इडली हा देशभरात अनेकांच्या रोजच्या न्याहरीचा पदार्थ. सात्विक इडली खाऊन अनेकजण दिवसाची सुरुवात करतात. मात्र आता इडलीही तब्येतीला अपायकारक होण्याची शक्यता निर्माण झाल्याने खवय्ये काळजीत पडले आहेत. कर्नाटकमध्ये इडली तयार करताना आरोग्य विभागाला तब्येतीला हानिकारक अशी रसायनं सापडल्याने खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही हॉटेल्स आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते इडल्या उकडवण्यासाठी सुती कपड्याऐवजी प्लास्टिक शीटचा वापर करत असल्याचे समोर आले आहे.या कारणामुळे कर्नाटक सरकार अन्नपदार्थ तयार करणाऱ्या उद्योगांमध्ये प्लास्टिक बंदी लागू करण्याच्या मार्गावर आहे. इडली हे सर्व भारतीयांसाठी एक पौष्टिक अन्न मानलं जातं. इडली पचनास हलकी, बिनातेलाची आणि मसाल्याची तयार होते. पण दुसरीकडे हीच इडली भोजनालयात किंवा रस्त्यावरील विक्रेते ज्या पद्धतीने तयार करतात,तेव्हा मात्र ती धोक्याची घंटा ठरू शकते. अशाप्रकारची इडली मग आरोग्यासाठी हानिकारक आणि कॅन्सरला कारणीभूत ठरू शकते असं कर्नाटक अन्न सुरक्षा विभागाचं म्हणणं आहे. जाणून घेऊ याचं कारण…

इडलीतील कॅन्सरला कारणीभूत ठरणारे घटक

साधारण २५१ हॉटेल्स आणि रस्त्यावरील विक्रेत्यांकडून बंगळुरूच्या आरोग्य विभागाने ५०० नमुने गोळा केले. याची प्रयोगशाळेत चाचणी केली असता त्यापैकी ५१ नमुने हे हानिकारक मानले गेले. रिपोर्ट्सनुसार, त्या हानिकारक नमुन्यांमध्ये कॅन्सरला कारणीभूत ठरणारी रसायनं आढळली आहेत. अद्याप इतर १०० नमुन्यांची चाचणी झालेली नाही.

इडली तयार करताना प्लास्टिकचा वापर

असे रसायनयुक्त नमुने आढळल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी जिथे इडल्या तयार केल्या जातात त्या हॉटेल्स आणि भोजनालयांची तपासणी केली. इडलीचे पीठ हे एका सुती कापडावर पसरवले जाते आणि त्यानंतर इडल्या पॅन किंवा स्टीमरमध्ये उकडवल्या जातात. अनेक हॉटेल्स आणि रस्त्यावरील दुकानांमध्ये आता कपड्याऐवजी प्लास्टिक शीट्स वापरल्या जातात. इडल्या उकडवताना या प्लास्टिक शीट्सचा वापर केल्याने कॅन्सरला कारणीभूत ठरतील अशी रसायनं निर्माण होतात असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

प्लास्टिक शीट्समुळे बीपीए, फ्थॅलेट्स एंडोक्राइन डिसरप्टिंग अशी रसायनं तयार होतात. अन्न शिजवताना ही रसायनं अन्नात मिसळतात. हे केमिकल्स शरीरात विषारी पदार्थ आणि मायक्रोप्लास्टिक्स सोडतात जे कालांतराने शरीरामध्ये साठू लागतात. या केमिकल्सचा साठा झाल्यास कॅन्सरचा धोका वाढतो. विशेषत: स्तनाचा आणि प्रोस्टेट कॅन्सरचा. हे केमिकल्स हार्मोनल संतुलन बिघडण्याला आणि चयापचय क्रियेत अडथळा निर्माण करण्यासही कारणीभूत ठरतात. उर्वरित नमुन्यांची तपासणी केल्यानंतर आरोग्य विभागाकडून अन्न व्यवसायात प्लास्टिक बंदी करण्यावर विचार केला जात आहे. तशी सूचनाही ते देऊ शकतात.

खाद्य व्यवसायात प्लास्टिक बंदी

इडल्या तयार करताना पॉलिथीन शीट्सचा वापर करणारी ५२ हॉटेलं आढळली आहेत असं कर्नाटकचे आरोग्य मंत्रा दिनेश गुंडू राव यांनी सांगितलं.
‘प्लास्टिकची पातळ शीट वापरल्याने कॅन्सरचा धोका निर्माण होतो. प्लास्टिक हे कार्सिनोजेनिक मटेरिअल आहे जे उष्णतेमुळे अन्नपदार्थांमध्ये शोषले जाते. कोणत्याही माध्यमातून ते शरीरात गेल्यास ते हानिकारकच ठरते. आणि या पद्धतीचा वापर करण्यावर आम्ही कारवाई करून त्यांना दंड आकारत ही पद्धत ताबडतोब बंद करण्याचे आदेश दिले आहेत’, असे आरोग्य मंत्री राव यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘कोणीही ही पद्धत वापरत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी अधिकाऱ्यांना माहिती द्यावी. अन्नसुरक्षा आणखी बळकट करण्यासाठी हे पाऊल आम्ही उचलले आहे. खाद्य उद्योगात कार्यरत माणसं आणि ग्राहकांना आमचं सांगणं आहे की कार्सिनोजेनिक घटक अन्नपदार्थांमध्ये वापरणे धोक्याचे ठरू शकते’. असोसिएशनचे अध्यक्ष पी सी राव यांनी अन्नपदार्थ तयार करताना प्लास्टिकच्या वापराबाबत चिंता व्यक्त केली आहे. कोणतेही नामांकित हॉटेल इडली तयार करण्यामध्ये कधीही प्लास्टिकचा वापर करत नाही. आम्ही आधीच या हॉटेल्सना या पद्धतीबाबत ताकीद दिलेली आहे असं राव यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितलं.

कर्नाटक सरकारने फेब्रुवारीच्या सुरूवातीला सरकारी व अनुदानित शाळांमध्ये दिले जाणारे शेंगदाणा चिक्कीचे मध्यान्ह भोजन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्या पदार्थ वापरल्या जाणाऱ्या सामग्रीच्या पौष्टिकतेच्या प्रश्नांमुळे घेण्यात आला होता. अंड्याला पर्याय म्हणून शेंगदाणा चिक्की मुलांना दिली जात होती. १७ फेब्रुवारीला निघालेल्या ऑर्डरमध्ये, या चिक्कीमध्ये किती कार्बोडायड्रेट्स, अनसॅच्युरेटेड फॅट आहे तसंच त्याच्या स्टोरेज आणि एकंदर गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. कर्नाटकात जवळपास ५.५ दशलक्ष मुलांना मध्यान्ह भोजन दिले जाते. त्यापैकी ३० टक्के केळी किंवा चिक्कीचा पर्याय निवडतात.

“२०२४मध्ये, राज्य सरकारने फूड कलर एजंट, रोडामाईन-बी जे मोठ्या प्रमाणात गोबी मंच्युरियन आणि कॉटन कँडीमध्ये वापरले जाते. आम्ही गोबी मंच्युरियनविषयी चाचणी केली असता त्यामध्ये भयंकर हानीकारक असे रोडामाईन-बी वापरले जाते. हे अतिशय घातक असे कलरिंग एजंट आहे आणि त्यामुळेच आम्ही त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. सरकारचे आदेश न पाळल्यास सात वर्षे किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते आणि १० लाखांपर्यंत दंड देखील आकारला जाईल”, अशी माहिती पी सी राव यांनी दिली. जून २०२४मध्ये मासे, चिकन आणि भाज्यांपासून बनवले जाणारे कबाब यामध्ये वापरले जाणारे आर्टिफिशियल कलर वापरावरही बंदी घालण्यात आली होती. २००६च्या फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अॅक्टनुसार ही बंदी घालण्यात आलेली आहे.