आपल्या प्रियकर-प्रेयसीचे नाव शरीरावर आनंदाने गोंदतात. मात्र अनेकांना शरीरावर काढलेला टॅटू भविष्यात नकोसा वाटतो. याच कारणामुळे अनेक जण हा टॅटू मिटविण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. डॉक्टरांकडे, टॅटू काढण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीकडे जाऊन टॅटू मिटवतात. याच पार्श्वभूमीवर टॅटू मिटविण्यासाठी नेमके कोणते पर्याय उलब्ध आहेत? टॅटू मिटवताना त्रास होतो का? एकदा काढलेला टॅटू पुन्हा मिटतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या.

एकदा काढलेला टॅटू मिवटता येतो. टॅटू किती मोठा आहे? त्यासाठी कोणते रंग वापरलेले आहेत यावर तो मिटविताना होणऱ्या त्रासाचे प्रमाण अवलंबून असते. खूप जुने तसेच स्टिक अँड पोक टॅटू तुलनेने लवकर आणि सहजपणे मिटवता येतात. तर नुकताच काढलेला टॅटू मिटविण्यासाठी जास्त वेळ लागतो. टॅटू काढताना वापरण्यात आलेले काही रंग लवकर मिटवता येतात. तपकिरी, काळा, निळा, हिरवा अशा रंगांचे टॅटू लवकर मिटवता येतात. आकाराने मोठे आणि रंगीत टॅटू मिटविण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्वचेचा रंग काळसर असेल, तसेच एक्झीमा, हार्पिस अशा प्रकराचे त्वचारोग असतील तर टॅटू हटविण्यास त्रास होऊ शकतो. तसेच तो मिटविण्यासाठी कालवधीही जास्त लागू शकतो.

ai antibiotics loksatta article
कुतूहल : नव्या प्रतिजैविकांच्या शोधात ‘एआय’
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Lemons Really Help With Acidity?
तुम्हाला पित्ताचा त्रास आहे का? मग आहारात लिंबाचं सेवन करा अन् आराम मिळवा
behavior, offensive, past, someone behavior,
माणसं अशी का वागतात?
Ganpati powerful stotram and mantras
Ganesh Chaturthi 2024 : फक्त मोदक आणि दूर्वाच नाही ‘हे’ प्रभावी स्तोत्र आणि मंत्रही आहेत बाप्पाला प्रिय; नियमित पठण केल्यास बाप्पा देईल भरपूर आशीर्वाद
how to become a loco pilot training to become loco pilot
चौकट मोडताना : हळूहळू सकारात्मक होणारा समाजाचा दृष्टिकोन
how to avoid Discord in the family
सांदीत सापडलेले… : मतभेद
Drinking milk and jaggery before bed This Ayurvedic combo
रात्री झोपताना तुम्हालाही दूध पिण्याची सवय आहे का? मग १५ दिवसातून एकदा अशा प्रकारे करा दुधाचे सेवन; जाणून घ्या डॉक्टरांचे मत

हेही वाचा >>> विश्लेषण : देशाऐवजी फ्रँचायझींसाठी खेळावे… ‘आयपीएल’ फ्रँचायझींकडून इंग्लिश क्रिकेटपटूंना कोट्यवधींची भुरळ?

डर्माबरेशन म्हणजे काय?

डर्माबरेशन या प्रक्रियेंतर्गत वेगवेगळ्या वैद्यकीय साधनांचा वापर करून त्वचेचा वरचा भाग हटवला जातो. टॅटू मिटविण्यासाठीही या प्रक्रियेचा वापर केला जातो. ही प्रक्रिया तुलनेने वेदनादायी असते, त्यामुळे भूल देऊन ती पार पाडली जाते. डर्माबरेशन प्रक्रियेंतर्गत टॅटू हटविल्यास त्वचेवर जखम होते. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर या जखमेची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. जखम रोज साबण आणि पाण्याने धुवावी लागते. मलम किंवा अन्य औषध लावून या जखमेवर ड्रेसिंगही करावे लागते. टॅटू मिटविल्यानंतर झालेली जखम भरून येण्यासाठी साधारण १० ते १४ दिवस लागू शकतात.

लेझरने टॅटू मिटवणे

लेझरच्या मदतीने शरीरावरील टॅटू मिटवता येतो. या प्रक्रियेंतर्गत लेझरच्या मदतीने टॅटू काढण्यासाठी वापरण्यात आलेला रंग मिटविण्यात येतो. लेझरच्या मदतीने टॅटूवरील काळा रंग लवकर मिटवता येतो. वेगवेगळ्या रंगांचे टॅटू मिटविण्यासाठी वेगवेगळ्या लेझरचा उपयोग केला जातो. लेझरच्या मदतीने आकाराने लहान टॅटू लवकर मिटविता येतात. तर मोठे टॅटू मिटविण्यासाठीची प्रक्रिया थोडी वेळखाऊ आहे. लेझरच्या मदतीने संपूर्ण टॅटू एकदाच मिटविता येत नाही. टप्प्याटप्प्याने तो मिटवला जातो.

हेही वाचा >>>विश्लेषण : आरबीआयने अडूर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांच्या पैशांचे आता काय होणार?

लेझरच्या मदतीने टॅटू मिटविणे ही थोडी वेदनादायी पद्धत आहे. यामध्ये भूल देण्याची गरज नाही. मात्र टॅटूचे ठिकाण पाहून तसेच वेदना होण्याची शक्यता लक्षात घेऊन भूल देण्यासाठी क्रीमचा वापर केला जातो. तसेच लेझरच्या मदतीने टॅटू हटविल्यास बर्फ लावूनही होणारी वेदना कमी केली जाऊ शकते.

शस्त्रक्रियेच्या मदतीने टॅटू काढणे

शस्त्रक्रियेच्या मदतीनेही टॅटू कढता येतो. या प्रक्रियेंतर्गत टॅटू असलेली त्वचा काढून घेतली जाते. आकारने छोटे असलेले टॅटू मिटविण्यासाठी ही सर्वोत्तम पद्धत आहे. आकाराने मोठे टॅटू या पद्धतीने मिटवणे तेवढेसे सोईचे नाही. या प्रक्रियेंतर्गत टॅटूचा आकार पाहून भूल किती द्यायची हे ठरवले जाते.

हेही वाचा >>> विश्लेषण: पछाडलेल्या वास्तू, भीती, आणि हेरिटेज वॉक! का? कशासाठी?

टॅटू मिटविताना त्रास होतो का?

टॅटू मिटविताना काही प्रमाणात त्रास होऊ शकतो. प्रत्येकाच्या सहनशीलतेवरून हा त्रास कमी-अधिक असू शकतो. तसेच टॅटू मिटविण्यासाठीची प्रक्रिया पार पाडणाऱ्या व्यक्तीच्या कौशल्यावरही त्रास किती होणार हे ठरते. याच कारणामुळे अधिकृत आणि कुशल व्यक्तीकडून, त्वचातज्ज्ञांकडूनच टॅटू मिटवावा, असा सल्ला दिला जातो.