भांडवली बाजारात, नवखे आणि सरावलेले गुंतवणूकदार वर्षभर जोशात होते. सप्टेंबर महिन्यात सेन्सेक्स-निफ्टीने सर्वोच्च उच्चांकी पातळी गाठली आणि याजोडीला भांडवली बाजारातील तेजीचा फायदा घेत अनेक कंपन्यांनी भांडवली बाजारात प्राथमिक बाजाराच्या माध्यमातून प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) करत नशीब आजमावले. त्यापैकी काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांच्या मत्तेत दुपटीने वाढ केली खरी, पण ती अल्पजीवी ठरली. याच पार्श्वभूमीवर प्रारंभिक समभाग विक्रीत गुंतवणूकदारांनी सहभागी होताना आणि गुंतवणूक करताना काय काळजी घेणे आवश्यक आहे हे जाणून घेऊया

आयपीओत गुंतवणुकीसाठी काय काळजी?

आयपीओ गुंतवणुकीचा निर्णय घेताना मसुदा प्रस्ताव अर्थात ‘ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’ (डीआरएचपी) तपासणे आवश्यक आहे. ‘ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’मध्ये कंपनीच्या व्यवसायासंबंधी संपूर्ण माहिती नमूद केलेली असते. यामध्ये प्रामुख्याने कंपनीची आर्थिक स्थिती, भविष्यातल्या योजना, मालमत्ता व जबाबदाऱ्या, नवीन व्यवसाय उपक्रमांमध्ये गुंतवणूक आणि धोरणात्मक भागीदारी, याबद्दल संपूर्ण माहिती असते. हा मसुदा प्रस्ताव सेबीच्या संकेस्थळावर उपलब्ध असतो. कंपनीचा व्यवसाय कुठला आहे, कुठे आहे, कंपनीचे प्रवर्तक कोण आहेत, कंपनीचा व्यवसाय कुठे चालतो, कंपनीची भूतकाळातील आणि वर्तमानातील कामगिरी कशी आहे, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवायला हवीत. ‘सेबी’ अथवा ‘आयपीओ’चे व्यवस्थापन पाहणाऱ्या कंपन्यांच्या वेबसाईटवर ‘निर्देश प्रॉस्पेक्टस’वरील माहिती उपलब्ध असते. ती वाचली पाहिजे. ‘आयपीओ’च्या वेळी शेअर वाजवी किमतीला मिळतात म्हणून गुंतवणूक करणे चुकीचे आहे. भविष्यात शेअर बाजारात तो शेअर आणखी कमी किमतीला मिळू शकतो. कंपन्यांकडून ‘आयपीओ’आधी बऱ्याचदा जाहिरातबाजी केली जाते. किंवा कंपनीच्या वस्तू आणि सेवांना किती मागणी आहे याचे चित्र रंगविले जाते. मात्र जाहिरातींतून कंपनीच्या खऱ्या कामगिरीचा अंदाज मिळेलच असे नाही. कंपनीच्या भविष्यातील योजना, आर्थिक स्थिती, त्यातील सातत्य आणि ‘आयपीओ’चा उद्देश बघणे आवश्यक आहे. गुंतवणूकदारांकडून ‘आयपीओ’ खुला झाल्यानंतर त्याला प्रतिसाद किती मिळाला आहे यावरून गुंतवणुकीचा निर्णय घेतात. मात्र ‘आयपीओ’ला मोठा प्रतिसाद मिळाला म्हणजे तो गुंतवणूकयोग्य आहे, हा निकषही चुकीचा ठरू शकतो.

Digital Arrest the biggest threat of the future
विश्लेषण: ‘डिजिटल अरेस्ट’ हा भविष्यातील सर्वात मोठा धोका?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
La Nina, The rainy season, climate patterns, global phenomenon
विश्लेषण : ‘ला निना’चा पावसाळी मुहूर्त चुकला! आता कडाक्याच्या थंडीबरोबर गारपिटीचीही शक्यता?
donald trump latest marathi news
विश्लेषण: अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांची अनपेक्षित मुसंडी कशी?
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…

हेही वाचा : विश्लेषण : ‘ला निना’चा पावसाळी मुहूर्त चुकला! आता कडाक्याच्या थंडीबरोबर गारपिटीचीही शक्यता?

आयपीओ आणण्यामागील नेमका उद्देश…

जेव्हा एखाद्या कंपनीला निधीची गरज असते, तेव्हा ती कंपनी प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून निधी उभारणी करत असते. प्रथमच निधी उभारणी करताना कंपनी सेबीकडे प्रस्ताव दाखल करते. आयपीओ आणणार असलेल्या कंपनीला आपले वित्तीय व्यवहार उत्तमच आहेत असे दाखवावे लागते. तरच गुंतवणूकदार आयपीओसाठी सकारात्मक प्रतिसाद देऊन पैसे गुंतवतील. मात्र आयपीओच्या माध्यमातून मिळवलेला निधी कंपनी नेमका कशासाठी वापरणार आहे, याचा विचार व्हायला हवा. कंपनीवर कर्जाचा डोलारा असेल आणि ते कर्ज फेडण्यासाठीच सगळे पैसे वापरले जात असतील; किंवा कंपनीचे व्यवसायाचे प्रारूप कसे आहे; अगदी सर्वसामान्य दर्जाचे असेल तर गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवताना पुन्हा विचार करायला हवा. बऱ्याचदा कंपन्या आयपीओच्या माध्यमातून निधी उभारताना प्रवर्तकांकडील हिस्सा आंशिक समभाग विक्रीच्या माध्यमातून विकतात, अशा वेळी प्रवर्तकांनी पूर्वी गुंतवलेल्या निधीवर त्यांना परतावा मिळतो. मात्र कंपनीला यातून कोणताही निधी प्राप्त होत नाही. मात्र काही कंपन्या आयपीओ आणताना कंपनीतील सध्याच्या गुंतवणूकदारांना त्यांची गुंतवणूक काढून घेण्याचा मार्ग उपलब्ध करून देतात. आयपीओच्या माध्यमातून नवीन समभागांची विक्री केल्यास त्यातून उभा राहणारा निधी हा नवीन प्रकल्प उभारण्यासाठी, कंपनीच्या विस्तारासाठी किंवा इतर दैनंदिन गरजा भागविण्यासाठी वापरला जाणार असेल तर असा निधी कंपनीच्या प्रगतीसाठी वापरला जाणार असल्याने त्यात गुंतवणूक करणे योग्य ठरू शकते.

कंपनीच्या व्यवसायाबद्दल काय जाणून घ्यावे?

कंपनीचे बिझनेस मॉडेल ओळखावे.

कंपनीला कोणत्या मार्गातून किती महसूल आणि नफा मिळतो आहे, कंपनीच्या व्यवसायाचे मार्ग कुठले, कंपनीच्या तयार होणाऱ्या वस्तूंचा बाजारपेठेतील खप किती आहे, कंपनी देशांतर्गत आणि परदेशातील महसुलावर किती अवलंबून आहे, इत्यादी. कंपनीचा व्यवसाय फक्त एकाच ठिकाणी एकाच बाजारपेठेवर अवलंबून असेल म्हणजेच केंद्रित असेल तर ते धोकादायक असते. याउलट कंपनीचा व्यवसाय विविध ठिकाणांहून होत असेल तर ते चांगले लक्षण आहे. काही वेळा कंपन्यांचा व्यवसाय हा सरकारच्या धोरणांशी निगडित असतो. सरकारी धोरण बदलले तर कंपनीचा व्यवसाय धोक्यात येईल अशी शक्यता वाटल्यास अशा कंपन्यांचा नीट अभ्यास करायला हवा.

हेही वाचा : ‘Aadhar Card’ला जन्म तारखेचा पुरावा मानण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; कारण काय? कोणती कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार?

पतमानांकन कंपन्या आणि विश्लेषकांचे म्हणणे…

आयपीओ बाजारात आणताना खासगी पातमांकान (क्रेडिट रेटिंग) कंपन्यांकडून आयपीओमध्ये गुंतवणूक करणे किती फायदेशीर आहे, शिवाय विश्लेषक देखील कंपनीच्या जमेच्या बाजू किंवा पडत्या बाजू कोणत्या आहेत ते जाणून घ्यायला हवे. कमी मानांकन असलेल्या किंवा धोकादायक अर्थात डिफॉल्ट मानांकन दाखवणारे आयपीओ धोकादायकच असतात हे विसरू नये.

मसुदा प्रस्ताव किती महत्त्वाचा?

कंपनीने सेबीकडे दिलेला मसुदा प्रस्ताव अर्थात प्रॉस्पेक्टस वाचणे आवश्यक आहे. प्रत्येक कंपन्यांच्या आयपीओच्यावेळी आपले जोखीम विषयक सर्व दस्तऐवज कंपन्या मसुदा प्रस्तावामध्ये नमूद केलेले असतात. कंपनीसह, भांडवली बाजार नियामक सेबी, मुंबई शेअर बाजार (बीएसई), राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) संकेतस्थळावर हा मसुदा प्रस्ताव उपलब्ध असतो. कंपनीबाबत विविध बारीकसारीक सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला त्यातून मिळते. यात अगदी तपशीलवार माहिती दिली असते, मात्र किमान पक्षी त्यातील ठळक बाबी वाचायलाच हव्यात.

हेही वाचा : Laxmi Vilas Palace: मराठी राजाने बांधलेला जगातील सर्वात मोठा राजवाडा गुजरातमध्ये; जाणून घ्या इतिहास

किती काळासाठी गुंतवणूक आवश्यक?

आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूक करताना आपण कंपनीविषयी सर्व माहिती जाणून गुंतवणूक केली पाहिजे, कारण आपण त्या कंपनीच्या व्यवसायात गुंतवणूक करत असतो, म्हणून दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास ती फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूक करताना किती कालावधीसाठी पैसे कमवण्यासाठी आपण गुंतवणूक करतो आहोत, हे आधीच निश्चित करावे.

Story img Loader