मिस युनिव्हर्स २०२४ या स्पर्धेचा १७ नोव्हेंबर रोजी समारोप झाला असून ७३ व्या मिस युनिव्हर्सचा किताब डेन्मार्कच्या २१ वर्षीय व्हिक्टोरिया केयर थेलविगने पटकावला आहे. डॅनिश स्पर्धक मिस युनिव्हर्स होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या स्पर्धेत भारताच्या रिया सिंघा हिला अव्वल १२ मध्ये स्थान मिळविण्यात अपयश आले. २०२१ साली भारताने अखेरचा मिस युनिव्हर्स किताब पटकावला होता, जेव्हा हरनाझ संधू विजयी झाली होती. मिस युनिव्हर्स स्पर्धेचा इतिहास काय? या स्पर्धेची सुरुवात कशी झाली? स्पर्धेचा आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा संबंध काय? हे जाणून घेऊ या.

पहिली मिस युनिव्हर्स स्पर्धा कधी झाली?

विविध स्वरूपातील सौंदर्य स्पर्धा शतकानुशतके सुरू आहेत. आज आपल्याला माहीत असलेल्या मिस युनिव्हर्सच्या आधी मिस वर्ल्ड आणि मिस अमेरिका सारख्या स्पर्धा होत होत्या. खरं तर मिस युनिव्हर्स स्पर्धेचा जन्म मिस अमेरिकाची विजेती आणि कार्यक्रमाचे प्रायोजक पॅसिफिक निटिंग मिल्स कंपनी यांच्यातील वादातून झाला होता. पॅसिफिक निटिंग मिल्स ही कॅलिफोर्नियास्थित कंपनी होती. त्यांच्याकडील कॅटालिना स्विमवेअर नावाचा स्विमवेअर ब्रॅंड प्रसिद्ध होता. १९५१ मध्ये मिस अमेरिका विजेती योलांडे बेटबेझने तिच्या कॅथोलिक शालेय शिक्षणामुळे स्विमसूट परिधान केलेल्या चित्रांसाठी पोझ देण्यास नकार दिला. त्यानंतर पॅसिफिक निटिंग मिल्स मिस अमेरिकामधून बाहेर पडली आणि १९५२ पासून मिस यूएसए आणि मिस युनिव्हर्ससारख्या स्पर्धांचे आयोजन करू लागली.

Loksatta explained Robert Kennedy junior appointed as Secretary of Health America Donald trump
आरोपी बनणार कायदामंत्री… लसविरोधक बनणार आरोग्यमंत्री… ट्रम्प यांच्या सर्वाधिक धक्कादायक नियुक्त्यांनी स्वपक्षीयही हादरले!
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Kangana Ranaut forgot candidate name
Kangana Ranaut : कंगना पुन्हा चर्चेत, भर प्रचारात प्रत्यक्ष उमेदवाराकडेच बघून म्हणाल्या, “हे गृहस्थ कोण?” Video तुफान व्हायरल!
atul kulkarni maharashtra assembly election 2024
“आजच्याइतकी हतबुद्धता कधीही…”, अभिनेते अतुल कुलकर्णींची राजकीय स्थितीवर टोकदार भाष्य करणारी कविता!
Three engineering students drown in resort pool in Karnataka amid safety lapses shocking video
मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; एक वेळ तीन मैत्रीणी अन् मृत्यूचा थरार, नेमकं काय घडलं? VIDEO पाहून थरकाप उडेल
Pankaja Munde
Pankaja Munde : “तुमची नजर लागली अन् खासदाराऐवजी आमदार झाले”, पंकजा मुंडेंचं भरसभेत वक्तव्य; रोख कोणाकडे?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
डॅनिश स्पर्धक मिस युनिव्हर्स होण्याची ही पहिलीच वेळ आहे. (छायाचित्र-एपी)

हेही वाचा : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळल्याने ‘अफ्स्पा’ लागू ; याचा अर्थ काय? भारतीय लष्कराला विशेषाधिकार मिळणार का?

डोनाल्ड ट्रम्प आणि मिस युनिव्हर्सचा संबंध काय?

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे १९९६ ते २०१५ पर्यंत मिस वर्ल्डचे मालक होते. ट्रम्प यांचा ‘एनबीसी’बरोबर संबंध होता आणि २००३ पासून हा कार्यक्रम त्या वाहिनीवर प्रसारित केला जात होता. परंतु, मेक्सिकोच्या स्थलांतरितांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर एनबीसीने २०१५ मध्ये ट्रम्प त्यांच्याशी संबंध तोडले. “मेक्सिको आपल्या देशात अनेक समस्या असलेल्या लोकांना पाठवत आहे. ते लोक आपल्याबरोबर ड्रग्ज आणत आहेत, गुन्हेगारी आणत आहेत,” असे वक्तव्य ट्रम्प यांनी केल्याचे ‘द गार्डियन’ने आपल्या वृत्तात नमूद केले आहे. ट्रम्प यांनी नंतर ‘एनबीसी’चा हिस्सा विकत घेतला आणि ते कंपनीचे एकमेव मालक झाले. मात्र, काही दिवसांनी त्यांनी तो हिस्सा विकला. मिस युनिव्हर्सच्या वेळी ट्रम्प यांच्यावर लैंगिक वर्तनाचा आरोप झाला होता. २०१३ मध्ये या स्पर्धेचे आयोजन मेक्सिको येथे करण्यात येणार होते. त्यानंतर त्यांनी ट्विट केले होते, “पुतिन नोव्हेंबरमध्ये मॉस्कोमध्ये मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी जाणार आहेत असे तुम्हाला वाटते का? तसे असल्यास, ते माझे नवीन चांगले मित्र होतील का,” असा प्रश्न आपल्या ट्विटमधून ट्रम्प यांनी विचारला होता.

हेही वाचा : विधेयकाचा निषेध म्हणून महिला खासदाराचा ‘वॉर डान्स’; कुठल्या देशाच्या संसदेत घडला हा प्रकार?

सध्याच्या मालकाचा दिवाळखोरीसाठी अर्ज

सध्या मिस युनिव्हर्सची मालकी थाई समूह जेकेएन ग्लोबल ग्रुप आणि लेगसी होल्डिंग ग्रुप यूएसए इंक यांच्याकडे आहे. जेकेएन ग्लोबल ग्रुपच्या ॲनी जकापोंग जक्रजुटाटिपने मिस वर्ल्ड संस्था आणि ब्रँड विकत घेतला तेव्हा त्यांनी पहिली ट्रान्सवुमन आणि पहिली महिला म्हणून इतिहास रचला होता. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांच्या अंतर्गत २०२३ पासून माता आणि विवाहित महिलांना या स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी होती. परंतु, नोव्हेंबर २०२३ मध्ये जेकेएन ग्लोबलने दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला. जक्रजुटाटिपने नंतर इन्स्टाग्रामवर पोस्ट केले, “काहीही असो… मी नेहमी मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनला माझ्या आयुष्यात पहिले प्राधान्य दिले. ते कितीही आनंददायी किंवा वेदनादायक असले तरीही. मी आपल्या विश्वाच्या यशासाठी सर्व काही त्याग करेन!” यानंतर मिस युनिव्हर्समधील अर्धे स्टेक लेगसी होल्डिंगला विकले गेले.