Japan surrender history १५ ऑगस्ट १९४५ हा दिवस जपानमधील विजय किंवा V-J दिवस म्हणून इतिहासात नोंदला गेला. या दिवशी मित्र राष्ट्रांनी दुसऱ्या महायुद्धात जपानवर विजय मिळवला होता. १९४० साली सप्टेंबर महिन्यात जपानने महायुद्धात प्रवेश केला. जपान हे ‘अॅक्सिस ब्लॉक’चा भाग होते, त्यात नाझी जर्मनी आणि फॅसिस्ट इटली यांचा समावेश होता. जागतिक महायुद्धासारख्या आंतरराष्ट्रीय संघर्षादरम्यान जपानने आशियाचे अनेक भाग पादाक्रांत केले होते.
V-J दिवस म्हणजे काय?
१९४५ साली मे महिन्यात युरोपात अॅक्सिस ब्लॉकचा पराभव झाला. (युरोपमधील विजय किंवा V-E दिवस दरवर्षी ८ मे रोजी साजरा केला जातो). परंतु, मित्र राष्ट्रांनी पुढील काही महिन्यांत पूर्व आशियामध्ये जपानशी युद्ध सुरु ठेवले होते. ब्रिटीश साम्राज्याचा एक भाग म्हणून भारताने जपानबरोबरच्या युद्धातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. ब्रिटिश-भारतीय सैन्याने १९४५ साली मित्र राष्ट्रांसाठी सिंगापूर आणि हाँगकाँग सुरक्षित करण्यात मदत केली होती.
अधिक वाचा: भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनी काश्मीरमध्ये नेमके काय घडत होते?
२२ जून १९४५ रोजी ओकिनावा हे जपानी बेट अमेरिकन सैन्याच्या हाती पडले होते, सैन्य या बेटावर आक्रमण करणार त्याआधीच ६ ऑगस्ट रोजी अमेरिकेने हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब टाकला, ज्यात १ लाख ४० हजार लोक मारले गेले. या हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर सोव्हिएत युनियनने जपानविरुद्ध युद्ध घोषित केले. तर ९ ऑगस्ट रोजी, अमेरिकेने नागासाकीवर दुसरा अणुबॉम्ब टाकला आणि यात अंदाजे ७० हजार नागरिक मारले गेले. शेवटी विजय अशक्य आहे हे ओळखून जपान सरकारने १४ ऑगस्ट १९४५ रोजी मित्र राष्ट्रांच्या शरणागतीच्या अटी मान्य केल्या. त्याच दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी एस ट्रुमन यांनी जपान आत्मसमर्पण करत असल्याची घोषणा केली आणि ब्रिटीश पंतप्रधान क्लेमेंट ऍटली यांनी मध्यरात्री बातमीस दुजोरा दिला.
१४ ऑगस्ट रोजी जपानच्या आत्मसमर्पणाची बातमी कळताच संपूर्ण अमेरिकेमध्ये जल्लोष सुरू झाला. युनायटेड किंग्डमने अधिकृत व्ही-जे दिवस दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट १९४५ रोजी असेल असे जाहीर केले. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी, जपानी सम्राट हिरोहितो यांनी आपल्या पहिल्या रेडिओ भाषणात जपानच्या शरणागतीची घोषणा केली. V-J दिवसाने द्वितीय विश्वयुद्धाचा शेवट झाला. त्यानंतर जपानने २ सप्टेंबर रोजी औपचारिकपणे आत्मसमर्पण दस्तऐवजांवर स्वाक्षरी केली. तो पर्यन्त जपान कधीही परकीय शक्तीला शरण गेले नव्हते. तर दुसऱ्या महायुद्धात कोणत्याही जपानी लष्करी तुकडीने शरणागती पत्करली नव्हती.
भारतात जपानी राजवट
जागतिक महायुद्धादरम्यान जपानचेही भारताच्या एका भूभागावर नियंत्रण होते. २३ मार्च १९४२ रोजी जपानी सैन्य दक्षिण अंदमानात उतरले आणि पुढील तीन ते चार तासांत या भागावर पूर्ण ताबा मिळवला. सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालील इंडियन नॅशनल आर्मी (INA) आणि जपान या दोघांमधील अंतर्गत सामंजस्यामुळे, अंदमान ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना जपानींना कोणत्याही प्रतिकाराचा सामना करावा लागला नाही. बोस यांचा असा विश्वास होता की, क्रांतिकारक शक्तींचा अवलंब केल्याशिवाय भारत कधीही स्वातंत्र्य मिळवू शकत नाही आणि ब्रिटीशांना भारतीय भूमीतून बाहेर काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय शक्तींकडून मदत घेणे महत्त्वाचे आहे. इंग्रजांपासून हे बेट मुक्त झाल्यावर बोस यांनी जपानी लोकांना ही बेटे त्यांच्या ताब्यात देण्यास पटवून दिले आणि परिणामी ३० डिसेंबर १९४३ रोजी त्यांनी तेथे तिरंगा फडकावला. त्यांनी या बेटांना शहीद (शहीद) आणि स्वराज (स्वराज्य) अशी नावेही दिली. परंतु काही काळातच परिस्थिती बिघडली. जपानी सैन्याने बेटावरील लोकसंख्येवर भयंकर अत्याचार केले. बोस यांच्या सैन्याच्या हातात नाममात्र प्रशासन राहिले. जपानी सैन्याच्या क्रूरतेमुळे अंदमानमध्ये सुमारे दोन हजार भारतीयांचा मृत्यू झाला. शेवटी, १९४५ च्या ऑक्टोबर महिन्यात ही बेटे पुन्हा ब्रिटिशांच्या ताब्यात गेली.
V-J दिवस आणि भारताचा स्वातंत्र्य दिन
१९२९-३० च्या लाहोर अधिवेशनात काँग्रेस नेते जवाहरलाल नेहरू आणि बोस यांनी ब्रिटिश राजवटीपासून संपूर्ण स्वातंत्र्यासाठी दबाव निर्माण केला आणि भारत प्रत्यक्षात स्वतंत्र होण्यापूर्वी जवळपास दोन दशके आधी देशाचे स्वातंत्र्य सैनिक २६ जानेवारी हा दिवस “पूर्ण स्वराज दिन” म्हणून साजरा करत होते. परंतु ज्या वेळी प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळण्याचा दिवस जवळ आला, त्यावेळी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी हा दिवस १५ ऑगस्ट १९४७ ठरवला जो जपानमधील विजयाच्या दुसऱ्या वर्धापन दिनादिवशी होता. इतिहासकार रामचंद्र गुहा या संदर्भात नोंदवतात की, ‘राष्ट्रवादी भावनांऐवजी साम्राज्यवादी अभिमानाने प्रतिध्वनित झालेल्या दिवशी स्वातंत्र्य मिळाले.’ दोन वर्षानंतर राज्यघटना पूर्ण झाली. १९५० साली राज्यघटना पूर्ण स्वराज दिनी स्वीकारण्यात आली आणि हा दिवस भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला गेला.