वाघांची संख्या वाढली म्हणून आनंद साजरा करणाऱ्या आणि वाघांची अचूक आकडेवारी समोर यावी म्हणून अत्याधुनिक पद्धतींचा अवलंब करणाऱ्या भारतात वाघांच्या मृत्यूच्या अचूक आकडेवारीबाबत सर्वच पातळीवर उदासीनता दिसून येते. भविष्यातील वाघांच्या संरक्षणासाठी ही धोक्याची घंटा तर ठरणार नाही ना, याविषयी…

वाघांच्या मृत्यूची आकडेवारी महत्त्वाची का?

वाघांची संख्या मोजण्यासाठी भारतात अत्याधुनिक, वैज्ञानिक पद्धतीचा वापर करुन अचूक माहिती देण्याचा प्रयत्न असतो. मात्र, त्याच वेळी वाघांच्या मृत्यूच्या आकडेवारीबाबत ही अचूकता दिसून येत नाही. वास्तविक वाघांची संख्या किती हे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच वाघांचे मृत्यू किती हेदेखील अचूकपणे समोर येणे आवश्यक आहे. कारण वाघाच्या संरक्षणासाठी ध्येयधोरणे आखताना, उपाययोजना सुचवून त्याची अंमलबजावणी करताना, त्यासंबंधी कायदे, नियम तयार करताना, शासकीय अध्यादेश काढताना ही अचूक आकडेवारी महत्त्वाचा पाया म्हणून काम करते. यातून व्याघ्रसंवर्धन व संरक्षण व्यापक करता येईल. यातून भूतकाळातील चुका देखील टाळता येतील. त्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना करणे, व्याघ्रसंवर्धन व संरक्षणासाठी आर्थिक तरतूद करणे, कायदेविषयक व धोरणात्मक उपाययोजना आखणे, कृती आराखडा तयार करणे आदी महत्त्वांच्या बाबींसाठी आकडेवारी हा मुख्य आधार आहे.

Two tigress cubs die in Pench Tiger Reserve
वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू, एकाचा जीवनमरणाचा संघर्ष…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
gondia tiger latest news in marathi
वाघाच्या बछड्याच्या मृत्यूचे खरे कारण आले समोर, गोंदिया वन विभागाच्या…
tiger killed laborer harvesting bamboo in Ballarpur forest
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात मजूर ठार; मृतदेहाजवळ सहा तास ठिय्या…
painted stork death loksatta news
नागपुरात नायलॉन मांजाचा पहिला बळी…
gondia tiger death loksatta
गोंदिया : ‘टी १४ वाघिनी’च्या बछड्याच्या मृत्यू, ‘इन्फेक्शन’, निष्काळजीपणा की…
Makar Sankranti motorcyclist died after nylon manja got stuck in his neck
नाशिकमध्ये नायलाॅन मांजामुळे युवकाचा मृत्यू
Tiger death , Kohka-Bhanpur route, tiger gondia ,
राज्यात वाघांच्या मृत्यूचे सत्र! कॉरिडॉरमध्ये वाघाचा मृत्यू

हेही वाचा : विश्लेषण : सीरियातील बंडानंतर इस्रायलने गोलन पठाराचा ताबा का घेतला? हा प्रदेश पश्चिम आशियासाठी का महत्त्वाचा?

आकडेवारीतील तफावतीमागे कारण काय?

वाघांच्या मृत्यूची अचूक आकडेवारी आणि त्याची कारणमीमांसा भविष्यातील वाघांच्या संरक्षण व संवर्धनासाठी अतिशय महत्त्वाची आहे. अलीकडच्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय पातळीवरील तस्करांनी, शिकाऱ्यांनी स्थानिक शिकाऱ्यांना तसेच मानव-वाघ संघर्षामुळे वनखात्यावर नाराज असलेल्या गावकऱ्यांना हाताशी धरणे सुरू केले आहे. त्यामुळे वाघांच्या मृत्यूची अचूक आकडेवारी देण्यासोबतच त्यामागील कारणांचा शोधही आवश्यक आहे. पण वाघाचा अनैसर्गिक मृत्यू असेल तर तो लपवण्याकडेच अधिक कल असतो. केंद्र सरकारच्या अखत्यारितील राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर वाघाच्या मृत्यूच्या नोंदी असतात. तर भारतीय वन्यजीव संरक्षण संस्था या अशासकीय संस्थेच्या संकेतस्थळावरही नोंदी असतात. मात्र, या दोन्हीच्या आकडेवारीत कायम तफावत दिसून येते.

गांभीर्याचा अभाव का?

सामान्य माणूस याबाबत जागरूक नाही हे समजू शकते. पण राजकीय पटलावरदेखील या विषयाचे गांभीर्य नाही. गेल्या काही वर्षात वाघांची संख्या वाढत असताना त्याविषयी राजकीय नेते विविध व्यासपीठांवरून बोलतात. मात्र, वाघांच्या मृत्यूच्या आकडेवारीबाबत ते कधी गांभीर्याने बोलत नाहीत. रहस्यमयरित्या बेपत्ता झालेले ‘जय’, ‘माया’ या आयकॉनिक वाघांबाबतही ही उदासीनता दिसून आली.

हेही वाचा : खवय्यांच्या पसंतीमध्ये भारत जगात १२वा… चवदार प्रांतांमध्ये पंजाब ७वा, महाराष्ट्र ४१वा…‘टेस्ट ॲटलास’ची खुमासदार क्रमवारी!

अचूक आकडेवारी जपण्यात अपयश?

वाघांच्या जन्माची ज्या गांभीर्याने नोंद घेतली जाते, त्या गांभीर्याने वाघांच्या मृत्यूची नोंद केली जात नाही. अगदी केंद्र सरकारच्या संस्थादेखील वाघांच्या मृत्यूमागील कारणांमध्ये ८० टक्के कारणे नैसर्गिक असेच देतात. गेल्या काही वर्षात वाढलेल्या शिकारी, गावपातळीवर विषप्रयोग, विजेचा झटका, सापळा आदीच्या माध्यमातून होणारी शिकार याची नोंदच दिसून येत नाही. मुळातच मृत्यूच्या आकडेवारीचा, कारणांचा सखोल आढावा घेतला जात नाही. यासंदर्भात ध्येयधोरणे ठरवणाऱ्यांना तशी आवश्यकता वाटत नाही का, असा प्रश्न यावेळी पडतो.

वन्यजीवप्रेमी, स्वयंसेवी आग्रही का नाहीत?

व्याघ्रगणनेतून आलेल्या आकडेवारीनंतर भरभरून मत मांडणारे वन्यजीवप्रेमी, स्वयंसेवी, स्वयंसेवी संस्था वाघांच्या मृत्यूच्या आकडेवारीबाबत फारसे गंभीर दिसून येत नाहीत. व्याघ्रगणनेप्रमाणेच ही आकडेवारीदेखील अचूक असावी, यासाठी ते कधीच आग्रह धरताना दिसून येत नाहीत. गेल्या काही वर्षात ‘क्लॉ-कन्झर्वेशन लेन्सेस अँड वाईल्डलाइफ’ ही संस्था देशाच्या कानाकोपऱ्यातील वाघांच्या मृत्यूची आकडेवारी देत होती. यात नर आहे की मादी, वयस्क, समवयस्क की बछडा, मृत्यूचे कारण काय, अशा सगळ्याच बारकाव्यांची नोंद असायची. त्यामुळे सरकारी आकडेवारीत आणि संस्थेच्या आकडेवारीत बरेचदा १५-१५ मृत्यूंचा फरक दिसून यायचा. मात्र, कोरोनानंतर त्यात खंड पडला. वन्यजीवप्रेमी व स्वयंसेवी संस्था यासाठी आग्रही नाहीत, ही खेदाची बाब आहे.

हेही वाचा : Black Peter gold discovery: या ‘काळ्या’ मराठी माणसाने न्यूझीलंडमध्ये शोधली होती सोन्याची खाण; काय आहे इतिहास?

ब्रिटीशकाळात वाघांच्या मृत्यूच्या नोंदी कशा?

ब्रिटीशकाळातदेखील वाघांच्या मृत्यूची नोंद होत होती. प्रामुख्याने त्यांच्या काळातील ‘गॅझेटियर’ किंवा संदर्भ शोधले तर आजही या नोंदी आढळतात. ब्रिटिशांनी त्यांच्या राजवटीत अनेक सांख्यिकीय माहितीचे कोश तयार केलेत. यवतमाळ जिल्ह्यात १८६८ मध्ये पाच माणसांचा बिबट्याच्या हल्ल्यात झालेल्या मृत्यूची नोंद, १९०९ मध्ये बुलढाणा जिल्ह्यात ३७२ बिबटे, ३३० लांडगे, ११७ रानकुत्रे, १३ तरस, सहा अस्वले व १२ वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद आजही आढळते. यासाठी त्यांनी १५१ रुपये मोबदला म्हणून दिल्याचीही नोंद आहे. ज्यावेळी संदेशवहन व प्रभावी माध्यमे उपलब्ध नव्हती, त्याकाळात अशी आकडेवारी व सांख्यिकीय माहिती ब्रिटिशांनी दप्तरी ठेवण्याचे सर्वांना बंधनकारक केले होते. विशेष म्हणजे ही माहिती अचूक असायची.

rakhi.chavhan@expressindia.com

Story img Loader