अॅस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्ड विद्यापीठ व सिरम इन्स्टिट्यूट यांनी मिळून तयार केलेल्या कोव्हिशिल्ड या लसीची सुरक्षितता वादात अडकल्यानंतर भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीबाबतही प्रश्न उपस्थित करणारा एक अभ्यास काही दिवसांपूर्वीच प्रकाशित झाला. या अभ्यासानुसार, कोवॅक्सिन लस घेतल्यामुळेही मानवी शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर भारतीय बनावटीच्या दोन्ही लसींसंदर्भात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (the Indian Council of Medical Research – ICMR) या अभ्यासाबाबतच अनेक प्रश्न उपस्थित केले असून, त्यांच्या दाव्यांनाही फेटाळून लावले आहे. स्प्रिंगरलिंक या संशोधन संस्थेने बनारस हिंदू विद्यापीठामध्ये कोवॅक्सिन लसीचे मानवी शरीरावर होणारे परिणाम अभ्यासले. डॉ. सांखा शुभ्रा चक्रवर्ती आणि त्यांच्या टीमने मिळून हा अभ्यास केला. मात्र, हा अभ्यास अत्यंत चुकीच्या मार्गाने केला असून, त्याची कार्यपद्धती सदोष असल्याची टिप्पणी ICMR ने केली आहे. स्प्रिंगरलिंक संस्थेने केलेला अभ्यास नेमका काय आहे? त्यावर ICMR चा आक्षेप का आहे? याबाबतची माहिती आपण घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा