सणासुदीच्या दिवसांत विशेष करून दिवाळीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणत खरेदी करत असल्यामुळे सायबर फसवणुकीच्याही घटना वाढतात. अनेक सवलती व बँकेकडील माहिती अद्ययावत करणे (केवायसी) अशा बहाण्यांनी मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. गंभीर बाब म्हणजे, आरोपींना ओटीपीची माहिती न देता क्रेडिट कार्डमधून व्यवहार होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे नोंदल्या जात आहेत. त्यामुळे अशा प्रकारची सायबर फसवणूक कशी होते हे जाणून घेतल्यास आपण अशा फसवणुकीला बळी पडणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सणांच्या दिवसांत सायबर फसवणुकीचे प्रमाण अधिक का वाढते?

दिवाळी हा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. विविध वस्तू व कपड्यांची खरेदी या कालावधीत मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे दिवाळीच्या काळात खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढतात. अलिकडे ऑनलाइन खरेदीकडे कल वाढला आहे. त्यामुळे व्यापारीही आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ग्राहकांसाठी सवलती, योजना जाहीर करतात. सायबर फसवणूक करणारे याच परिस्थितीचा फायदा उचलून फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. सायबर भामटे अशा फसवणुकीसाठी दरवर्षी नवनवीन युक्त्यांचा वापर करतात. यंदा दिवाळीनिमित्त सवलतींच्या नावाखाली लिंक पाठवून फसवणुकीचे प्रकार करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

फसवणूक कशी होते?

सवलती किंवा विविध योजनांच्या नावाखाली संदेश पाठवण्यात येतात. तसेच काही प्रकरणांमध्ये क्रेडिट कार्डवरील माहिती अद्ययावत (केवायसी) करण्याच्या नावाखाली संदेश पाठवण्यात येत आहेत. अशा लिंकवर क्लिक केल्यानंतर मोबाइलमध्ये शिरकाव करता येतो म्हणजेच मोबाइलचा रिमोट ॲक्सेस आरोपींना मिळतो. त्यामुळे मोबाइलमध्ये होणारे व्यवहार आरोपींना दिसतात. तसेच संदेशाद्वारे आलेले ओटीपीही आरोपी पाहू शकतात. त्यामुळे ओटीपीविषयी माहिती न देताही अनेकांच्या क्रेडिट कार्डचा वापर करून व्यवहार होत आहेत. दहिसर येथील फसवणुकीच्या गुन्ह्यात तक्रारदार संबंधित क्रेडिट कार्ड केवळ मोबाइल खरेदीसाठी वापरायचे. आरोपींनी तेच हेरून त्या क्रेडिट कार्डद्वारे मोबाइलची खरेदी केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

फसवणुकीचे प्रमाण किती?

जानेवारी ते सप्टेंबर, २०२३ या कालावधीत क्रेडिट कार्ड फसवणुकीचे ८८७ गुन्हे मुंबईत घडले आहेत. त्यातील केवळ ७६ गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्या प्रकरणांमध्ये आतापर्यंत १३८ व्यक्तींना अटक झाली आहे. देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय टोळ्या सक्रिय असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे कठीण असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे क्रेडिट कार्ड धारकांनी सतर्कता दाखवून असे प्रकार टाळणे योग्य असल्याचे जाणकारांचे मत आहे.

फसवणूक झाल्यास काय करावे?

रस्ते अपघातातील जखमीला तात्काळ उपचार मिळाल्यास त्याचे प्राण वाचू शकतात. त्या कालावधीला `गोल्डन अवर्सʼ म्हणतात. तसेच सायबर गुन्ह्यांमध्येही फसवणूक झाल्यानंतर लवकरात लवकर सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पैसे वाचवणे शक्य असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पूर्वी सायबर गुन्ह्यांमध्ये बँकेची पडताळणी व अहवाल येईपर्यंत गुन्हा दाखल होण्यातच आठवड्याचा कालावधी लागायचा. त्याचा फायदा घेऊन आरोपी खात्यातील रक्कम काढायचे. आता पोलिसांच्या मदतक्रमांकावर दूरध्वनी केल्यास तात्काळ फसवणुकीची रक्कम गोठवणे शक्य आहे. त्यासाठी सायबर पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधणे आवश्यक आहे अथवा तात्काळ ऑनलाइन तक्रार करणे आवश्यक आहे. याशिवाय स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केल्यास फसवणुकीचे पैसे वाचवणे शक्य होते.

फसवणुकीची १०० टक्के रक्कम वाचवणे शक्य आहे का?

नुकतीच दहिसर पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या एका प्रकरणात तक्रारदार व्यक्तीला लिंक पाठवून त्याच्या क्रेडिट कार्डमधून तीन लाख रुपयांची खरेदी करण्यात आली होती. फसवणूक झालेल्या व्यक्तीने तात्काळ पोलिसांकडे तक्रार केल्यामुळे १०० टक्के रक्कम परत मिळवण्यात पोलिसांना यश आले. ऑनलाइन खरेदी व्यवहारांमध्ये २४ तासांनंतर रक्कम पुढे पाठवण्याचे सूचना ई-वॉलेट कंपन्या, बँकांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे २४ तासांनंतर व्यवहार पूर्ण केले जातात. त्यामुळे २४ तासांत कार्यवाही केल्यास रक्कम वाचवता येते. काही ई वॉलेट सुविधा पुरवणाऱ्या कंपन्या २४ तासांपूर्वी व्यवहार पूर्ण करतात. त्यावेळी ही रक्कम वाचवणे शक्य होत नाही. पण अशा कंपन्यांनाही २४ तासानंतर व्यवहार पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच अनेक प्रकरणांमध्ये ८० ते ९० टक्के रक्कमही परत मिळवण्यात आली आहे.

काय काळजी घ्यावी?

अनोळखी मोबाइल क्रमांकावरून येणारा व्हॉट्सॲप संदेश किंवा एसएमएसच्या माध्यमातून आलेली सवलत योजना कितीही नफ्याची, आकर्षक वाटली तरी त्याला प्रतिसाद देऊ नये. तसेच अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या संदेशातील लिंकवर क्लिक करू नये. संकेतस्थळावरून व्यवहार करताना सत्यतेची पडताळणी करावी. याशिवाय क्रेडिट कार्डबाबतची कोणतीही माहिती अनोळखी व्यक्तींना देऊन नये, अशा गोष्टींचे पालन केल्यास फसवणूक टाळणे शक्य आहे.