गो फर्स्ट एअरलाइन्सचे जी ८ – १५१ जे विमान बुधवारी गुवाहाटीहून दिल्लीसाठी निघाले होते. मात्र, या विमानाचे जयपूरमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीहून उड्डाण घेतल्यानंतर विमानाच्या विंडशील्डमध्ये तडा गेला होता त्यामुळे तातडीने या विमानाचे जयपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते.
एएनआयच्या म्हणण्यानुसार, विमान उड्डाण करताच वैमानिकाला विंडशील्डला तडा गेल्याची माहिती मिळाली होती, परंतु खराब हवामानामुळे दिल्ली विमानतळावर परत उतरणे शक्य झाले नाही. यामुळे एटीसीने विमान जयपूरकडे वळवले. विमान उतरल्यानंतर सर्व प्रवासी सुखरुप असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, याबाबत एअरलाइन्स व्यवस्थापनाकडून अद्याप कोणतीही भूमिका मांडण्यात आलेले नाही.
गेल्या एका महिन्यात २० पेक्षा अधिक विमानांचे तांत्रिक बिघाडामुळे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. एवढ्या मोठ्या प्रमाणात विमानांमध्ये तांत्रिक बिघाड का होत आहे? या मागे नेमकं कारण काय आहे याबाबत तपासणी सुरु आहे.
गो फर्स्टच्या दोन विमानांमध्ये झाला होता बिघाड
गो फर्स्टच्या फ्लाइटमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तांत्रिक बिघाड समोर आला आहे. मंगळवारीही मुंबई ते लेह आणि श्रीनगर ते दिल्ली या एअरलाइन्सच्या दोन स्वतंत्र विमानांच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने त्यांना पुन्हा विमानतळावर उतरवण्यात आले होते. यानंतर डीजीसीएने या दोन विमानांच्या उड्डाणावर बंदी घातली होती.
भारतीय विमान वाहतूक महिनाभरापासून चर्चेत
गेल्या एक महिन्यापासून भारतीय विमान वाहतूक सतत चर्चेत आहे. यादरम्यान विविध कंपन्यांच्या दीड डझनहून अधिक विमानांमध्ये तांत्रिक त्रुटी समोर आल्या आहेत. त्यामुळे केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विशेष बैठक बोलावून चिंता व्यक्त केली आहे. ६ जुलै रोजी स्पाईसजेटला डीजीसीए (नागरी विमान वाहतूक महासंचालक) कडून नोटीसही बजावण्यात आली होती.
हेही वाचा- विश्लेषण : अती मद्यसेवनाचे प्रमाण किती? वयोगटानुसार मद्याचा शरीरावर काय होतोय परिणाम?
एका महिन्यात कोणकोणत्या विमानांचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले
१९ जून रोजी पाटणाहून दिल्लीला जाणारे स्पाइसजेटचे विमानाच्या केबिनमध्ये हवेचा दाब कमी झाल्यामुळे पाटणा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. १९ जून रोजीच तांत्रिक बिघाडामुळे दिल्ली-गुवाहाटी स्पाइसजेट विमानाचेही इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. २ जुलै रोजी दिल्ली ते जबलपूर विमानाचे दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग केले होते. ५ जुलै रोजी दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. त्याच दिवशी स्पाईसजेटच्या दुसऱ्या विमानाचेही तांत्रिक बिघाडामुळे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. इंडिगोच्या दिल्ली-वडोदरा फ्लाइटचे १४ जुलै रोजी जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. १७ जुलै रोजी शारजाहून हैदराबादला येणा-या इंडिगो विमानाचे कराचीत इमर्जन्सी लँडिंग केले होते.
भारतीय विमानांमध्ये ही समस्या का निर्माण होत आहे?
हवेत विमान उडवणे हे अत्यंत जोखमीचे काम आहे. यामुळे विमान प्रवास सर्व प्रकारे सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व प्रकारच्या तपासण्या आणि खबरदारी घेण्याची तरतूद आहे. असे असूनही, भारतीय विमानांमध्ये वारंवार होणार्या त्रुटींमागे कोणती कारणे असू शकतात हे समजून घेण्यासाठी विमानाने उड्डाण करण्यापूर्वी संपूर्ण प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे.
प्रत्येक विमान कंपनीचा मेंटेनन्स विभाग असतो. प्रत्येक विमानाची उड्डाण करण्यापूर्वी सामान्य तपासणी केली जाते. ज्यामध्ये तेल गळती किंवा सॉफ्टवेअरची चाचणी प्रमुख आहे. सामान्य तपासणीमध्ये, वैमानिक किंवा सह-वैमानिक देखील देखभाल कर्मचार्यांसह राहून केबिनमधील प्रत्येक उपकरणाची चाचणी घेतात. उड्डाण करण्यापूर्वी विमानाची तपासणी करताना त्यातील द्रवपदार्थ आणि टायरमधील हवा निश्चितपणे तपासली जाते. प्रत्येक विमान ३०० ते ४०० तास उड्डाण केल्यानंतर, एक अतिशय खोल चाचणी केली जाते, ज्यामध्ये विमानाचा प्रत्येक भाग तपासला जातो.
विमान तपासणीचा प्रकार काय आहे
विमानाची उड्डाणपूर्व तपासणी केली जाते. इतर दिवशीही विमानांचीही मूलभूत तपासणी केली जाते. ३०० तासांच्या उड्डाणानंतर विमानांची ५ तास तपासणी केली जाते. दर सहा ते ८ महिन्यांनी ३ दिवसांची बी स्वरुपाची तपासणी केली जाते. दर २ वर्षांनी दोन आठवडे खोल सी स्वरुपाची तपासणी केली जाते.
विमानात बहुतेक तांत्रिक समस्या कुठे येतात?
विमानात उड्डाण करताना, बहुतेक समस्या संगणक नियंत्रण प्रणालीमध्ये येतात. एअरलाइन्स सिस्टम अपडेटवर कमी खर्च केला जातो म्हणून अशा प्रकारच्या समस्या येतात. उड्डाणा दरम्यान इंजिनमध्ये येणारी समस्या देखील अत्यंत सामान्य आहेत. परदेशी कंपन्यांनाही याबाबत चिंता व्यक्त करतात. विमानाच्या पंखांमध्येही समस्या असतात, मुख्यतः खराब देखभालीमुळे विमानाच्या पंख्यांमध्ये मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होतात.