– ज्ञानेश भुरे

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गोलरक्षकांची कामगिरी सर्वांत निर्णायक ठरताना दिसते आहे. त्यांचा प्रभाव सर्वाधिक राहिला आहे. लवचिकता, धैर्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी या खेळाच्या रंजकतेत भरच टाकली आहे. या गोलरक्षकांच्या कामगिरीवर टाकलेला हा प्रकाशझोत…

hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
56 year old police officer vishnu tamhane won iron man competition in australia
कौतुकास्पद : ५६ व्या वर्षी विष्णु ताम्हाणे या पोलिस अधिकाऱ्याने ऑस्ट्रेलियातील आयर्न मॅन स्पर्धा जिंकली
Sharad Pawar asserts that distrust in the electoral system should be removed print politics news
मारकडवाडीवरून कलगीतुरा, निवडणूक यंत्रणेबद्दल अविश्वास दूर करा; शरद पवारांचे मारकरवाडीत प्रतिपादन
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
Prithviraj Chavans statement regarding the election results satara
निवडणुकीच्या निकालाबाबत सरकारची दडपशाही ब्रिटिशांपेक्षाही वाईट: पृथ्वीराज चव्हाण
India vs Australia Border Gavaskar Trophy Australia dominate in second Test sport news
पिछाडीनंतर पडझड, भारतीय फलंदाजांकडून निराशाच; हेडच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाचा दबदबा
people of Maharashtra raised doubts about voting through EVMs and role of Election Commission
ईव्हीएम विरोधातील लढाईची दिशा मारकडवाडीने देशाला दिली: अतुल लोंढे

गोलरक्षकांच्या कामगिरीचा संघाच्या यशात किती वाटा?

साखळी सामन्यातून आगेकूच करताना अभावानेच गोलरक्षकाच्या भूमिकेकडे लक्ष जाते. मात्र, जेव्हा स्पर्धा बाद फेरीत जाते, तेव्हा गोलरक्षकाचे महत्त्व अधोरेखित होते. विजेतेपदाच्या अंतिम ध्येयाकडे प्रवास करताना संघांना प्रमुख खेळाडूंची गरज असते यात शंकाच नाही. अर्जेंटिना, क्रोएशिया, फ्रान्स आणि मोरोक्को या उपांत्य फेरी गाठलेल्या संघांकडे अशा खेळाडूंचा ताफा आहे. मात्र, त्यांच्याकडे बचाव अभेद्य राखणारे गोलरक्षकही आहेत. या चारही संघांचे विजेतेपदाचे स्वप्न जिवंत राहण्यासाठी या गोलरक्षकांची कामगिरी तेवढीच महत्त्वची ठरली आहे. पेनल्टी शूट-आऊट असो किंवा नियोजित वेळेतील गोलपोस्ट समोरील चुरशीचे क्षण, प्रत्येक वेळेस हे गोलरक्षक आपल्या संघांसाठी निर्णायक भूमिका बजावत आहेत.

बाद फेरीपासूनच गोलरक्षकांची जबाबदारी कशी वाढली?

कतारमधील फुटबॉल स्पर्धा ही एकूणच फुटबॉलमध्ये झालेल्या बदलाचे प्रतीक ठरली आहे. या स्पर्धेत साखळीत गटातील एकही संघ तीनही सामने जिंकू शकलेला नाही. दुसरे म्हणजे सर्वाधिक खेळ हा मैदानाच्या मध्येच झाला. साखळीत ‘सेट पीस’वर केवळ दोन गोल झाले. साखळीतील स्पेन, इंग्लंड, पोर्तुगालचा मोठा विजय वगळता सामन्यांत फारसे गोलही झाले नाहीत. बाद फेरीत मात्र हे चित्र बदलले. सगळेच संघ तावून सुलाखून आल्यामुळे प्रत्येकाचा खेळ उंचावला आणि प्रत्येकाच्या विजेतेपदाच्या उर्मीने जोर धरला. फुटबॉलमध्ये आता कुठला संघ कमी किंवा मोठा असा भेदभाव राहिलेला नाही. बहुतेक खेळाडू वर्षभर विविध लीगमध्ये खेळत असल्याने त्यांना चांगला अनुभव मिळतो आहे. त्याचेच प्रत्यंतर बाद फेरीपासून आले आणि संघाच्या विजयातील गोलरक्षकाची भूमिका किती महत्त्वाची हे समोर आले. बाद फेरीत सामना ९० मिनिटांत बरोबरीत राहिला, तर ३० मिनिटांचा अतिरिक्त वेळ. यातही बरोबरीची कोंडी न फुटल्यास शेवटी पेनल्टी शूट-आऊट. खेळ शूट-आऊटपर्यंत नेण्यापेक्षा नियोजित वेळेत संपविण्यासाठी खेळाडू प्रयत्नशील असतात. मात्र, त्यांना प्रत्येक वेळी यश मिळतेच असे नाही.

सर्वाधिक एकाग्र राहण्याची गरज?

मैदानात खेळाडू प्रतिस्पर्धी खेळाडूंना चकवण्याचा प्रयत्न करून जेव्हा प्रतिस्पर्ध्याच्या गोलकक्षात मुसंडी मारतात, तेव्हा त्या सर्व खेळावर गोलरक्षकाची बारीक नजर असते. त्याला आपले चित्त जराही विचलित करता येत नाही. मैदानातील खेळाचा शेवट आपल्यापाशी होणार आहे हे गोलरक्षक जाणून असतो. त्याला स्वतःला आपले नियोजन ठरवायचे असते. त्यामुळेच तो संपूर्ण खेळाचा सर्वांत जवळचा साक्षीदार असतो. त्याला चेंडूवरून नजर हटवता येत नाही. एकाग्रता आणि आत्मविश्वासाच्या जोरावर गोलरक्षक आपल्या संघावर गोल होऊ नये म्हणून एखाद्या भक्कम भिंतीप्रमाणे उभे असतात.

अर्जेंटिनाच्या कामगिरीत मार्टिनेझचा प्रभाव कसा पडला?

एमिलियानो मार्टिनेझ हा तांत्रिकतेच्या आघाडीवर कमालीचा प्रगल्भ असा गोलरक्षक आहे. कोपा अमेरिका २०२१ स्पर्धेत अर्जेंटिनाच्या विजयात मार्टिनेझची निर्णायक भूमिका होती. त्यामुळे मायदेशात त्याला वेगळाच दर्जा प्राप्त झाला. कोपा अमेरिका स्पर्धेत त्याने उपांत्य फेरीत शूट-आऊटदरम्यान प्रतिस्पर्धी कोलंबियाच्या तीन पेनल्टी वाचवल्या. गोलरक्षण करताना सतत बडबड करत राहणे हे त्याचे वेगळेपण. या बडबडीमुळे पेनल्टी घेणारा खेळाडू अस्थिर होतो. आता विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड्सच्या व्हर्जिल व्हॅन डाइक आणि स्टिव्हन बर्गहॉसच्या किक अडवून पेनल्टी विशेषज्ञ म्हणून आपली प्रतिष्ठा मार्टिनेझने उंचावली. विशेष म्हणजे अर्जेंटिनासाठी २४ सामने खेळताना तो एकदाच पराभूत झाला आहे. हा पराभव याच स्पर्धेत सौदी अरेबियाविरुद्धचा आहे.

क्रोएशियाच्या विजयात लिव्हाकोव्हिचे महत्त्व किती?

चार वर्षांपूर्वी रशियात झालेल्या स्पर्धेत डेन्मार्क आणि रशियाविरुद्ध क्रोएशियासाठी गोलरक्षक डॅनियल सुबासिच नायक ठरला होता. त्यावेळी लिव्हाकोव्हिच क्रोएशियाचा पर्यायी गोलरक्षक आणि सुबासिचचा कट्टर समर्थक होता. सुबासिचच्या माघारी लिव्हाकोव्हिच क्रोएशियाचा पहिल्या पसंतीचा गोलरक्षक ठरला. डायनॅमो झाग्रेबच्या या अवलियाने कतारमध्ये जपान आणि ब्राझीलविरुद्धच्या विजयात कमालीची कामगिरी केली. दोन शूट-आऊटमध्ये आठ पैकी केवळ तीन किक लिव्हाकोव्हिचविरुद्ध यशस्वी झाल्या. ब्राझीलविरुद्ध नियोजित वेळेतही लिव्हाकोव्हिच अभेद्य भिंतीसारखा उभा राहिला होता. यंदाच्या लिव्हाकोव्हिचच्या कामगिरीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने सर्वाधिक ११ प्रयत्न फोल ठरवले आहे. विश्वचषक स्पर्धेत २०१४ नंतर एखाद्या गोलरक्षकाची कामगिरी प्रथमच झाली आहे.

फ्रान्ससाठी ह्युगो लॉरिसचे योगदान कसे राहिले?

संयम, स्थिरचित्त आणि अफाट गुणवत्तेचे दुसरे नाव म्हणजे फ्रान्सचा गोलरक्षक ह्युगो लॉरिस. दांडगा अनुभव हे त्याचे वैशिष्ट्य. या स्पर्धेत त्याने फ्रान्ससाठी सर्वाधिक सामने खेळण्याच्या लिलियन थुरमचा विक्रम मागे टाकला. इंग्लिश क्लब टॉटनहॅमकडून खेळणाऱ्या लॉरिसने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात खेळताना ही कामगिरी साधली. म्हणूनच फ्रान्सचे खेळाडू त्याला फ्रान्स संघाचा आत्मा आणि हृदय मानतात. इंग्लंडविरुद्ध २-१ असा विजय मिळविताना त्याचे निरीक्षण महत्त्वाचे ठरले. इंग्लंडचे हॅरी केन टॉटनहॅमकडून खेळतो. त्यामुळे त्याच्या खेळाची माहिती लॉरिसला फ्रान्सविरुद्ध फायद्याची ठरली. कर्णधार म्हणून सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता बनण्यासाठी तो उत्सुक आहे. फ्रान्ससाठी १४३ सामने खेळताना लॉरिसने ६२ थेट किक अडवल्या आहेत.

हेही वाचा :

बोनोचे गोलरक्षण मोरोक्कोसाठी कसे प्रेरक ठरले?

प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या धोकादायक किक अडवण्यासाठी बोनो ओळखला जातो. अन्य खेळाडूंप्रमाणे बोनो कतारमध्ये इतिहास घडविणाऱ्या मोरोक्को संघाच्या यशाचा एक साक्षीदार ठरणार आहे. गट साखळीत कॅनडाविरुद्ध ॲग्युएर्डचा स्वयंगोल वगळल्यास बोनोची पाटी तशी कोरीच राहिली. साखळीत त्याने हा एकमेव गोल स्वीकारला. स्पेनविरुद्ध पेनल्टी शूट-आऊटमध्ये बोनोची कामगिरी विलक्षण राहिली. पण, त्याहीपेक्षा पोर्तुगालविरुद्धच्या सामन्यातील कामगिरीने त्याला मोरोक्कोत हिरो बनवले. रोनाल्डोच्या गैरहजेरीत पोर्तुगालच्या जोओ फेलिक्सच्या किक तोफगोळयाप्रमाणे धडाडत असतना बोनोने चमत्कार वाटावा अशा पद्धतीने त्याचे प्रयत्न हाणून पाडले. विशेष म्हणजे ला लिगा स्पर्धेत सेव्हिया संघाच्या विजयासाठी प्रयत्न करताना त्याने ९४व्या मिनिटाला गोलही नोंदवला आहे.

Story img Loader