतवादी’ घोषित करण्यात आले असून ऑक्टोबरमध्ये एका हल्ल्यात जखमी झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. डिसेंबरमध्ये त्याला जामीन मिळाला असला, तरी त्याच्या प्रत्यर्पणासाठी कॅनडा सरकारबरोबर वाटाघाटी सुरू आहेत. तो पाकिस्तानी गुप्तचर संस्था, आयएसआयच्या संपर्कात असल्याचे मानले जाते. ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ या प्रतिबंधित संघटनेशी संबंध असलेला सतविंदर सिंग ऊर्फ गोल्डी ब्रार हादेखील कॅनडात आहे. त्याच्यावर हत्या, अमली पदार्थांची तस्करी आदी आरोप आहेत. गोल्डी ब्रार हा लॉरेन्स बिश्नोईचा निकटवर्ती मानला जातो.

बिश्नोई टोळीचे ‘वॉण्टेड’ भारतात परत आणणार?

गुजरातच्या साबरमती कारागृहात शिक्षा भोगत असलेला बिश्नोई टोळीच्या म्होरक्या लॉरेन्स याचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोई अनेक मोठ्या प्रकरणांत आरोपी आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला आणि मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या कटात अनमोल सहभागी असल्याचा संशय आहे. त्याला गतवर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत वैध कागदपत्रांशिवाय देशात प्रवेश केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्या प्रत्यर्पणासाठी अमेरिकेला विनंती करण्यात आली आहे. मात्र तेथील कायदेशीर प्रक्रिया पार पाडूनच हे प्रत्यर्पण होणे शक्य असल्याने अनमोल लगेचच भारतात येईल आणि त्याच्यावर खटला चालेल, ही शक्यता धूसर असल्याचे गुप्तचर यंत्रणांमधील सूत्रांचे म्हणणे आहे.

‘कर्जबुडव्यां’वर प्रत्यर्पणाची टांगती तलवार?

मद्यसम्राट विजय मल्ल्या, हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहूल चोक्सी हे भारतीय बँकांना कोट्यवधी रुपयांची ‘टोपी’ घालून देशाबाहेर पसार झाले आहेत. मल्ल्यावर भारतातील विविध बँकांकडून घेतलेल्या सुमारे ९,००० कोटी रुपयांच्या कर्ज थकबाकीचा खटला आहे. ‘किंगफिशर एअरलाइन्स’ बुडाल्यानंतर फसवणुकीचाही ठपकाही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. २०१६ साली तो देश सोडून पळाला आणि सध्या ब्रिटनमध्ये आहे. २०१९ मध्ये मल्ल्याला फरार घोषित करण्यात आले. त्याच्या प्रत्यर्पणासाठी भारताने प्रदीर्घ कायदेशीर लढा दिला असून याला लवकरच यश येण्याची शक्यता आहे. नीरव मोदी आणि चोक्सी यांनी पीएनबी बँकेला तब्बल १४,००० कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. २०१८ मध्ये मोदी देश सोडून गेला आणि त्याला त्याच वर्षी लंडनमध्ये अटक झाली. तो सध्या ब्रिटनच्या् तुरुंगात असून प्रत्यर्पण टाळण्याचे त्याचे सगळे प्रयत्न फसले आहेत. मेहुल चोक्सी सध्या अँटिग्वामध्ये आहे.

भारताला हवे असलेले अन्य गुन्हेगार कोण?

या प्रमुख गुन्हेगारांखेरीज भारतामध्ये ‘वाँटेड’ असलेल्या पण अन्य देशात पळालेल्यांची यादी मोठी आहे. करचुकवेगिरी आणि अफरातफरीच्या आरोप असलेला शस्त्र व्यवहार सल्लागार संजय भंडारी, महादेव बेटिंग ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याला २०२३ मध्ये दुबईत अटक झाली असून त्याच्या प्रत्यर्पणासाठी खटला सुरू आहे. मात्र भारतात हत्या, अपहरण-खंडणी, दहशतवादी हल्ले असे गंभीर आरोप असलेले अनेक जण पाकिस्तानात उजळ माथ्याने वावरत आहेत. यातील सर्वांत मोठे नाव आहे ते मुंबईत जन्माला आलेल्या दाऊद इब्राहिमचे… याखेरीज दाऊदचा सहकारी छोटा शकील, जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर, लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफीज सईद, त्याचा सहकारी झाकिउर रहेमान लख्वी, सय्यद सलाउद्दिन हेदेखील पाकिस्तानात आहेत. मात्र पाकिस्तानबरोबरचे संबंध, प्रत्यर्पण कराराचा अभाव अशा अनेक कारणांमुळे या आरोपींना सध्यातरी देशात आणण्याचे प्रयत्न झालेले नाहीत. या सर्वांबरोबर आणखी एक नाव आहे ते मुस्लिम धर्मप्रचार झाकीर नाईक याचे. आर्थिक घोटाळाप्रकरणी तो भारतीय यंत्रणांना हवा असून सध्या तो मलेशियामध्ये आहे. – 

amol.paranjpe@expressindia.com

Story img Loader