How To Get Back Lost Or Stolen Phone: आपल्यापैकी अनेकांचा मोबाईल फोन दिवसातील सर्वाधिक वेळ हातातच असूनही कित्येकवेळा गर्दीत इकडे तिकडे पडून हरवतो. ट्रेन, बस किंवा बाजारातही भात्यांकडून फोन पळवला जाण्याची उदाहरणे नवीन नाहीत. अशावेळी मूळ मालकाला आपला मोबाईल शोधता यावा यासाठी अनेक मोबाईल निर्मात्या कंपन्यांनीच लोकेशन ट्रॅकिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मोबाईल नंबर वरून आपणही आपला हरवलेला मोबाईल नेमका कुठे आहे किंवा चोरलेल्या मोबाईलचे नेमके स्थान कोणते अशी माहिती मिळवू शकता. काही स्मार्टफोनमध्ये तर केवळ ठिकाणच नव्हे तर मोबाईलच्या मालकाचे नाव व व्यवसाय याचीही माहिती उपलब्ध होऊ शकते.

मागील काही काळात सायबर घोटाळ्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकारच्या ट्रॅकिंग अ‍ॅपमुळे फेक कॉल करून लुबाडणाऱ्यांचे ठिकाण शोधण्यातही बरीच मदत होऊ शकते. पण या प्रकारच्या ट्रॅकिंग सुविधा कशा वापराव्यात व वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे याविषयी अनेकांना माहिती नसते. आज या लेखातून आपण लोकेशन ट्रॅकिंग सुविधांची सविस्तर माहिती पाहणार आहोत …

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
humanity exists in mumbai
मुंबईत खरंच माणुसकी आहे! रिक्षाचालकाने हरवलेला फोन परत आणून दिला, नेटकरी म्हणाले, “मुंबईचे लोक खूप प्रामाणिक आहे…”
Apple new Share Item Location feature
Share Bag Location: प्रवासादरम्यान लगेज हरवलं? आता चिंता सोडा, तुम्हाला मदत करणार शेअर बॅग लोकेशन
4 Ways to Find Your WiFi Password when You Forgot It
How To Find Wi-Fi Password: वाय-फायचा पासवर्ड विसरलात का? मग ‘या’ सोप्या टिप्स वापरा आणि मिळवा सेव्ह केलेला पासवर्ड
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?

व्हाट्सऍप लोकेशन ट्रॅकिंग

तुम्ही कधी व्हाट्सऍपवर लोकेशन ट्रॅकिंग फीचर वापरले आहे का? यामध्ये तुम्हाला तुमच्या संपर्कांसह तुमचे लाईव्ह लोकेशन शेअर करण्याची मुभा दिली जाते. याच प्रकारे तुम्ही तुमचा फोनही शोधू शकता. यासाठी स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असणारा जीपीएस ट्रॅकर वापरून नेमके ठिकाण शोधता येते. काही हेरगिरी करणाऱ्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या हरवलेल्या फोनचे ठिकाण व त्याची हालचाल सुद्धा ट्रॅक करता येते मात्र या सुविधा शुल्क भरून वापरता येतात.

निशुल्क लोकेशन ट्रॅकिंग

जर आपण निशुल्क सेवा शोधत असाल तर फोन लुक अप हा पर्याय नक्कीच विचारात घेऊ शकता. यामध्ये आपल्याला फोन कोणत्या भागात आहे हे सांगितले जाते. उदाहरणार्थ IME, या मोबाईल ट्रॅकिंग सेवेचा वापर करून आपण आपला हरवलेला मोबाईल मिळवू शकता यासाठी आपल्याला १५ अंकांचा एक कोड दिला जातो, हा कोड प्रत्येक मोबाईलसाठी वेगवेगळा असून IME प्रणालीच्या अंतर्गत मोबाईल शोधण्यासाठी वापरता येतो.

मोबाईल लोकेशन अ‍ॅप वापरण्याआधी या गोष्टी लक्षात ठेवा…

  • मोबाईल ट्रॅकिंग अ‍ॅपचे अनेक पर्याय अँड्रॉईड व ऍपल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहेत मात्र त्यातील कोणता निवडावा हे आपल्या लक्षात यायला हवे.
  • अ‍ॅप किती प्रकारच्या डिव्हाईसवर वापरता येईल हे तपासून पहा.
  • एक बेस्ट अ‍ॅप तुम्हाला केवळ मोबाईलच नव्हे तर तुमच्या लॅपटॉप, कॉम्पुटर, टॅब या तीन ही डिव्हाईसला जोडता यायला हवा.
  • तुम्ही वापरत असलेला अ‍ॅप एकाच वेळी एकाहून अधिक फोन ट्रॅक करू शकतो का हे तपासून घ्या.
  • तुम्ही वापरत असलेला अ‍ॅप वेळोवेळी अपडेट करत राहा.

विश्लेषण: चोरीला गेलेला मोबाईल कसा शोधाल? इंटरनेटची गरज नाही; सॅमसंगचे ३ स्मार्ट फीचर्स जाणून घ्या

मोबाईल लोकेशन ट्रॅकिंगचा वापर केवळ वैयक्तिकचे नव्हे तर कंपनीसाठीही केला जाऊ शकतो. विशेषतः फिल्डवर जाऊन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नेमके ठिकाण जाणून घेण्यासाठी अनेक कंपनींमध्येही हा पर्याय वापरला जातो.