Independent India’s first Govt-led art exhibitions १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारतासाठी कलाकार आधुनिकतेच्या वाटा धुंडाळत असताना, स्वतंत्र भारताच्या पहिल्या वहिल्या सरकारने भारतातील कला आणि परंपरा साजरी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या भारत सरकारने भरवलेल्या या प्रदर्शनाचे नाव ‘Exhibition of Indian Art’ (भारतीय कलेचे प्रदर्शन) असे होते. या प्रदर्शनात ४,५००० वर्ष सिंधू कालीन कांस्य प्रतिमांपासून ते मध्ययुगीन राजस्थानी-मुघल लघुचित्रांपर्यंत वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. हे प्रदर्शन शासकीय भवनाच्या भव्य सभागृहात ६ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर १९४८ या कालखंडात आयोजित करण्यात आले होते. शासकीय भवन आता राष्ट्रपती भवन म्हणून ओळखले जाते. या प्रदर्शनाने भारतीय कलेतील दिग्गजांना आकर्षित केले, ज्यात एफ.एन सुझा आणि एम.एफ हुसैन यांचा समावेश होता. एम. एफ. हुसैन यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकात लेखक के. बिक्रम सिंग यांनी या प्रदर्शनासंदर्भातील हुसैन यांचे मत दिले आहे. त्यावेळेस हुसैन म्हणाले होते की, हे प्रदर्शन आनंद देणारे होते. एखाद्या पर्वताची उंची मोजायला जावे आणि नव्या पर्वत रांगेचा शोध लागावा असे हे प्रदर्शन. गुप्त शिल्प, भारतीय लोककलेतील निरागसता, आणि पहाडी तसेच बसौली चित्रांमधील रंग संगती पाहून मी काहीतरी मौल्यवान पाहत आहे याची मला खात्री झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा