China Marriage Culture Is Changing जग जसजसे बदलत आहे तशा वर्षानुवर्षे चालत आलेल्या प्रथा-परंपरादेखील बदलत आहेत. समलैंगिक विवाहासारख्या गोष्टी आता समाजाने स्वीकारल्या आहेत. असे म्हणतात- बदलत्या जगासोबत स्वतःलाही बदलावे लागते आणि हे खरे आहे. कारण- आपण स्वतःला बदलले नाही, तर या जगात स्वतःला सामावून घेणे अवघड होईल. बदलत्या प्रथा आणि परंपरांविषयी बोलायचे झाले, तर जगभरातील विवाहाच्या प्रथादेखील सातत्याने बदलत आहेत.
लग्नानंतर स्त्रियाच सासरी जातात, आपले आडनाव बदलतात, सासरचे आडनाव लावतात, त्या कुटुंबाचा वंश पुढे नेतात, असे अगदी सुरुवातीपासून चालत आलेले आपण पाहिले आहे. हे सर्व बदल स्त्रियांनाच करावे लागतात आणि हीच प्रथा वर्षानुवर्षे सुरू आहे. परंतु, चीनने ही प्रथा बदलत पुरुषांना स्त्रीची जागा दिली आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर आता पुरुष आपले घर सोडून सासरी जातील, सासरचे आडनाव लावतील, असा प्रयोग चीनमध्ये सुरू आहे. विशेष म्हणजे पुरुषांचा याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. नेमके हे प्रकरण काय आहे? जाणून घेऊ.
मॅचमेकिंग एजन्सी देणार घरजावई
एका मॅचमेकिंग एजन्सीने घरजावई शोधून देण्याची सेवा सुरू केली आहे. या वृत्ताने शेजारील देशाचेही लक्ष वेधून घेतले आहे. पूर्व चीनमधील झेजियांग प्रांतातील हांगझोउच्या झियाओशान जिल्ह्यात स्थित जिंदियान्झी नावाची मॅचमेकिंग एजन्सी ग्राहकांना ही सेवा पुरवीत आहे. परंपरेनुसार स्त्रियांनी लग्नानंतर जोडीदारासह राहण्यासाठी त्यांचे घर आणि कुटुंब सोडणे अपेक्षित असते. परंतु, चीनमधील नवीन व्यवस्थेनुसार पती पत्नीच्या घरी स्वतःचे घर सोडून जाईल आणि पती व मुले पत्नीचे आडनाव लावतील, असे ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’मध्ये सांगण्यात आले आहे.
या एजन्सीबाहेरील भिंतीवर एक घोषणा लिहिली आहे, “स्त्रियांनो, लग्न करुन नवऱ्याच्या घरी जाण्याचा विचार सोडून द्या. पुरुष स्त्रियांच्या कुटुंबात लग्न करून येतील ही नवीन प्रथा आत्मसात करा,” असा संदेश या घोषणेद्वारे देण्यात आला आहे. या एजन्सीच्या अनोख्या संकल्पनेने फेब्रुवारीत झालेल्या चिनी स्प्रिंग फेस्टिव्हलमध्येही अनेकांचे लक्ष वेधले. चिनी पुरुषदेखील पारंपरिक प्रथा बदलण्याची संधी म्हणून याकडे पाहत आहेत.
या संकल्पनेचा विचार नेमका कुठून आला?
हा आता चर्चेचा विषय असला तरी ही प्रथा झियाओशान अनेक दशकांपासून अस्तित्वात आहे. चीनमधील हांगझोऊच्या विविध जिल्ह्यांमध्ये एकूण देशांतर्गत उत्पादनामध्ये (जीडीपी) झियाओशान जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. एका अहवालानुसार शहरातील अनेक महिलांचे पालक त्यांच्या नातवंडांना दुसऱ्या कुटुंबाचे आडनाव लावण्यास नकार देतात. कारण- या बाबीला ते आपली संपत्ती देण्यासारखे समजतात. ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’नुसार, सांकेतिक भाषेत पुरुषांशी विवाह करणाऱ्या पुरुषांना ‘क्यू’ आणि महिलांशी विवाह करणाऱ्या पुरुषांना ‘जिया’ असे नाव देण्यात आले आहे.
लग्नासाठी पुरुषांकडे ‘या’ गोष्टी आवश्यक
उमेदवाराचे वार्षिक उत्पन्न १२ लाख किंवा त्यापेक्षा जास्त आणि पाच ते सहा फूट ऊंची असणे आवश्यक. त्यात सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे पुरुषांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसावी. पुरुषांच्या शरीरावर टॅटू नसावा. तसेच पुरुष आळशी नसावा. या चीनमधल्या स्त्रियांच्या भावी नवऱ्याकडून अपेक्षा आहेत. १९९९ मध्ये ली जियान यांनी जिंदियान्झी एजन्सी सुरू केली. ली जियान यांनी मेनलँड मीडिया आउटलेट ‘जिऊपाई न्यूज’ला सांगितले की, दोन वर्षांसाठी या सेवेचा लाभ घ्यायचा असल्यास नोंदणी शुल्क प्रतिव्यक्ती एक लाख ७४ हजार इतके असेल.
हेही वाचा : मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?
पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात
एजन्सीचे संस्थापक ली म्हणाले की, त्यांच्याकडे असे २० ते ३० अर्ज रोज येतात; ज्यात पुरुष घरजावई होण्यास इच्छुक असतात. पैसे कमावण्याचा दबाव नसावा म्हणून अनेक पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात आहेत. ‘ली जियान’नुसार, त्यांच्याकडे नोंदणी करणारे जास्तीत जास्त उमेदवार सरकारी नोकरी करतात. या पुरुषांची नोकरी स्थिर आहे. पगारदेखील उत्तम आहे; पण कामाच्या तणावामुळे त्यांना टक्कल पडण्याची भीती असल्याचे ली यांनी सांगितले. अनेक पुरुषांनी घरजावई होण्याची इच्छा व्यक्त केली. घरजावई झाल्यास एकट्या पुरुषावर येणार्या जबाबदार्या कमी होतील आणि आयुष्य जगणे सोपे होईल, असा त्यांचा समज आहे.