५ नोव्हेंबर २०२४ रोजी अमेरिकन नागरिक आपल्या पुढील राष्ट्राध्यक्षांची निवड करण्यासाठी मतदान करतील. या निवडणुकांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अधिकारी निवडणूक कर्मचाऱ्यांची सुरक्षा, मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेची सुरक्षा दोन्ही सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करत आहेत. अमेरिकेत राजकीय हिंसाचार वाढत असल्यामुळे कडेकोट सुरक्षेची गरज आहे. माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर ही स्थिती आणखीनच बिघडली आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत अटलांटा उपनगर एक प्रमुख रणांगण ठरत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक संचालकाने अलीकडेच इथे पाच तासांचे प्रशिक्षण सत्र आयोजित केले होते. परंतु, हे एक सामान्य निवडणूक प्रशिक्षण नव्हते. या सत्रात निवडणुका शक्य तितक्या सुरक्षितपणे पार पाडण्यासाठीचे धोरणे तयार करण्यावर भर दिला गेला. अमेरिकेत सुरक्षित मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्यांद्वारे कोणत्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत, त्यावर एक नजर टाकू.

अमेरिकेतील राजकीय हिंसाचार

कोब काउंटीचे निवडणूक संचालक टेट फॉल यांना एका मतदान कर्मचाऱ्याने त्रासदायक अनुभव सांगितल्यानंतर त्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक होते, असे त्यांनी सांगितले. मार्चमध्ये जॉर्जियाच्या अध्यक्षीय प्राइमरी निवडणुकीदरम्यान, मतदान कर्मचारी आणि मतदार या दोघांमध्ये वाद झाला. मतदाराकडे बंदूक असल्यामुळे तेथील परिस्थिती चिघळली आणि मतदान कर्मचारी हादरले. ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या तयारीसाठी देशभरातील स्थानिक निवडणूक संचालक सुरक्षा उपायांना चालना देत आहेत, असेही टेट फॉल यांनी सांगितले. २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीपासून, निवडणूक अधिकाऱ्यांना छळवणूक आणि अगदी जीवे मारण्याच्या धमक्यांचा सामना करावा लागला आहे. प्रामुख्याने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील निवडणूक फसवणूक आणि मतदान यंत्रांमध्ये हेराफेरी केल्याच्या दाव्यांमुळे प्रभावित झालेल्या व्यक्तींकडून असे कृत्य करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

maharashtra assembly election 2024 akot vidhan sabha constituency Prakash Bharsakale
अकोटमध्ये जातीय राजकारण कुणाच्या पथ्यावर?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rajasthan By-Election Independent candidate assault SDM
Rajasthan By-Election : अपक्ष उमेदवाराची अधिकाऱ्याला मारहाण; कार्यकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक, वाहनं पेटवली, जिल्ह्यात तणाव
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!
devendra fadnavis in kalyan east assembly constituency election
कल्याण : विषय संपल्याने रडारड करणाऱ्यांपेक्षा लढणाऱ्यांच्या पाठीशी रहा; देवेंद्र फडणवीस यांचा उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
suspension of recruitment in Chandrapur district bank due to Congress raise issue of recruitment in campaign
नोकरभरतीचा मुद्दा प्रचारात आणणारा काँग्रेस पक्ष तोंडघशी, चंद्रपूर जिल्हा बँकेतील नोकरभरतीला स्थगिती
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
entry to Narendra Modis meeting venue will be denied if objectionable items are brought
…तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत प्रवेशच मिळणार नाही!

हेही वाचा : रशियन सैन्याविरोधात युद्धात उतरणाऱ्या युक्रेनच्या ‘बुचा विचेस’ कोण आहेत?

गेल्या एका वर्षभरात ओहायोच्या कुयाहोगा काउंटीमधील निवडणूक कार्यालयाच्या खिडकीवर बंदुकीतून अनेकदा गोळीबार करण्यात आला होता. जॉर्जिया, मेन, मिशिगन आणि मिसुरीमधील सर्वोच्च निवडणूक अधिकाऱ्यांना बोगस कॉल करण्यात आले होते. यूएस सायबर सिक्युरिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक जेन ईस्टरली यांनी अलीकडील ऑनलाइन कार्यक्रमादरम्यान सांगितले की, “दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमक्या, त्यांचा छळ आणि काहींना मारहाण केली गेली. हे सांगणे माझ्यासाठी अत्यंत अपमानास्पद आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “हे लोक असे पैशांसाठी करत नाहीत, तर त्यांना असं वाटतं की असे करणे लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी योग्य आहे.”

अमेरिकेतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक संचालकाने अलीकडेच पाच तासांचे प्रशिक्षण सत्र आयोजित केले होते. (छायाचित्र-एपी)

यंदाच्या निवडणुकीत वेगळे काय आहे?

अमेरिकेतील सायबरसुरक्षा संचालकाने सांगितले की, तिच्या एजन्सीने २०२३ च्या सुरुवातीपासून निवडणूक कार्यालयांसाठी १००० पेक्षा जास्त भौतिक सुरक्षा मूल्यांकन केले आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांनी या मूल्यांकनांचा उपयोग धोके ओळखण्यासाठी, तसेच आवश्यक सुधारणांसाठी स्थानिक सरकारांकडून निधी मिळवण्यासाठी केला आहे. याव्यतिरिक्त, यूएस निवडणूक सहाय्य आयोगाच्या २०२२ च्या निर्णयामुळे बॅज रीडर, कॅमेरे आणि संरक्षणात्मक कुंपण यासारख्या सुरक्षा सुधारणांसाठी फेडरल निधी वापरण्याची परवानगी आता दिली गेली आहे. आगामी निवडणुकीसाठी, कॅलिफोर्नियामधील लॉस एंजेलिस काउंटी आणि उत्तर कॅरोलिनामधील डरहम काउंटीमध्ये सुरक्षा सुधारणांनी सुसज्ज अशी नवीन कार्यालये असणार आहेत. या सुधारणांमध्ये बुलेटप्रूफ काच, सुरक्षा कॅमेरे आणि बॅज-प्रवेश दरवाजे यांचा समावेश आहे. मेल किंवा येणारे पार्सल हाताळण्यासाठी नवीन प्रक्रियादेखील देशभरात लागू केल्या जातील.

डरहॅम काउंटीमधील नवीन कार्यालयाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इथे एक स्वतंत्र एक्झॉस्ट सिस्टमसह मेल प्रोसेसिंग रूम आहे. डरहम काउंटीचे निवडणूक संचालक डेरेक बोवेन्स यांनी मिशिगन आणि ऍरिझोनामधील निवडणूक अधिकाऱ्यांना येणाऱ्या धमक्या तसेच अनेक राज्यांतील कार्यालयांना पाठवलेल्या संशयास्पद पत्रांमुळे या सुरक्षा कठोर करण्याची आवश्यकता होती, असे सांगितले.

निवडणूक अधिकारी नोकरी का सोडत आहेत?

डेरेक बोवेन्स आणि इतर अधिकाऱ्यांनी वर्षानुवर्षे निवडणुकीत काम केले आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या नोकऱ्यांमध्ये लक्षणीय बदल झाला आहे. देशभरातील काही निवडणूक अधिकारी काम सोडून जात आहेत, त्यासाठी त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि त्यांचा होणारा छळ कारणीभूत असल्याचे सांगितले. काही ठिकाणी, निवडणूक कार्यकर्त्यांना डी-एस्केलेशन तंत्र आणि बंदूकधाऱ्यांना कसा प्रतिसाद द्यायचा याचे प्रशिक्षण दिले जात आहे. “इतकी सुरक्षा यापूर्वी यादीत नव्हती. आताची परिस्थिती बघता सुरक्षा वाढवणे भाग आहे,” असे नेवाडा येथील वाशो काउंटीमधील मुख्य निवडणूक अधिकारी कॅरी-ॲन बर्गेस यांनी सांगितले. “आमच्याकडे आता आपत्कालीन योजना आहेत, ज्या आम्ही तयार केल्या आहेत. आम्ही पूर्वीपेक्षा आता खूप सतर्क आहोत,” असेही त्यांनी सांगितले.

अमेरिकेत राजकीय हिंसाचार वाढत असल्यामुळे कडेकोट सुरक्षेची गरज आहे. (छायाचित्र-एपी)

पॅनिक बटणे, बुलेटप्रूफ ग्लास आणि बरेच काही

काउंटी मॅनेजर रोमिल्डा क्रोकामो निवडणुकीच्या दिवशी सुमारे १३० मतदान केंद्रांवर मतदान व्यवस्थापकांसाठी पॅनिक बटणे स्थापित करण्याचा विचार करत आहेत. पेनसिल्व्हेनिया कायदा पोलिस अधिकाऱ्यांना मतदानाच्या ठिकाणी प्रवेश करण्यास मनाई करतो. मात्र, क्रोकामो आणि त्यांची टीम स्थानिक अधिकाऱ्यांबरोबर काम करत आहेत; जेणेकरून एखादी दुर्घटना घडल्यास रेडिओद्वारे त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचू शकेल. अनेक स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यालयात आपली उपस्थिती वाढवली आहे, विशेषत: निवडणुकीच्या रात्री जेव्हा मतदान कर्मचारी मतपत्रिका आणि इतर साहित्याची ने-आण करतात. निवडणुकीच्या दिवसानंतर, मतप्रदर्शन आणि निकाल प्रमाणीकरणादरम्यान अतिरिक्त अधिकारी तैनात करण्याचेदेखील नियोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा : सावधान, अँटिबायोटिक्स घेताय? २०५० पर्यंत होऊ शकतो चार कोटी लोकांचा मृत्यू; कारण काय?

लॉस एंजेलिसमध्ये पोलिस अधिकारी संशयास्पद वस्तूंच्या सतर्कतेसाठी मेल मतपत्रिका स्कॅन करतील. हा एका व्यापक सुरक्षा धोरणाचा भाग आहे. लॉस एंजेलिस काउंटीच्या निवडणुकांवर देखरेख करणारे डीन लोगन यांनी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यावर भर दिला. त्यांनी मेल मतदानात व्यत्यय आणण्याच्या पद्धती सुचविणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट्सची नोंद घेतली आहे आणि हे व्यत्यय येऊ नयेत याची खात्री करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. नोव्हेंबरच्या निवडणुकीसाठी कार्यालयात चोवीस तास सुरक्षा आणि अतिरिक्त कर्मचारी असणार आहेत.