आजकाल सर्वकाही ऑनलाइन झाल्यामुळे अनेक कंपन्या नोकरी करताना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा देतात. घरी बसून पैसे कमावण्याची संधी असल्यामुळे अनेक जण वर्क फ्रॉम होमचाच पर्याय स्वीकारतात. मात्र, याच वर्क फ्रॉम होमच्या प्रस्तावाला बळी पडून अनेक लोकांची फसवणूक होते. फोन कॉल्स किंवा मेसेज करून ‘घरी बसून पैसे कमवा’ असे अनेक जण प्रलोभन देतात. विशेष म्हणजे अशा प्रलोभनांना बळी पडल्यामुळे आतापर्यंत कित्येक लोकांचे लाखोंचे नुकसान झालेले आहे. याच पार्श्वभूमीवर घरी बसून पैसे कमवण्याचे प्रलोभन दाखवून फसवणूक करणाऱ्यांपासून कसे दूर राहावे? अशा पद्धतीची फसवणूक नेमकी कशी केली जाते? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या..

वर्क फ्रॉमच्या नावाखाली फसवणूक

भारताच्या गृहमंत्रालयाच्या पुढाकाराने देशातील सायबर क्राईम रोखण्यासाठी इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरने (I4C) सांगितल्यानुसार देशात पार्ट-टाईम नोकरी किंवा घरी बसून पैसे कमावण्याचे आमिष दाखवून फसवणूक होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. I4C चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुमार यांनी गेल्या वर्षी पत्रकार परिषदेत माहिती दिली होती. अशा प्रकारच्या सायबर क्राईममध्ये आरोपी लोकांना डिजिटल जाहिराती, ऑनलाइन मेसेजिंग, बल्क एसएमएसच्या मदतीने लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. त्यातूनच नंतर नोकरीची गरज असणाऱ्या तरुण-तरुणींची फसवणूक केली जाते.

judge detained corruption charges
सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश लाचप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
fake police verification certificate, Anti-Terrorism Branch action, fake police verification certificate maker,
सावधान..! बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
25 lakh online fraud of senior citizens in kamothe panvel crime news
कामोठेत जेष्ठाची २५ लाखांची ऑनलाईन फसवणूक
Fraud of Rs 42 lakhs through social media Navi Mumbai crime news
नवी मुंबई: समाजमाध्यमाद्वारे ४२ लाखांची फसवणूक
online fraud of Rs 57 lakhs with senior citizen women on pretext of extra returns
जादा परताव्याच्या अमिषाने वृद्धेची ऑनलाईन ट्रेडिंगद्वारे ५७ लाखांची फसवणूक
ed to hand over assets worth 125 crores of mehul choksi to banks
पीएनबी गैरव्यवहार प्रकरणः मेहूल चोक्सीविरोधात ईडीची मोठी कारवाई, १२५ कोटींच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
taloja housing project fraud case court takes serious note of the plight of flat buyers
तळोजास्थित गृहप्रकल्प कथित फसवणूक प्रकरण : सदनिका खरेदीदारांच्या दुर्दशेची न्यायालयाने घेतली गंभीर दखल

वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याचीही फसवणूक

गेल्या वर्षी एका वरिष्ठ शासकीय नोकरदाराचीही अशाच पद्धतीने लाखोंची फसवणूक झाली होती. युट्यूबचे व्हिडीओ लाईक करून लाखो रुपये कमवा, असे आमिष या शासकीय अधिकाऱ्याला दाखवण्यात आले होते. अगदी काही तास काम करून भरपूर पैसे कमविण्याचे खोटे आश्वसन दिले जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडणाऱ्यांची संख्या बरीच आहे.

नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणारे मेसेज कसे ओळखावे?

नोकरी किंवा वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली लोकांची फसवणूक करण्यासाठी प्रथम मेसेजच्या माध्यमातून लोकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातो. असे प्रलोभन देणाऱ्या मेसेजेसचा मजकूर हा आकर्षित करणारा असतो. उदाहरणार्थ ‘घरबसल्या कमवा लाखो रुपये’ अशा प्रकारचे मेसेज लोकांना पाठवले जातात. हे मेसेज वाचून लोकांनी अधिक चौकशी करावी, असा यामागचा उद्देश असतो. या मेसेजेसमध्ये कमी काळात अधिक पैसे मिळतील, तसेच कामाचा मोबदला तत्काळ मिळेल असे सांगितले जाते. म्हणजेच कमी तास काम करून कामाचे पैसे एका आठवड्याच्या आत मिळतील, असे आश्वासन दिले जाते.

बघता बघता चार लाख २५ हजारांची फसवणूक

लोकांची फसवणूक कशी केली जाते, याबाबत दिल्लीचे डीसीपी (उत्तर) मनोज कुमार मीना यांनी सविस्तर माहिती दिली. “एका पीडित व्यक्तीला वर्क फ्रॉम होमच्या मदतीने पैसे कमावण्याची संधी आहे, असे सांगणारा एक मेसेज व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आला होता. या व्यक्तीने रस दाखवत अशा प्रकारे काम करण्यास होकार दिला. त्यानंतर या व्यक्तीला युट्यूबवरील काही व्हिडीओंच्या लिंक पाठवण्यात आल्या. या व्हिडीओंना लाईक करून पैसे कमवा, असे त्या व्यक्तीला सांगण्यात आले होते. सुरुवातीला पीडित व्यक्तीला कामाचा मोबदला म्हणून ४५० रुपये देण्यात आले होते.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी पीडित व्यक्तीने संबंधितांना अशाच प्रकारच्या कामाची मागणी केली. यावेळी पीडित व्यक्तीकडे ८०० रुपयांची मागणी करण्यात आली. अगोदर ८०० रुपये भरल्यास तुम्हाला आणखी काम दिले जाईल, असे त्या पीडित व्यक्तीला सांगण्यात आले. ८०० रुपये पाठवल्यानंतर पीडित व्यक्तीला पुढचे काम देण्यात आले. या कामातून त्या व्यक्तीने १०४०० रुपये कमावले. घरी बसून एवढे सारे पैसे मिळत असल्यामुळे या व्यक्तीचा त्या कामावर विश्वास बसला. त्यानंतर आरोपींनी त्या व्यक्तीला फसवले. बघता बघता या व्यक्तीची तब्बल चार लाख २५ हजार रुपयांची फसवणूक झाली होती”, असे मनोज कुमार मीना यांनी सांगितले.

तरुण-तरुणी बळी पडण्याचे प्रमाण जास्त

अशा प्रकारे नोकरी देण्याचे आमिष दाखवणारे कामाचे नेमके स्वरुप स्पष्टपणे सांगत नाहीत. तुम्ही नोकरीवर रुजू झाल्यानंतरच तुम्हाला याबाबत सविस्तर सांगितले जाईल, असे समोरून सांगितले जाते. असा प्रकार तुमच्यासोबत घडत असेल, तर वेळीच सतर्क व्हायला हवे. अशा प्रकारच्या फसवणुकीला बहुतांश तरुण मुले आणि मुलीच बळी पडतात, कारण तरुणांना नोकरीची गरज असते.

बँक खात्याची माहितीही विचारली जाऊ शकते

घरी बसून भरघोस पैसे कमावण्याचे आश्वासन देणाऱ्या लोकांकडून तुमची खासगी माहितीही विचारली जाऊ शकते. समोरून पाठवलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला दुसऱ्या आणखी एखाद्या वेगळ्या लिंकवर रिडायरेक्ट केले जाऊ शकते. यावर तुम्हाला तुमची खासगी माहिती विचारली जाऊ शकते. यामध्ये तुमच्या बँक खात्याची माहितीही विचारली जाऊ शकते.

फसवणुकीला बळी पडू नये म्हणून काय करावे?

घरी बसून पैसे कमवा असे सांगणारे मेसेज आल्यास ते नोकरीचा अर्ज करण्यासाठी काही पैशांची मागणी केली जात आहे का? ते तपासावे. पैशांची मागणी करणारी नोकरी स्वीकारणे टाळा. समोरची व्यक्ती तुम्हाला नोकरीवर घेण्यासाठी जास्त गडबड करत असेल किंवा फारच उत्सुकता दाखवत असेल तर वेळीच सावध व्हा. फसवणूक करण्यासाठी अशा प्रकारची गडबड सर्रास केली जाते.

समाजमाध्यमावरील खाते तपासा

तुम्हाला नोकरीची संधी देणारी संस्था ही प्रत्यक्षात विश्वासार्ह आहे का? याची तपासणी करा. संबंधित संस्थेचे समाजमाध्यमावरील तसेच Linkedin वरील खाते तपासा. तसेच त्या संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही समाजमाध्यम खाते तपासा. फसवणूक करणाऱ्या कंपन्या शक्यतो समाजमाध्यमावर नसतात.

मेसेजेसपासून दूर राहणे हाच पर्याय

तुम्हाला नोकरी देणाऱ्या संस्थेचा, व्यक्तीचा पत्ता तपासा. हा पत्ता तुमच्या शहरात असेल किंवा जवळ असेल तर प्रत्यक्ष जाऊन संबंधित कंपनीची कार्यालयात जाऊन चौकशी करा. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कमी काळात जास्त पैसे देण्याचे, घरी बसून, पार्ट टाईम काम करून भरघोस पैसे कमावण्याचे आश्वासन देणारे मेसेजेस हे फसवणुकीसाठी असतात. त्यामुळे अशा मेसेजेसपासून दूर राहणे हा सर्वांत योग्य पर्याय आहे. अशा प्रकारचे मेसेज करणाऱ्या व्यक्तीला ब्लॉक करावे.

Story img Loader