विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण असलेल्‍या चिखलदरा येथे सुमारे ४०७ मीटर लांबीचा काचेचा पूल (स्‍कायवॉक) उभारला जात आहे. या पुलाचे काम रखडत का गेले, त्‍याविषयी…

चिखलदरा स्‍कायवॉकचे काम चर्चेत का आले?

चिखलदरा येथील हरिकेन ते गोराघाट पॉइंटला जोडणाऱ्या स्‍कायवॉक प्रकल्‍पाला २०१८ मध्‍ये राज्‍य सरकारने परवानगी दिली होती. यासाठी ३४.३४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. सिडकोने या प्रकल्‍पाच्‍या कामाला सुरुवात केल्‍यानंतर जुलै २०२१ मध्ये केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाने काही त्रुटी काढून परवानगी नाकारली होती. त्‍यानंतर या प्रकल्‍पाचे काम थांबले. केंद्रीय वन्‍यजीव मंडळाच्‍या परवानगीअभावी या प्रकल्‍पाचे काम रखडले होते, पण महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्‍पाचे काम थांब‍विले, असा आरोप उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्‍याने हा प्रकल्‍प पुन्‍हा चर्चेत आला आहे.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी

हेही वाचा : विश्लेषण: मुंबईतील भुयारी मेट्रोच्या समस्यांची मालिका संपत का नाही? लोकार्पणाची घाई कारणीभूत?

परवानगी नाकारल्याने विलंब?

सिडकोने सादर केलेल्‍या स्‍कायवॉक प्रकल्‍पाला १९ जानेवारी २०१९ रोजी केंद्रीय वन मंत्रालयाने काही अटी शर्तींसह परवानगी दिली होती, पण ज्‍या भागात हा स्‍कायवॉक जाणार आहे, तो ‘इको सेन्सिटिव्‍ह झोन’मध्‍ये असल्‍याने केंद्रीय वन्‍यजीव मंडळाने जुलै २०२१ मध्‍ये या प्रकल्‍पाला परवानगी नाकारली. गेल्‍या दशकभरापासून केंद्रात भाजपचे सरकार असताना या प्रकल्‍पाच्‍या कामाला गती मिळू शकली नाही. त्‍यामुळे महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्‍पाचे काम कसे थांबविले, हा प्रश्‍न चर्चेत आला आहे.

स्‍कायवॉक प्रकल्‍पाची सद्यःस्थिती काय?

या प्रकल्‍पासाठी ०.९२ हेक्‍टर म्‍हणजे दोन फुटबॉल मैदानांएवढी मेळघाट व्‍याघ्र प्रकल्‍प क्षेत्राच्‍या बफर झोनमधील वनजमीन वळती करण्‍यास वन (संरक्षण आणि संवर्धन) अधिनियम १९८० अंतर्गत १९ जुलै २०२४ रोजी टप्‍पा-२ ची परवानगी देण्‍यात आली आहे. ही मंजुरी प्रकल्पासाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरला आहे. कारण त्यामुळे आसपासच्या जंगल आणि वन्यजीवांचे संरक्षण सुनिश्चित करतानाच बांधकाम सुरू ठेवता येणार आहे. वन आणि वन्यजीव मंजुरी यांसारखे अडथळे पार केल्यानंतर हा प्रकल्प आता पवन बोगद्याच्या चाचण्यांच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आहे. परिसराची वेगळी भौगोलिक आणि पर्यावरणीय परिस्थिती लक्षात या चाचण्या स्कायवॉकची सुरक्षितता आणि स्थिरता निश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.

हेही वाचा : विश्लेषण: परदेशी गुंतवणूकदारांचे निर्गमन हे बाजार पडझडीचे कारण?

चिखलदरा स्‍कायवॉकची वैशिष्‍ट्ये काय?

चिखलदरा येथील हरिकेन ते गोराघाट पॉइंटला जोडणारा हा स्‍कायवॉक ४०७ मीटर लांबीचा आहे. तो जगातील पहिला काचेचा सिंगल केबल रोप सस्‍पेन्‍शन पूल ठरणार आहे. देशातील सर्वाधिक लांबीचा हा स्‍कायवॉक आहे. दोन मोठ्या टेकड्यांना स्‍कायवॉकने जोडण्यात येत आहे. या टेकड्यांमध्‍ये १५० मीटर खोल दरी आहे. हा स्‍कायवॉक पूर्णपणे काचेचा आहे, त्यामुळे पर्यटकांकरिता एक नवे आकर्षण निर्माण होईल. स्‍कायवॉकच्या माध्यमातून या भागात पर्यटकांची संख्याही वाढेल. उंचीवरून मेळघाटचे निसर्गसौंदर्य डोळ्यात साठवण्याची संधी या निमित्ताने पर्यटकांना मिळणार आहे.

पर्यावरणवाद्यांचा विरोध कशासाठी?

या प्रकल्‍पाला पर्यावरणवाद्यांनी सुरुवातीला विरोध दर्शविला होता. मेळघाट व्‍याघ्र प्रकल्‍पातील प्रस्‍तावित स्‍कायवॉकचा परिसर २०१० मध्‍ये बफर झोनमध्‍ये समाविष्‍ट करण्‍यात आला होता. तर २०१६ मध्‍ये हा परिसर ‘इको सेन्सिटिव्‍ह झोन’मध्‍ये आला. या परिसरात वाघाचा, दुर्मिळ पक्ष्‍यांचा वावर आहे. पर्यटकांच्‍या गर्दीमुळे या परिसरातील जैवविविधतेला धोका पोहचण्‍याची भीती पर्यावरणवाद्यांनी व्‍यक्‍त केली आहे. एकीकडे, वन्‍यजीव संरक्षणाच्‍या नावाखाली मेळघाट व्‍याघ्र प्रकल्‍पातील अनेक गावांचे स्‍थलांतर केले जात असताना अशा प्रकल्‍पाला मंजुरी कशी मिळते, असा सवाल स्‍वयंसेवी संस्‍थांच्‍या प्रतिनिधींनी केला आहे.

हेही वाचा : Sandy Irvine remains found:एव्हरेस्ट १९२४ सालीच सर झाला होता का? इर्विनचे सापडलेले अवशेष नेमकं काय सांगतात?

स्‍कायवॉकसमोरील आव्‍हाने कोणती?

स्‍कायवॉक प्रकल्‍पामुळे चिखलदरा येथे पर्यटकांची गर्दी वाढून पर्यटन व्‍यवसायाला चालना मिळेल, असे सांगितले जात असले, तरी गर्दीचे नियंत्रण, व्‍यवस्‍थापन करणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्‍हान असणार आहे. लोकांच्‍या बेफिकीर वृत्तीमुळे जंगलात आगीच्‍या घटना घडतात, त्‍यामुळे मौल्‍यवान वनसंपत्तीचा मोठा भाग नष्‍ट होऊ शकतो. त्‍यामुळे अग्निसुरक्षेचे कडक उपाययोजना आखणे आवश्‍यक ठरणार आहे. थंड हवेच्‍या ठिकाणी माकडांचा वाढलेला वावर हा जटील प्रश्‍न होत चाललेला आहे. या ठिकाणी माकडांचा उपद्रव रोखण्‍यासाठीदेखील उपाययोजना करावी लागणार आहे. माकडांना खायला न घालण्‍याबाबत लोकांना जागरुक करणे आवश्‍यक आहे. प्‍लास्टिकच्‍या कचऱ्याची मोठी समस्‍या भेडसावत असताना स्कायवॉक परिसरात तो रोखण्‍याचे प्रयत्‍न करावे लागतील, असे अभ्‍यास अहवालात म्‍हटले आहे.

मेळघाट व्‍याघ्र प्रकल्‍पाचे महत्त्‍व?

देशात व्‍याघ्र प्रकल्‍पाअंतर्गत १९७३-७४ मध्‍ये अधिसूचित करण्‍यात आलेल्‍या पहिल्‍या नऊ प्रकल्‍पांपैकी एक असलेला मेळघाट व्‍याघ्र प्रकल्‍प चिखलदरा आणि धारणी तालुक्‍यात आहे. ९०० हून अधिक वनस्पती, ३५ प्रकारचे सस्तन प्राणी २९५ प्रजातींचे पक्षी आणि ना-ना विविधतेने नटलेला हा परिसर आहे. व्याघ्रप्रकल्प योजनेत विशेष संरक्षण मिळाल्यामुळे तेथील जैवविविधता टिकून राहण्यास मोलाची मदत झाली आहे. वाघांचा अधिवास सुरक्षित ठेवण्‍यासाठी या भागात प्रयत्‍न केले जात असताना पर्यटनाच्‍या संधीही उपलब्‍ध करून देण्‍यासाठी हालचाली सुरू आहेत.

mohan.atalkar@expressindia.com