यूएई येथे होत असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामना अनेक अर्थांनी संस्मरणीय ठरला. या सामन्यात भारताने टी-२० विश्वचषक स्पर्धेमधील पराभवाचा वचपा काढला. हार्दिक पंड्याने धडाकेबाज खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. मात्र या सामन्यात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना ‘स्लो ओव्हर रेट’मुळे कारवाईला सामोरे जावे लागले.
हेही वाचा >>> विश्लेषण : भारतातील पहिली सरकारी ऑनलाइन टॅक्सी सेवा; जाणून घ्या ‘केरळ सवारी’चे वैशिष्ट्ये
स्लो ओव्हर रेट म्हणजे काय?
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी-२० सामन्यांतील ‘स्लो ओव्हर रेट’वर तोडगा काढण्यासाठी एक नवा नियम लागू केला. या नियमानुसार मैदानावरील ३० यार्ड सर्कलच्या बाहेर पाच ऐवजी चारच खेळाडूंना तैनात करता येते. म्हणजेच षटकांच्या मंद गतीमुळे गोलंदाजी करत असलेल्या संघाला ३० यार्डच्या वर्तुळात जबरदस्तीने एका आगावीच्या खेळाडूला तैनात करावे लागते.
हेही वाचा >>> विश्लेषण: नव्या सरन्याधीशांनी पदभार स्वीकारताच बोलावली ‘Full Court’ बैठक; याचा नेमका अर्थ काय?
भारत-पाकिस्तान सामन्यात नेमकं काय घडलं?
भारत-पाक सामन्यात दोन्ही संघांना स्लो ओव्हर रेटमुळे कारवाईला सामोरे जावे लागले. भारताला निर्धारित वेळेत फक्त १८ षटके टाकता आले. परिणामी भारताला उर्वरित दोन षटके मैदानामधील सर्कलमध्ये पाच खेळाडू ठेवावे लागले. ही दोन्ही षटके अर्शदीप आणि भूवनेश्वर यांनी टाकले. शेवटची षटके दोन्ही संघासाठी खूप महत्वाची असतात. या शेवटच्या शटकांतच पराभव आणि विजय ठरतो. मात्र स्लो ओव्हर रेटमुळे भारताला पाच खेळाडू मैदानावरील वर्तुळातच ठेवावे लागले. परिणामी पाकिस्तानी खेळाडूंना मोठे फटके मारण्यास मोकळी जागा मिळू शकली.
पाकिस्तानलादेखील स्लो ओव्हर रेटचा फटका बसला. पाकिस्तानने निर्धारित वेळेत फक्त १७ षटके टाकली. त्यामुळे संघाला उर्वरित तीन षटके मैदानातील वर्तुळात पाच खेळाडू ठेवावे लागले. स्लो ओव्हर रेटमुळे अटीतटीची लढत होत असताना पाकिस्तानला सीमारेषेवर एक खेळाडू कमी ठेवता आला. परिणामी भारताला मोठे फटके मारण्याची संधी मिळाली. या शेवटच्या तीन षटकांमध्ये भारताने दोन चेंडू राखून १६ चेंडूंमध्ये ३२ धावा केल्या.