INAH पुरातत्त्वशास्त्रज्ञांना मेक्सिकोमध्ये मानवी हाडांपासून तयार केलेला नाकाचा दागिना (नथ/फुली) सापडला आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीप्रमाणे प्राचीन मेक्सिकन स्त्रियांनाही नथीची हौस असल्याचे आपल्याला वाटत असले तरी प्रत्यक्षात हा अलंकार नक्की कोण घालत होते या विषयी अभ्यासकांनी पुरातत्त्वीय पुराव्यांच्या माध्यमातून वेगळेच सत्य समोर आणले आहे, त्याविषयी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्थ्रोपोलॉजी अँड हिस्ट्रीच्या (INAH) पुरातत्त्वशास्त्रज्ञांना मेक्सिकोतील पॅलेन्के या प्राचीन माया शहरात मानवी हाडापासून तयार केलेला नाकाचा दागिना सापडला आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या नव्या शोधाकडे लागले आहे. हा सापडलेला अलंकार ‘माया संस्कृती’शी संबंधित आहे.

माया संस्कृती

माया संस्कृती ही एक मेसोअमेरिकन संस्कृती होती; ही अमेरिकेतील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. ही संस्कृती प्राचीन मंदिरे आणि ग्लिफ्ससाठी ओळखली जाते. माया लिपी ही प्री-कोलंबियन अमेरिकेतील सर्वात उच्च दर्जाची विकसित लेखन प्रणाली आहे. ही संस्कृती जवळपास ३,३०० वर्षे जुनी असल्याचे अभ्यासक मानतात.

माया संस्कृती इसवी सनपूर्व १० वे शतक ते इसवी सन १६ वे शतक या कालखंडात विकसित झाली. या संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने दक्षिण मेक्सिको, ग्वातेमाला, हॉन्डुरस आणि एल् साल्वादोरच्या प्रदेशात झाला. १५ व्या शतकात या भागांमध्ये आलेल्या स्पॅनिश धर्मप्रसारकांमुळे या संस्कृतीच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. माया संस्कृती ही अभ्यासकांनी प्राचीन, मध्य, अर्वाचीन या तीन भागांमध्ये विभागली आहे. प्राचीन कालखंड इ. स. पू. १००० ते इ. स. ३०० पर्यंत होता, मध्य इ. स. ३०० पासून ते इ. स.९०० पर्यंत , तर अर्वाचीन इ. स.१००० ते १६०० पर्यंत होता.

आणखी वाचा : विश्लेषण: ‘इंडिया’ म्हणजे भारत पण हिंदुस्थान नाही…

नाकातली नथ नक्की कोणाची?

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्थ्रोपोलॉजी अँड हिस्ट्री (INAH) यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या एका शोधप्रबंधात त्यांनी नमूद केल्याप्रमाणे,’ पाकल द ग्रेट’ यानी बांधलेल्या एका राजवाड्याच्या खोलीत हा दागिना सापडला आहे. किनिच जनाब पाकल हा सर्वात प्रसिद्ध माया शासकांपैकी एक होता ज्याला आज पाकल द ग्रेट म्हणून ओळखले जाते. तो पॅलेन्के किंवा लकाम्हाचा (आधुनिक मेक्सिको) राजा होता. पाकल नावाचा अर्थ क्लासिक माया भाषेत ढाल किंवा सुरक्षा कवच असा आहे. तो वयाच्या १२ व्या वर्षी राजा झाला. पाकलने इ.स. ६१५ -६८३ पर्यंत एकूण ६८ वर्षे राज्य केले. त्यामुळे त्याचे मेक्सिकोच्या इतिहासातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यानेच बांधलेल्या महालात सापडलेल्या या दागिन्यांमुळे तत्कालीन इतिहासाविषयी तसेच त्यांच्या दागिन्यांच्या आवडीनिवडी विषयी आणि त्यांच्या वापराविषयी जाणून घेण्यास मदत होणार आहे.

हा नाकाचा अलंकार वेगळा का ठरतो?

हा सापडलेला नाकाचा अलंकार माणसाच्या पायाच्या हाडापासून तयार करण्यात आला आहे. केवळ इतकेच नाही तर या अलंकारावर देव आणि पूर्वजांशी संवाद साधतानाचे दृश्य कोरलेले आहे. त्यामुळे या दागिन्याचा नेमका वापर कशासाठी होत होता यावर अभ्यासक संशोधन करत आहेत.

संशोधकांना आढळलेला नाकातील अलंकार मेसोअमेरिकन इतिहासाच्या क्लासिक कालखंडाच्या उत्तरार्धातील आहे. त्याचा कालखंड हा इसवी सन ६०० ते ८५० या दरम्यानचा असावा, असे मत प्रथमदर्शनी अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. हा सापडलेला अलंकार अत्यंत सुंदर आहे; त्याच्यावरील कोरलेल्या रेखा ठळक, अचूक आहेत. हा अलंकार ६.४ सेंटीमीटर लांब आणि आणि ५.२ रुंद आहे; तसेच त्याची जाडी ५ सेंटीमीटर आहे. नाकातील हा अलंकार मानवी हाडापासून तयार केलेला आहे तसेच अलंकारावर पक्ष्याच्या डोक्यासारखे हेडगियर घातलेल्या माणसाचे व्यक्तिचित्र कोरलेले दिसते. तर दुसऱ्या ठिकाणी मानवी कवटीचे चित्रण दृश्यमान आहे. कोरलेली मानवी आकृती काहीतरी विधी करताना दर्शविली आहे. या विधी माया संस्कृतीच्या धार्मिक संकल्पना दर्शवितात.

आणखी वाचा : विश्लेषण: म्यानमारच्या कोको बेटांवरून चीनची भारतावर नजर! नेमके काय घडते आहे?

या अलंकारामुळे नेमके काय कळते?

चियापासमधील पॅलेन्केच्या परिसरात प्रथमच पुरातत्त्वीय सर्वेक्षणात या प्राचीन शहराच्या शासकांनी आणि पुजाऱ्यांनी समारंभांच्या वेळी मानवी हाडांपासून तयार केलेले पोशाख परिधान केल्याचे उघड झाले, या नाकाच्या अलंकारावर कोरलेल्या दृश्यामुळे हे समजण्यास मदतच झाली आहे. त्यांनी काविल या सृजनतेच्या माया देवतेचे मूर्त रूप धारण केले आहे. माया संस्कृतीत अशा स्वरूपाची दृश्ये साकारण्याची परंपराच आहे. माया शासकांच्या असंख्य पिढ्या काविल देवतेच्या कृपेने सिंहासनावर विराजमान राहाव्यात असा आशीर्वाद देत आहे असे चित्रण केले जाते.

हा अलंकार कसा सापडला?

हा प्राचीन अलंकार एका स्टको (लिंपण केलेल्या) पासून तयार केलेल्या जमिनीमध्ये उत्खनना दरम्यान सापडला, त्याच ठिकाणी संशोधकांना चिकणमाती माती आणि कोळशाच्या अवशेषांनी भरलेला खड्डा सापडला. या खड्ड्यातील सापडलेल्या सामग्रीचे वर्गीकरण करताना अभ्यासकांच्या चमूला प्राण्यांचे अवशेष, ऑब्सिडियन ब्लेड, हाडांचे तुकडे आणि मानवी हाडांची नाकातली नथ (रिंग-अलंकार) देखील सापडली. पॅलेन्क आर्कियोलॉजिकल प्रोजेक्टचे (पीएपी) संचालक अर्नोल्डो गोन्झालेझ क्रूझ यांच्या मते, या अलंकाराच्या चित्रांवरून माया संस्कृतीतील पुजारी आणि शासक हा अलंकार धार्मिक विधींच्या वेळी परिधान करत होते हे कळते.