How the Titanic wreckage was discovered: सागरी आपत्ती किंवा भर समुद्रात एखादे जहाज बुडणे म्हणजे नेमकं काय असतं याविषयी जनमानसात अनेक कथा, कल्पना प्रसिद्ध होत्या. परंतु या कल्पनांना छेद देण्याचे काम १९१२ साली इंग्लंड ते अमेरिकेदरम्यान प्रवास करणाऱ्या आरएमएस टायटॅनिकच्या अपघाताने केले. त्यानंतर १९९७ साली या अपघाताच्या कथानकावर आधारित आलेल्या चित्रपटाने या जहाजाची दुःखद कहाणी लोकप्रिय केली. परंतु विशेष गोष्ट म्हणजे या चित्रपटाआधी अनेक वर्षे या जहाजाचे अवशेष शोधण्याचे प्रस्ताव मांडण्यात आले होते. १९१२ पासून असे प्रयत्न झाले, परंतु त्या प्रयत्नांना फारसे यश येऊ शकले नाही. अखेरीस अमेरिकन समुद्रशास्त्रज्ञ रॉबर्ट बॅलार्ड यांनी १ सप्टेंबर १९८५ रोजी या बुडालेल्या जहाजाचा शोध लावला आणि पुढील काही दिवस हे काम अखंड सुरू राहिले. त्यामुळेच सप्टेंबर महिना हा टायटॅनिकच्या इतिहासातील महत्त्वाचा महिना मानला जातो. त्याच पार्श्वभूमीवर रॉबर्ट बॅलार्ड यांना टायटॅनिक शोधण्याची प्रेरणा कुठून मिळाली आणि या मोहिमेत कसे यश आले, याविषयी जाणून घेणे माहितीपूर्ण ठरावे.

टायटॅनिकचा शोध लागण्यासाठी अनेक दशकांचा कालावधी का लागला?

१४ एप्रिल १९१२ रोजी हिमखंडाशी टक्कर झाल्यानंतर टायटॅनिक बुडाले. ७०६ प्रवाशांना लाइफबोटीच्या मदतीने वाचवण्यात यश आले. तर १५१७ प्रवासी मरण पावले. या जहाजात असलेल्या आणि बचावलेल्या श्रीमंत लोकांनी त्यांचे बुडालेले सामान परत मिळवण्याकरिता या जहाजाचे अवशेष वर आणण्याचे प्रयत्न करण्यात आले.

AstroSat Nasa capture black hole eruption
कृष्णविवराभोवतीच्या तारकीय; अवशेषांतून नाट्यमय उद्रेक; आयुकाचा सहभाग असलेल्या आंतरराष्ट्रीय संशोधन गटाचा शोध
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
school bus accident thailand
स्कूलबसची सुरक्षा ऐरणीवर; थायलंडच्या दुर्देवी घटनेनंतर दक्षिण आशियात ठरतोय काळजीचा विषय
explosion that caused injuries and destroyed vehicles at outside the Karachi airport, Pakistan,
Blast in Pakistan : हल्ला की अपघात? पाकिस्तानच्या कराचीतील स्फोटात चिनी कामगारांचा मृत्यू; चीनच्या निवेदनात रोख कोणावर?
Man Kill father murderer after 22 Years
बदला पुरा! वडिलांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी २२ वर्ष वाट पाहिली, मोठा होताच त्याचपद्धतीने केली मारेकऱ्याची हत्या
Iran Israel Conflict
“बिन्यामिन नेतान्याहू २१ व्या शतकातील हिटलर”, इराणच्या भारतीय राजदूतांची टीका; भारताकडे मागितली मदत!
Crude Oil price hike
इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत ३ टक्क्यांनी वाढ; भारतातही पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार?
Big Finance Company Manger Suicide
Suicide : बड्या फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची आत्महत्या, कामाचा ताण, काढून टाकण्याच्या धमक्यांमुळे उचललं पाऊल
RMS Titanic pictured in Cobh Harbour
कोभ हार्बरमध्ये आरएमएस टायटॅनिक (विकिपीडिया)

परंतु लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे या जहाजाचा मलबा (अवशेष) हा खोल आणि मध्यवर्ती समुद्रात सुमारे १२,५०० फूट किंवा ३,८१० मीटरवर होता. माउंट एव्हरेस्ट हा ८,८४९ मीटर उंच आहे, यावरूनच आपण कल्पना करू शकतो की जहाजाचे अवशेष किती खोलवर जाऊन रुतलेले होते. टायटॅनिक बेलफास्ट स्मारकाच्या संकेत स्थळावर दिलेल्या माहितीनुसार या समस्येवर मात करण्यासाठी अनेक धाडसी प्रस्ताव मांडण्यात आले. जहाज पृष्ठभागावर तरंगण्यासाठी फुगे आणि इलेक्ट्रोमॅग्नेट्स वापरण्यासारखे उपाय सुचवण्यात आले. परंतु हे सगळे प्रयोग तांत्रिक आणि व्यवहार्य कारणांमुळे रद्दबादल ठरवण्यात आले. शिवाय निधीची कमतरता हे कारण होतेच. आणि बुडालेल्या जहाजाच्या अवशेषांची भग्न अवस्था हेही मुख्य कारण होते.

टायटॅनिकचे अवशेष शोधण्यामागे रॉबर्ट बॅलार्ड यांचा उद्देश्य काय होता?

बॅलार्ड हे १९६७ साली मॅसॅच्युसेट्समधील वुड्स होल ओशनोग्राफिक इन्स्टिट्यूटमध्ये एक तरुण शास्त्रज्ञ आणि अमेरिकेच्या नौदलात एनसीनं (ensign) म्हणून रुजू झाले. त्यांच्या ‘द डिस्कव्हरी ऑफ द टायटॅनिक’ या पुस्तकात त्यांनी म्हटले आहे की, त्यांनी बोस्टन सी रोव्हर्समध्ये नावनोंदणी केली. बोस्टन सी रोव्हर्स ही जगातील सर्वात जुन्या डायव्हिंग क्लबपैकी एक आहे. या क्लबच्या माध्यमातून त्यांनी खोल समुद्रात जाण्याची त्यांची आवड जोपासली. या क्लबच्या जिओफिजिस्टना जगभरात तज्ज्ञ मानले जाते. ६० च्या दशकात त्यांनी समुद्राच्या तळाशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती गोळा केली. नासाच्या वेट नासा या संकल्पनेमुळे या संस्थेची भरभराट झाली आणि ही संस्था चर्चेत होती. या कालखंडाचे वर्णन त्यांनी अद्वितीय असे केले आहे.

The bow of Titanic, photographed in June 2004
टायटॅनिक, जून २००४

त्या काळात बुडालेले सर्वात मोठे जहाज म्हणजेच टायटॅनिकशी संबंधित अनेक कथा-दंतकथा प्रचलित होत्या. त्यामुळे या जहाजाच्या शोधासाठी बॅलार्ड आधीपासूनच उत्सुक होते. तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे त्यांना त्या जहाजापर्यंत पोहचण्यास मदत झाली. तंत्रद्न्यानातील प्रगतीमुळेच सखोल शोध आता शक्य होता. डीप डाइव्ह करणाऱ्या यंत्रणेचा तळ पूर्वी स्टीलचा असायचा तो आता टायटॆनियम संयुगाचा झाला होता. याने खूप फरक पडणार होती. त्यामुळे डीप डाइव्ह यंत्रणेस थेट १३ हजार फुटांपर्यंत बुडी मारता येणार होती. बुडालेल्या टायटॅनिकचा वरचा भाग इथून, तुलनेने जवळ होता.

अखेर यश

१९७७ साली अयशस्वी मोहिमेनंतर, बॅलार्ड यांनी १९८५ साली फ्रेंच राष्ट्रीय समुद्रशास्त्रीय एजन्सी IFREMER (French Research Institute for Exploitation of the Sea) आणि एक्सप्लोरर जीन-लुई मिशेल यांच्या मदतीने पुन्हा प्रयत्न केला. या प्रयत्नाला अमेरिकन नौदलाने निधी दिला होता. अमेरिकन नौदलाने त्यापूर्वी १९६० च्या दशकात अटलांटिकमध्ये नाहीश्या झालेल्या थ्रेशर आणि स्कॉर्पियन या दोन पाणबुड्या शोधण्यासाठीही त्यांना निधी दिला होता. बॅलार्ड यांनी या पाणबुड्यांचा शोध घेतला होता आणि ते यशस्वीही झाले. म्हणूनच टायटॅनिकच्या शोधाचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले. त्यांनी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे कौतुक केले आहे. २०२१ साली त्यांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, अलीकडच्या काळात स्पेस आणि खोल समुद्रात जाण्यासाठी ज्या काही खाजगी मोहीम सुरु झाल्या आहेत त्या नव्या शोधाची ही नांदीच आहे.