वाहननिर्मिती क्षेत्रातील ह्युंदाई मोटर इंडिया कंपनीने प्रारंभिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’कडे प्राथमिक अर्ज सादर केला आहे. कंपनी या माध्यमातून २५ हजार कोटी रुपयांचा निधी उभारणार असून, हा देशातील आजवरचा सर्वांत मोठा ‘महा-आयपीओ’ ठरण्याची शक्यता आहे. या येऊ घातलेल्या ‘महा-आयपीओ’बद्दल जाणून घेऊया. 

ह्युंदाई किती समभाग विकणार?

दक्षिण कोरियातील कंपनीच्या या उपकंपनीचा हा ‘आयपीओ’ मागील २० वर्षांतील कोणत्याही वाहन निर्मात्या कंपनीकडून देशाच्या भांडवली बाजाराला आजमावण्याचा पहिलाच प्रसंग असेल. या आधी मारुती सुझुकी कंपनीचा आयपीओ २००३ मध्ये आला होता. या खुल्या समभाग विक्रीनंतर ह्युंदाईचे बाजारमूल्य १.५ लाख कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे. ‘सेबी’कडे दाखल मसुदा प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर कंपनी हा  ‘महा-आयपीओ’ बाजाराला धडक देण्याची शक्यता आहे. दक्षिण कोरियातील पालक कंपनीकडून ह्युंदाई मोटार इंडियातील १७.५ टक्के हिस्सेदारी विकणार आहे. मारुती सुझुकीनंतर ह्युंदाई ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वाहन निर्मिती आणि निर्यातदार कंपनी आहे. कंपनी नवीन समभागांची विक्री आयपीओच्या माध्यमातून करणार नाही. तर सुमारे  १४.२२ कोटी समभाग हे ओएफएसच्या माध्यमातून विकणार आहे. म्हणजेच प्रवर्तकांकडील हिस्सेदारी आंशिक समभाग विक्रीच्या (ऑफर फॉर सेल- ओएफएस) माध्यमातून विकली जाणार आहे. सध्याचे भागधारक कंपनीतील त्यांचा समभाग हिस्सा कमी करून त्याची विक्री किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांना आयपीओच्या माध्यमातून करतील. यामध्ये ५० टक्के समभाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, ३५ टक्के समभाग किरकोळ गुंतवणूकदारांसाठी तर उर्वरित १५ टक्के समभाग हे गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असतील.

IPO
जागतिक स्तरावर आयपीओच्या माध्यमातून ८२२ कंपन्यांकडून ६५ अब्ज डॉलरची निधी उभारणी
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Sebi approves Hyundai and Swiggy IPOs print eco news
‘सेबी’कडून ह्युंदाई आणि स्विगीच्या महाकाय आयपीओंना मंजुरी; दोन्ही कंपन्यांकडून ३५,००० कोटींची निधी उभारणी अपेक्षित
Sensex, Indexes record high, Sensex latest news,
निर्देशांकांची विक्रमी शिखरझेप! सेन्सेक्स ८५ हजारांच्या वेशीवर
Amar Preet Singh
पाच हजार तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव असलेले एअर मार्शल अमर प्रीत यांची IAF च्या प्रमुखपदी नियुक्ती!
Sensex hits two century high
‘फेड’च्या व्याजदर कपातीनंतर निर्देशांकांची उच्चांकी मुसंडी, सेन्सेक्सची दोन शतकी उसळी
retail inflation rises to 3 65 percent in august second lowest level in 5 years
किरकोळ महागाई ऑगस्टमध्ये वाढून ३.६५ टक्क्यांवर; मात्र पाच वर्षातील दुसरा नीचांकी स्तर
bajaj housing finance ipo gets bids worth rs 3 25 lakh crore
बजाज हाऊसिंग फायनान्सच्या ‘आयपीओ’ला विक्रमी ३.२५ कोटींच्या बोली

हेही वाचा >>>पूनम पांडे, दु:खाचे भांडवल आणि लक्ष वेधण्याचा प्रकार; ‘सॅड फिशिंग’बाबतचे नवे संशोधन काय सांगते?

ह्युंदाईने सूचिबद्ध होण्याचा निर्णय का घेतला?

ह्युंदाईचे भारतातील वाढत्या बाजारपेठेतील संभाव्यतेचा फायदा करून घेण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. कंपनीचे मूल्यमापन वाढवणे हा प्रमुख उद्देश आहे. जागतिक पातळीवरील इतर प्रवासी वाहन निर्मात्या कंपन्यांच्या तुलनेत दक्षिण कोरियाच्या ह्युंदाईचे मूल्यांकन कमी आहे. करण्यासाठी वापरली जाते. भारतीय भांडवली बाजारात सूचिबद्ध होऊन तिचे उच्च मूल्यांकन प्राप्त करण्याची योजना आहे. शिवाय एक व्यापक गुंतवणूकदार आधार आकर्षित करण्याचे उद्दिष्ट असून त्या आधारे भारतीय व्यवसायातील मूल्य पुनर्प्राप्त करण्याचा प्रयत्न आहे. भारतीय भांडवली बाजारातील आशावाद लक्षात घेता, कंपनीला विश्वास आहे की, प्रवर्तकांसाठी त्यांचे भागभांडवल अंशतः कमी करण्याची ही योग्य वेळ आहे. कंपनीचे भारतातील कामकाज उर्वरित जगाच्या तुलनेत अधिक वेगाने वाढते आहे आणि सूचिबद्धतेमुळे मूल्य आणखी सुधारेल.

इतर कंपन्यांच्या तुलनेत कमाई कशी?

ह्युंदाईने सुरुवातीपासून ते डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत तिच्या भारतातील व्यवसायात ५.०४ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे २९,७४० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचा वार्षिक महसूल ५९,७६१ कोटी रुपये राहिला आहे. तिची एकूण मालमत्ता  १९,७७८ कोटी रुपये आहे. डिसेंबर २०२३ सरलेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत ह्युंदाई मोटर इंडियाची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. या कालावधीत तिचा महसूल ५२,१५७.९ कोटी रुपये होता. तर कंपनीला ४,३८२.८७ कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीची व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वीची कमाई आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील नऊ महिन्यांमध्ये ६,६१०.७ कोटी रुपये होती. या कालावधीत दक्षिण कोरियाच्या कंपनीची एकूण मालमत्ता १९,७७७.९१ कोटी रुपये होती.

हेही वाचा >>>EVM ‘बर्न्ट मेमरी व्हेरिफिकेशन’ काय असतं? सर्वोच्च न्यायालयाने का दिला आदेश?

इतर वाहन कंपन्यांच्या तुलनेत कामगिरी कशी?

ह्युंदाई इंडियाचा महसूल आर्थिक वर्ष २०२३ च्या अखेरीस ६०,३०७.५८ कोटी रुपये होता. भारतीय भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या इतर वाहन निर्मात्या कंपन्यांच्या तुलनेत ह्युंदाईचे उत्पन्न आणि नफा कमी आहे. केवळ प्रवासी वाहनांची निर्मिती करणाऱ्या मारुती सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष २०२३ च्या अखेरीस १,१७,५७१ कोटी रुपयांच्या महसूल नोंदविला. टाटा मोटर्सने ३,४५,९६७ कोटी रुपये आणि महिंद्र अँड महिंद्रने १,२१,२६८ कोटी रुपयांचा महसूल मिळवला. ह्युंदाई इंडियाची प्रति शेअर उत्पन्न (ईपीएस) २०२३ च्या ५७.९६ रुपये होते. त्यातुलनेत मारुती सुझुकीचे २७२.८२ रुपये, टाटा मोटर्सचे ६.३ रुपये आणि महिंद्रचे ९१.९६ रुपये राहिले होते.

विचारात घेण्याजोगी जोखीम कोणती?

कंपनीने भांडवली बाजार नियामक सेबीकडे सादर केलेल्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस अर्थात मसुदा प्रस्तावात, कंपनीने तिच्या व्यवसायाशी संबंधित काही जोखीम उघड केल्या आहेत. त्यापुढील प्रमाणे :

१. त्यांच्या दोन समूह कंपन्या, किया कॉर्पोरेशन आणि किया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या दोन्हीही एकाच प्रकारच्या व्यवसाय श्रेणीत आहेत, ज्यात हितसंबंधांचा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या व्यवसायावर विपरित परिणाम होऊ शकतो. 

२. ह्युंदाईच्या सध्या फक्त चेन्नई  प्रकल्पामध्ये प्रवासी वाहने आणि सुटे भाग तयार केले जातात. तळेगाव येथील उत्पादन प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर त्यांच्या उत्पादन प्रकल्पात कोणताही व्यत्यय किंवा काही कारणास्तव उत्पादन थांबल्यास, कंपनीच्या उत्पादन क्षमतेवर, कार्यावर आणि आर्थिक स्थितीवर विपरित परिणाम होऊ शकतो.

३. सरकारी प्रोत्साहनांची अनुपलब्धता, कपात किंवा उन्मूलन यांचा कंपनीच्या व्यवसायावर आर्थिक स्थितीवर, कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. रोख प्रवाहावरदेखील प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. ह्युंदाई मोटर इंडियाला भारत सरकार आणि राज्य सरकारकडून अनेक सवलती दिल्या जातात. अनेक प्रोत्साहनांचा कंपनीला फायदा होतो, यामध्ये सवलतीच्या दराने वीज, कर सवलत, गुंतवणूक प्रोत्साहन अनुदान आणि सीमा शुल्कात सवलत दिली जाते. मात्र धोरणातील बदलांमुळे या प्रोत्साहनात कपात केली जाऊ शकते. 

४. कंपनी भारतात एसयूव्ही श्रेणीतील वाहनांची मोठ्या प्रमाणावर विक्री करते. कंपनीच्या महसुलात एसयूव्ही श्रेणीतील वाहनांचा मोठा वाटा आहे. भविष्यात  एसयूव्ही प्रवासी वाहनांच्या विक्रीकर काही परिणाम झाला किंवा तिच्यास मागणीत होणारी कोणतीही घट किंवा व्यत्यय  कंपनीच्या कमाईवर विपरित परिणाम करू शकते.

५. ह्युंदाईच्या वाहनांचे सुटे भाग जसे की, ट्रिम्स, इंजिन्स आणि ट्रान्समिशन हे देशात आणि परदेशात तयार होतात. परदेशी पुरवठादारांच्या संयोजनातून स्टीलसारखे साहित्य तयार केले जाते. भूराजकीय तणाव निर्माण झाल्यास पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. सुट्या भागांच्या (मटेरियल) किमती वाढल्यास त्याच्या व्यवसायावर विपरित परिणाम होऊ शकतो.

गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे काय?

भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेली फक्त मारुती सुझुकी इंडिया प्रवासी वाहनांची निर्मिती करते. आता ह्युंदाई मोटर इंडिया गुंतवणूकदारांसाठी एक चांगली संधी आहे. इतर दोन सूचिबद्ध असलेल्या टाटा मोटर्स आणि महिंद्र या प्रवासी वाहनांबरोबरच वाणिज्य वाहनांचीदेखील निर्मिती करतात, यांचेही इतर व्यवसाय आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये ह्युंदाईने मजबूत वाढ दर्शवली आहे. ह्युंदाईचे प्रति शेअर उत्पन्न आर्थिक वर्ष २०२०-२१ मधील २३.१५ रुपयांवरून वाढून ते २०२२-२३ मध्ये ५७.९६ रुपयांपर्यंत वाढले आहे. मजबूत रोख प्रवाह, उत्पादन विकास, उत्कृष्ट विपणन आणि विक्रीमुळे ह्युंदाईचे भविष्य उज्वल आहे.

‘ई-व्ही’ किंमत स्पर्धात्मकतेवर भर कसा?

ह्युंदाई मोटर इंडिया भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) किंमतीच्या आघाडीवरील स्पर्धात्मकता वाढवण्याचा विचार करत असून, त्या दिशेने सेल, बॅटरी पॅक, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि ड्राईव्हट्रेन यांसारख्या प्रमुख भागांसाठी स्थानिक उत्पादन क्षमता विकसित करण्यावर आणि स्थानिक पुरवठा साखळी तयार करण्यावर ती लक्ष केंद्रित करत आहे. ‘आयपीओ’ तारखेच्या आसपास आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत क्रेटा ईव्हीसह भविष्यात, प्रत्येक किंमत विभागामध्ये आदर्श ठरेल अशी चार ई-व्ही मॉडेल्स आणण्याची तिची योजना आहे.

आतापर्यंतच्या पाच मोठ्या निधी-उभारणी?

कंपनी   निधी उभारणी (कोटी रु.)  तारीख

एलआयसी       २१,००८.४८    १७ मे २०२२

पेटीएम            १८,३००              १८ नोव्हें. २०२१

व्होडाफोन-आयडिया   १८,०००    २५ एप्रिल २०२४

कोल इंडिया लि.      १५,१९९.४४     ४ नोव्हें. २०१०

येस बँक            १५,०००          २७ जुलै २०२०

(यापैकी व्होडाफोन-आयडिया आणि येस बँके यांचे ‘एफपीओ’)

gaurav.muthe@expressindia.com