ऑलिम्पिक स्पर्धेत ५० किलो वजन गटातून अंतिम फेरी गाठलेली भारताची विनेश फोगट वजन अधिक भरल्यामुळे अपात्र ठरली आहे. यामुळे आता विनेश विजयमंचावर दिसणार नाही. तिला कुठलीच पदकाची लढत खेळता येणार नाही. हे असे का घडले किंवा वजनाविषयीचा नियम नेमका काय आहे या विषयी जाणून घेऊया…

विनेश फोगाट अंतिम फेरीसाठी अपात्र का?

विनेश फोगाट ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ५० किलो वजनी गटातून पात्र ठरली होती. पहिल्याच फेरीत गतविजेत्या सुसाकीला हरवून विनेशने सनसनाटी सुरुवात करून पुढे आणखी दोन प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध जिंकून अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीपूर्वी सकाळी घेण्यात आलेल्या वजन चाचणीत तिचे वजन अधिक भरल्याने विनेशला अपात्र ठरविण्यात आले.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
ngapur Egg prices risen early this year due to increased production costs
थंडी वाढताच अंड्याच्या दरात मोठी वाढ, थंडी आणि दरवाढीचा संबंध काय?
prajakta mali marathi actress reveals her weight
प्राजक्ता माळीचं वजन किती? भलंमोठं कॅप्शन लिहित केला खुलासा; म्हणाली, “लोक म्हणू लागलेत एवढी बारीक…”
Himanshi Khurana's Weight Loss Secret
दररोज पराठा खाणाऱ्या हिमांशी खुरानाने केले ११ किलो वजन कमी? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात?
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
56 year old police officer vishnu tamhane won iron man competition in australia
कौतुकास्पद : ५६ व्या वर्षी विष्णु ताम्हाणे या पोलिस अधिकाऱ्याने ऑस्ट्रेलियातील आयर्न मॅन स्पर्धा जिंकली

हे ही वाचा… PM Narendra Modi : “विनेश तू भारताचा गौरव आहेस, तुझा…”; पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया!

विनेशचे वजन किती अधिक भरले?

अंतिम फेरीपूर्वी घेण्यात आलेल्या वजन चाचणीत विनेशचे वजन १०० ते १५० ग्रॅम अधिक भरल्याचे समोर आले आहे. ५० किलो वजनी गटात अंतिम तसेच कोणत्याही लढतीपूर्वी स्पर्धक मल्लाचे वजन ५० किलोंपेक्षा अधिक भरणे नियमबाह्य ठरते.

जागतिक कुस्ती महासंघाचा नियम काय?

कुठल्याही महत्त्वाच्या स्पर्धेसाठी संयुक्त जागतिक कुस्ती महासंघाने वजनासंदर्भात (वेईंग) स्पष्ट नियम केले आहेत. यातील नियम ११ नुसार प्रत्येक वजनी गटातील सहभागी मल्लाचे वजन दोन वेळा घेतले जाते. यामध्ये त्या वजनी गटाची स्पर्धा सुरू होते, तेव्हा घेण्यात आलेल्या वजनानुसार तो किंवा ती कुस्तीगीर पात्रता फेरीपासून ते उपांत्य फेरीपर्यंतच्या लढती खेळू शकतो. रिपचाज आणि अंतिम फेरीच्या लढती या दुसऱ्या दिवशी खेळविण्यात येतात. त्यामुळे अंतिम फेरी आणि रिपचाजसाठी पात्र ठरलेल्या सर्व मल्लांची नव्याने वजने घेतली जातात. यामध्ये सहभागी मल्लाचे वजन हे त्याच्या वजन गटाइतके भरणे आवश्यक असते. म्हणजे एखादा मल्ला ५० किलो वजन गटात सहभागी होत असेल, तर त्याचे वजन ५० किलोच भरणे आवश्यक असते.

हे ही वाचा… Vinesh Phogat Olympics : विनेश फोगटची संघर्षमय कहाणी; आई ३२ व्या वर्षी विधवा, कर्करोग आणि समाजाशी एकटीने दिला लढा

वजन कमी करण्यासाठी वेळ दिला जातो का?

नियमानुसार अधिक वजन भरलेल्या मल्लास वजन कमी करण्यासाठी ठरलेला वेळ देण्यात येतो. विनेशलाही हा वेळ देण्यात आला होता. ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय महासंघाचे याबाबत नियम कडक आहेत. तेवढ्या वेळेतच तुम्हाला प्रक्रिया पार पाडावी लागते. विनेशला या वेळेतही वजन कमी करण्यात अपयश आल्याचे समजते.

आता पुढे काय?

आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघ आणि ऑलिम्पिक नियमानुसार एखादा मल्ल निर्धारित वजनीगटापेक्षा अधिक वजनाचा आढळल्यास त्याला अपात्र ठरविण्यात येते आणि त्या वजनी गटात त्या मल्लाला अखेरचे स्थान दिले जाते.

विनेशला वजन वाढल्याची कल्पना होती का?

उपांत्य फेरीची लढत झाल्यानंतर रात्री विनेशने वजन तपासले तेव्हा दोन किलो अधिक भरल्याचे जाणवले. तेव्हापासून विनेश नियमात बसण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करत होती. यासाठी विनेशने रात्र जागून काढली. जॉगिंग, दोरीच्या उड्या आणि सायकलिंग असे सर्व प्रयत्न केले. पण, यानंतरही तिचे वजन १०० ग्रॅम अधिक भरले.

हे ही वाचा… Vinesh Phogat Disqualified: ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटूंसाठी वजनाचे नियम काय असतात? वजन कसे ठरवले जाते?

विनेशला अशी समस्या यापूर्वी आली होती का?

विनेशने ऑलिम्पिक सहभागासाठी ५३ किलो वजनी गटातून संधी नसल्यामुळे ५० किलोची निवड केली होती. अशा वाढत्या वजनाची अडचण तिला ऑलिम्पिक पात्रता फेरीतदेखील आली होती. त्या वेळेसही ती अगदी थोडक्यात बचावली होती.

पदकाचे काय?

विनेशला पदक मिळणार नाही. तिच्याशी अंतिम फेरीत पोहोचलेल्या मल्लाला सुवर्णपदक दिले जाईल आणि कांस्यपदक लढतीतील विजेतीला कांस्यपदक दिले जाईल. पण ५० किलो महिला गटातील फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक कोणालाही दिले जाणार नाही.

Story img Loader