मिझोरम विधानसभा निवडणुकीसाठी ७ नोव्हेंबरला मतदान होत आहे. एकूण ४० जागा असलेले हे राज्य छोटे असल्याने त्याची चर्चा विशेष नाही. राज्यात साडेआठ लाख मतदार आहेत. मुळात ईशान्येकडील आठ राज्यांत मिळून लोकसभेच्या २५ जागा आहेत. त्यामुळे येथील एखाद्या राज्याच्या निकालाचा राष्ट्रीय राजकारणावर विशेष परिणाम होत नाही. तरीही याचे महत्त्व आहेच. येथे सत्तारूढ मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) सलग दुसऱ्यांदा कौल मागत आहे. त्यांना झोरम पीपल्स मुव्हमेंट (झेडपीएम) या नव्या पक्षाने आव्हान दिले आहे. मिझोरमची स्थापना १९८७ मध्ये झाली. त्यानंतर राज्यात एमएनएफ किंवा काँग्रेसचीच सत्ता राहिली आहे. एमएनएफ ही भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सदस्य आहे. ईशान्येकडील राज्यांना मदतीसाठी केंद्रावर अवलंबून राहावे लागते. या ख्रिश्चनबहुल राज्यात भाजपचे फारसे अस्तित्व नाही. मिझोरममध्ये एमएनएफ-झेडपीएम-काँग्रेस अशी तिरंगी चुरशीची लढत होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा