T20 World Cup 2024, IND vs SA Final: आठ सामने आठ विजय आणि टी२० विश्वविजेतेपदावर कब्जा. स्वप्नवत वाटावी अशी कामगिरी करत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २००७ नंतर तब्बल १७ वर्षांनी टी२० वर्ल्डकपचा करंडक उचलला. या करंडकासह आयसीसी जेतेपदांचा दशकभराचा दुष्काळही भारतीय संघाने संपुष्टात आणला. कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी या आयसीसी वर्ल्डकपविजेत्या कर्णधारांच्या मांदियाळीत आता रोहित शर्माचाही समावेश झाला आहे. या विजयाचं अधोरेखित होणारं वैशिष्ट्य म्हणजे एकीचं बळ. कोणी एक खेळाडू या विजयाचा नायक नाही तर असंख्य नायकांची फौज या विजयाची मानकरी आहे. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर भारतीय संघाने सर्वोत्तम प्रदर्शन केलं. भारताचे माजी कर्णधार राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने मिळवलेल्या या विजयाने गेल्या वर्षी वनडे वर्ल्डकपच्या फायनल लढतीत झालेल्या पराभवाचे व्रण पुसले गेले. टीम इंडियाने कसा साध्य केला विश्वविजय, कोणत्या मुद्यांवर दिलं लक्ष जाणून घेऊया.

हेही वाचा – सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा

South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
T20 World Cup 2024, IND vs SA Final
Video: जिंकण्यासाठी ३० बॉल ३० रन होते, तरी दक्षिण आफ्रिका फायनलमध्ये हरली, नेमकं त्या पाच ओव्हर्समध्ये घडलं काय?
Suryakumar Yadav Statement on David Miller Stunning Catch
IND vs SA: “…तेव्हा वाटलं ट्रॉफीचं बाऊंड्रीच्या पलीकडे जातेय”, सूर्याने सांगितली मिलरच्या मॅचविनिंग कॅचमागची गोष्ट; म्हणाला, “आता सगळं…”
Ravindra Jadeja Announces Retirement from T20 Cricket in Marathi
Team India : विराट-रोहितनंतर ‘या’ स्टार अष्टपैलू खेळाडूनेही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला रामराम
Rohit Sharma Announces Retirement from T20 Cricket in Marathi
Rohit Sharma T20 Retirement: रोहित शर्मानेही जाहीर केली टी-२० मधून निवृत्ती, वर्ल्डकप विजयानंतर ‘रो-को’ चा भारतीय चाहत्यांना धक्का
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत

फिल्डिंगची जादू
फिल्डिंग या मुद्यावर भारतीय संघाने प्रचंड कसून मेहनत घेतल्याचं अख्ख्या स्पर्धेत दिसून आलं. फिल्डिंग कोच दिलीप यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने छोट्यात छोट्या गोष्टींवर काम केल्याचं सातत्याने दिसलं. फायनलमध्ये सूर्यकुमार यादवने बाऊंड्रीजवळ घेतलेला कॅच याचं सर्वोत्तम उदाहरण ठरावं. डेव्हिड मिलरसारख्या अव्वल फिनिशरसमोर ६ चेंडूत १६ धावा काढण्याचं आव्हान होतं. मिलरने हार्दिक पंड्याचा चेंडू जोरकस मारला पण सूर्यकुमारने वेगात पळत जाऊन बाऊंड्री नक्की कुठे आहे याचा अंदाज घेतला. आपण बाऊंड्रीपल्याड जाताना पाय लागणार नाही याची काळजी घेतली. शरीराचा कोणताही भाग बाऊंड्रीला लागणार नाही याची दक्षता घेत त्याने चेंडू आत टाकला आणि पुन्हा कॅच टिपला. अतिशय दडपणाच्या क्षणी सूर्यकुमारने प्रसंगावधान राखून कॅच घेतला. फायलनमध्येच कुलदीप यादवने कागिसो रबाडाचा घेतलेला कॅचही अफलातून असा होता. रबाडाने अतिशय जोरदार फटका मारला. कुलदीपने चेंडूचा वेग लक्षात घेऊन योग्य टायमिंगसह कॅच पूर्ण केला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत धोकादायक ठरू शकणाऱ्या मिचेल मार्शला अक्षर पटेलच्या अचंबित करणाऱ्या कॅचने रोखलं. अक्षरने आयर्लंडविरुद्धही असाच एक कॅच घेतला होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांचा कर्णधार बाबर आझमला सूर्यकुमार यादवच्या शानदार कॅचने माघारी धाडलं. अमेरिकेने अनुनभवी असूनही भारताविरुद्ध चांगला खेळ केला. या लढतीत मोहम्मद सिराजने नितीश कुमारला बाद करताना घेतलेला झेल क्रिकेटरसिकांच्या चिरंतन स्मरणात राहील. चेंडू वेगाने बाऊंड्रीपल्याड जाणार असं वाटत असतानाच सिराजने थरारक कॅच टिपला.

हेही वाचा – IND vs SA: सूर्या दादाच्या एका कॅचने फिरवली मॅच! सूर्यकुमारला बेस्ट फिल्डरचं मेडल देताना ड्रेसिंग रूममध्ये…; पाहा VIDEO

इंग्लंडविरुद्ध मोईन अलीला ऋषभ पंतने अशा चपळाईने स्टंपिंग केलं की क्रिकेटरसिकांना महेंद्रसिंग धोनीची आठवण व्हावी. ऋषभ पंत जीवावर बेतलेल्या अपघातातून सावरत परतला होता. संपूर्ण स्पर्धेदरम्यान त्याने त्याच्या विकेटकीपिंग कौशल्याने चाहत्यांची मनं जिंकली. अपघात, त्यामुळे झालेल्या जखमा, शस्त्रक्रिया, रिहॅब प्रक्रिया या सगळ्यातून ऋषभने यशस्वी पुनरागमन केलं. अनेक महिने बंगळुरूतल्या नॅशनल क्रिकेट अकादमीत त्याने घेतलेली मेहनत ठसठशीतपणे दिसली. त्याचं विकेटकीपिंग आधीपेक्षा खणखणीत झालं.

वेस्ट इंडिज आणि अमेरिकेतील खेळपट्या पाटा स्वरुपाच्या नव्हत्या. इथे प्रत्येक धाव मोलाची होती. त्यामुळे वाचवलेली प्रत्येक धाव कामी आली. तीन धावा निघणार असतील तर दोन, दोन होणार असतील तर एक आणि एकेरी धाव असेल तर धाव नाहीच अशा पद्धतीने भारतीय संघाने फिल्डिंग केली. विराट कोहली, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव हे जगातल्या सर्वोत्तम फिल्डर्सपैकी एक आहेत. पण या स्पर्धेत प्रत्येक भारतीय खेळाडूने आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेशी फिल्डिंग केली. ओव्हरथ्रो टाळणं, रनआऊट करणं, थ्रो करताना बॅकअप जाणं, कॅच टिपताना गरज पडल्यास रिलेसाठी दुसरा खेळाडू येणं या गोष्टी आवर्जून पाहायला मिळाल्या. मुळात या संघातल्या कोणालाही लपवावं लागण्याची वेळ कर्णधार रोहित शर्मावर आली नाही. प्रत्येक सामन्यानंतर सर्वोत्तम फिल्डरला मिळणारं मेडल आणि तो सोहळा अनुभवणं हा आनंददायी अनुभव होता.

हेही वाचा – भारताच्या विजयानंतर बोलताना बुमराह झाला भावुक, ‘अँकर’ पत्नीशी संवाद साधून होताच मारली मिठी, पाहा VIDEO

जस्सी जैसा कोई नही!
Batsmen win you games, bowlers win you tournaments असं क्रिकेटविश्वात म्हटलं जातं. ही उक्ती भारतीय बॉलर्सनी तंतोतंत सिद्ध केली. जसप्रीत बुमराह हे कोडं प्रतिस्पर्धी फलंदाजांना उलगडलं नाही. नवा चेंडूने आक्रमण असो, मधल्या ओव्हर असो किंवा हाणामारीच्या ओव्हर्स- बुमराह आला की धावा आटतात आणि विकेट पडते हे समीकरण पक्कं झालं होतं. स्लोअरवन, कटर, बाऊन्सर, इनस्विंग, आऊटस्विंग अशी भात्यातली घोटीव अस्त्रं परजण्यात बुमराह वाकबगार आहे. प्रतिस्पर्धी फलंदाजांचा सखोल अभ्यास आणि स्वत:च्या कौशल्यांवर दृढ विश्वास यामुळे बुमराह हा कर्णधारासाठी आधारवड झाला. वर्ल्डकपसारखी मोठी स्पर्धा प्रदीर्घ काळ चालते. या काळात फिट राहणं, दुखापत होऊ नये यासाठी काळजी घेणं, भात्यात नवी अस्त्रं वाढवणं हे सगळं बुमराह इमानइतबारे करतो. वर्ल्डकपमध्ये बुमराहने टाकलेले काही चेंडू बॅट्समनसाठी अनप्लेयेबल असे होते. मौल्यवान पुरातन वस्तू-गोष्टी जपून ठेवल्या जातात. बुमराहचे वर्ल्डकपमधले काही स्पेल दर्दी क्रिकेटरसिकांनी मनाच्या कोंदणात कायमस्वरुपी जतन केले आहेत. फायनलमध्ये ३० चेंडूत ३० असं सहज समीकरण दक्षिण आफ्रिकेसमोर असतानाही बुमराहने दोन ओव्हर टिच्चून बॉलिंग केली. बुमराहच्या चार ओव्हर सोडूनच प्रतिस्पर्ध्यांनी डावपेचांची आखणी करावी असं एका माजी खेळाडूने म्हटलं आहे. इतकी त्याची दहशत प्रतिस्पर्धी बॅट्समनच्या मनात तयार झाली आहे. टेस्ट, वनडे आणि टी२० अशा तिन्ही प्रकारात अद्भुत सातत्यासह तो सर्वोत्तम प्रदर्शन करतो आहे. वर्ल्डकप स्पर्धेत मालिकावीराचा पुरस्कार बुमराहला मिळणं हे अगदी स्वाभाविक होतं. फक्त भारताच्या नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर अव्वल बॉलर्सच्या मांदियाळीत त्याचं नाव समाविष्ट झालं आहे.

कुलदीप-अक्षरच्या फिरकीचं जाळं
कुलदीप यादव आणि अक्षर पटेल- दोघेही डावखुरे फिरकीपटू पण दोघांचीही शैली पूर्णत: वेगळी. या दोघांनी वर्ल्डकप गाजवला असं म्हटलं तर वावगं ठरू नये. काही वर्षांपूर्वी आयपीएल स्पर्धेत मोईन अलीच्या कत्तलखान्याला सामोरं गेल्यानंतर कुलदीप आतून मोडला होता. पण रोहित शर्माला या युवा साथीदारावर विश्वास होता. तू तुझा वेग वाढव हा रोहितचा सल्ला कुलदीपने मानला. दुखापतीतून सावरतानाच कुलदीपने आपली अॅक्शन आणि कौशल्यांवर काम केलं. कुलदीपची चायनामन बॉलिंग प्रतिस्पर्ध्यांना कोड्यात टाकू शकते असा विश्वास रोहितला होता. रोहितचा विश्वास कुलदीपने सार्थ ठरवला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या करो या मरो लढतीत कुलदीपने अतिशय धोकादायक अशा ग्लेन मॅक्सवेलला तंबूत धाडलं आणि विजयाचा मार्ग सुकर केला. इंग्लंडविरुद्धच्या सेमी फायनल लढतीतही कुलदीपने ३ विकेट्स पटकावत विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. मॅचची पकड निसटतेय असं वाटत असतानाच कर्णधाराने चेंडू सोपवला की कुलदीपने विकेट पटकावल्याचं हमखास चित्र वर्ल्डकप काळात दिसलं. गेली अनेक वर्ष अक्षर पटेल रवींद्र जडेजाच्या छायेत वावरतो आहे. विकेट टू विकेट बॉलिंग, अतिशय उपयुक्त बॅटिंग आणि उत्तम फिल्डर यामुळे क्रिकेटच्या परिभाषेत जडेजाची लाईक अ लाईक रिप्लेसमेंट म्हणून अक्षरकडे पाहिलं गेलं. या वर्ल्डकपमध्ये जडेजा असतानाही अक्षरने स्वतंत्रपणे ठसा उमटवला. फायनलसारख्या दडपणाच्या मॅचमध्ये अक्षरला बॅटिंगमध्ये बढती देण्यात आली. दक्षिण आफ्रिकेच्या दर्जेदार आक्रमणाला पुरुन उरत अक्षरने ४७ धावांची शानदार खेळी केली. त्याने विराट कोहलीबरोबर केलेली भागीदारी भारतासाठी निर्णायक ठरली. इंग्लंडविरुद्धच्या सेमी फायनल लढतीत पॉवरप्लेमध्ये बॉलिंगला आलेल्या अक्षरने जोस बटलरचा अडथळा दूर केला आणि सामन्याचं चित्रच पालटलं. स्पर्धेदरम्यान अक्षरने नेहमीच्या खाक्याने शिस्तबद्ध मारा केला. मोक्याच्या क्षणी विकेट्स मिळवून दिल्या आणि फिल्डिंगमध्येही भरीव योगदान दिलं. दशकभर खेळत असूनही अक्षर नेहमी दुसऱ्या फळीत गणला जात असे. या वर्ल्डकपने बापू टोपणनावाने प्रसिद्ध अक्षरला ठोस ओळख मिळवून दिली आहे.

हेही वाचा – T20 World Cup Prize Money: भारताने टी-२० वर्ल्डकप जिंकताच कोट्यवधींचा वर्षाव, दक्षिण आफ्रिकालाही मिळाली मोठी बक्षिसाची रक्कम

रोहितचा फॉर्म आणि नेतृत्व
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ मध्ये पहिलावहिला टी२० वर्ल्डकप जिंकला होता. त्या भारतीय संघाचा रोहित शर्मा भाग होता. त्यापुढच्या प्रत्येक टी२० वर्ल्डकपमध्ये रोहित संघाचा अविभाज्य भाग होता. आयपीएल स्पर्धेत सगळे हंगाम खेळणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होतो. मुंबई इंडियन्सला पाच जेतेपदं मिळवून देण्यात रोहितच्या नेतृत्वाचा सिंहाचा वाटा आहे. या प्रदीर्घ अनुभवाचा चपखल उपयोग भारतीय संघाला झाला. रोहितने वर्ल्डकपदरम्यान सलामीला येत वादळी खेळी करत प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करण्याचे डावपेच आखले. पूल, हूकसह मैदानात चहूदिशांनी फटकेबाजी करण्यात माहीर रोहितने आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली. बॅट्समन रोहितइतकाच कॅप्टन रोहित भारतीय संघाच्या विजयात निर्णायक ठरला. बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये शिताफीने केलेले बदल, खेळाडूंशी सातत्याने संवाद आणि परिस्थितीचं अचूक आकलन यामुळे रोहितचं नेतृत्व भारतीय संघासाठी फलदायी ठरलं.

हार्दिक पंड्यामुळे संघाला संतुलन
वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी आटोपलेल्या आयपीएल स्पर्धेत हार्दिक पंड्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. मुंबई इंडियन्स संघाने पाच जेतेपदं मिळवून देणाऱ्या रोहित शर्माऐवजी हार्दिकला कर्णधार म्हणून नियुक्त केलं आणि सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग सुरू झालं. ही राळ मैदानातही पोहोचली. आयपीएल संपेपर्यंत हार्दिकला प्रचंड रोषाला सामोरं जावं लागलं. मुंबई इंडियन्सची कामगिरीही यथातथाच राहिली. याच काळात हार्दिकचा घटस्फोट झाल्याच्या बातम्याही समोर आल्या. मात्र या कशाचाही परिणाम होऊ न देता हार्दिकने वर्ल्डकप स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली. बॉलिंग आणि बॅटिंग दोन्हीमध्ये योगदान देत असल्यामुळे हार्दिकमुळे संघाला संतुलन मिळत असे. फायनलसारख्या तणावपूर्ण लढतीत हार्दिकने शेवटच्या ओव्हरमध्ये १६ धावांचा यशस्वी बचाव केला. वादळी खेळी करुन भारतापासून सामना हिरावून नेत असलेल्या हेनरिच क्लासनला हार्दिकनेच बाद केलं. डेव्हिड मिलरला बाद करत हार्दिकने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. हार्दिकने बुमराह आणि अर्शदीप सिंगच्या बरोबरीने तिसरा बॉलर म्हणून जबाबदारी सांभाळली. त्याचवेळी पाचव्या-सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत तिथेही हातभार लावला. उत्तम फिल्डर असल्यामुळे मैदानात कुठेही उभं केलं तरी हार्दिकने शंभर टक्के न्याय दिला.