भारताचे स्वदेशी लढाऊ विमान LCA तेजस मंगळवारी राजस्थानमधील जैसलमेर येथे कोसळले. खरं तर २३ वर्षांतील तेजस लढाऊ विमानाचा हा पहिला अपघात होता. या अपघातात वैमानिकाचा जीव बचावला, मात्र लढाऊ विमान पडल्यामुळे जैसलमेरमधील एका वसतिगृहाच्या काही भागाचे नुकसान झाले. या विमानाच्या अपघातानंतर ब्रिटिश कंपनी मार्टिन बेकरने एक ट्विट केले. “आज भारतीय वायुसेनेचे तेजस LCA विमान राजस्थानच्या जैसलमेरजवळ ऑपरेशनल ट्रेनिंग फ्लाइटदरम्यान कोसळले. वैमानिकाला मार्टिन बेकर (IN16G) सीटचा वापर करून यशस्वीरीत्या बाहेर काढले,” असेही ट्विटमध्ये म्हटले आहे. तेजस लढाऊ विमानात ब्रिटिश कंपनी मार्टिन बेकरची इजेक्शन (IN16G) सीट बसवण्यात आली होती. ही जगभरातील लढाऊ विमानांसाठी इजेक्शन सीट बनवणारी सर्वात मोठी कंपनी आहे. चीन आणि पाकिस्तानने बनवलेल्या जेएफ १७ या लढाऊ विमानातही या कंपनीच्या इजेक्शन सीट्स बसवण्यात आल्या आहेत. मार्टिन बेकर एअरक्राफ्ट कंपनी लिमिटेड ही विमानासाठी इजेक्शन सीट्स आणि सुरक्षा संबंधित उपकरणांची ब्रिटिश उत्पादक कंपनी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा