आज ९ मे, १९३९ मध्ये सुरू झालेले दुसरे जागतिक महायुद्ध युरोपकरिता ८ मे, १९४५ रोजी संपले. परंतु, युरोपच्या भौगोलिक वेळेनुसार ती तारीख ९ मे होती. जर्मनीने युरोपसमोर बिनशर्त शरणागती स्वीकारली. त्यामुळे ९ मे हा दिवस युरोप विजय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. अंतिमतः जपानने सप्टेंबर महिन्यात शरणागती पत्करली आणि दुसरे महायुद्ध संपले. जवळजवळ सहा वर्षे चाललेल्या या संहारक युद्धात ‘कोका कोला’ या पेयाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आजही या युद्धाचे जाणवणारे परिणाम यांचा ऊहापोह करणे समयोचित ठरेल.

‘युरोप विजय दिन’ का साजरा करतात ?

युरोपमधील विजय हा दिवस म्हणजे ८ मे १९४५ रोजी दुसऱ्या महायुद्धातील जर्मनीच्या मित्रराष्ट्रांनी बिनशर्त आत्मसमर्पणाची कबुली दिली. जर्मनीने बिनशर्त आत्मसमर्पण दि. ८ मे रोजी मध्य युरोपीय वेळेनुसार २३.०१ वाजता जाहीर केले. ही विशिष्ट वेळ ‘मॉस्को टाइम’मध्ये ९ मे रोजी ००.०१ अशी म्हणजे रात्री १२ वाजून १ मिनिट अशी होती. म्हणून युरोपमध्ये ‘युरोप विजय दिन’ दि. ९ मे रोजी साजरा करतात. या ‘युरोप विजय दिना’ला फॅसिझवादावरील विजय दिवस, लिबरेशन डे किंवा ‘युरोप विजय दिवस’देखील म्हणतात. तसेच युरोपमध्ये ‘व्हीई-डे’ असेही या दिवसाला संक्षेपाने संबोधले जाते.
दि. ३० एप्रिल रोजी हिटलरने बर्लिनच्या लढाईदरम्यान आत्महत्या केली आणि जर्मनीचा उत्तराधिकारी म्हणून कार्ल डोनिट्झ याची नेमणूक केली. डोनिट्झ याने युरोपसमोर शरणागती स्वीकारण्याचे ठरवले. या शरणागतीच्या अहवालावर प्रथम ७ मे रोजी रिम्स येथील SHAEF मुख्यालयात स्वाक्षरी करण्यात आली. ८ मे रोजी काही सुधारणा करून अंतिम ‘जर्मन इन्स्ट्रुमेंट ऑफ सरेंडर’ सादर केले. मध्य युरोपीय वेळेनुसार २३.०१ मिनिटांनी सर्व जर्मन लष्करी, नौदल आणि हवाई अधिकाऱ्यांना आणि सैन्याला लष्करी कारवाया थांबवण्याचे आदेश देण्यात आले आणि दुसऱ्या महायुद्धाची जर्मनी आणि युरोपकरिता ९ मे रोजी समाप्ती झाली.

Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
Spain devastating floods Flow of Turia River Heavy rain in Spain
आपण कधी जागे होणार? स्पेनचा विध्वंसक पूर
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास

हेही वाचा : विश्लेषण : ‘रेड क्रॉस’च्या निर्मितीच्या मुळाशी युद्ध ?

कोका कोला आणि दुसरे महायुद्ध

१९३९ ते १९४५ दरम्यान झालेल्या दुसऱ्या जागतिक महायुद्धादरम्यान ‘कोका-कोला’ने जाहिरातींची मालिका चालवली. यात कोका-कोलाने स्वतःचा राष्ट्रप्रेमी ब्रॅण्ड म्हणून स्वतःला नावारूपाला आणले. १९४१ मध्ये अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात प्रवेश केला आणि हजारो अमेरिकन नागरिकांना परदेशात पाठवण्यात आले. त्यात सैनिकांना पाठिंबा दर्शविण्यासाठी कोका-कोलाचे अध्यक्ष रॉबर्ट वुड्रफ यांनी आदेश दिले की, अमेरिकन गणवेशातील प्रत्येकाला कोका-कोलाची बाटली पाच सेंट्समध्ये मिळेल.” यातून सैनिकांनी कोका-कोलाला पसंती देण्यास सुरुवात केली. त्यातून दहा दशलक्षपेक्षा अधिक कोका-कोलाच्या बाटल्या विकल्या गेल्या. तसेच ३ दशलक्ष बाटल्या जहाजांवर पोहोचवण्यात आल्या.
जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले, तेव्हा कोका-कोला या पेयाचा ४४ देशांमध्ये प्रसार झालेला होता. महायुद्धावेळी हा सर्व पसारा उद्ध्वस्त होण्याच्या शक्यतेत होता. परंतु, महायुद्धावेळी सैनिकांवर बीअर आणि उत्तेजक पेय पिण्यावर बंदी घालण्यात आली. तेव्हा ‘कोका-कोला’ने सर्व सैनिकांना आणि खास करून अमेरिकन सैनिकांना पेय पुरविण्याबाबत साहाय्य केले. उत्तर आफ्रिकेतील जनरल ड्वाइट आयझेनहॉवर याने टेलिग्राम पाठवून सशस्त्र दलांना कोक पुरवण्याचा आदेश दिला. तसेच २९ जून, १९४३ रोजी १० बॉटलिंग प्लांटची नव्याने उभारणी करण्यात आली. १९४५ च्या युद्धसमाप्तीवेळी लष्करी सैनिकांनी ५ अब्जहून अधिक कोकच्या बाटल्या वापरल्या होत्या.

हेही वाचा : विश्लेषण : अमेरिकेत बंदूक वापरणे सर्वसामान्य आहे का ? काय सांगतो बंदूक वापर अधिनियम कायदा

भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि दुसरे महायुद्ध

जागतिक दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी भारतामध्ये स्वातंत्र्याचे वारे वाहत होते. अनेक क्रांतिकारी ब्रिटिशांविरुद्ध लढत होते. परंतु, ब्रिटिशांची सत्ता असल्याने भारतीय सैनिकांना ब्रिटिशांच्या आज्ञेचे पालन करणे भाग होते. ब्रिटिशांनी सुरुवातीला अडीच लाख सैन्य पाठवले. दुसऱ्या महायुद्धात ८७ हजारांहून अधिक भारतीय सैन्य आणि ३ दशलक्ष नागरिक मरण पावले. व्हाइसरॉय लिनलिथगो यांनी भारतीय राजकारण्यांशी सल्लामसलत न करता भारताचे जर्मनीशी युद्ध सुरू असल्याचे जाहीर केले. १९३९ मध्ये ब्रिटिश भारतीय सैन्यात २,०५,००० सैनिक होते आणि १९४५ पर्यंत ही संख्या ३ दशलक्ष सैनिक एवढी झाली. ब्रिटिश भारतीय सैन्यातील भारतीय जवानांना ३१ व्हिक्टोरिया क्रॉससह ६ हजार शौर्य पुरस्कार मिळाले होते.
मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा या राजकीय पक्षांनी ब्रिटिश युद्धाच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला, तर त्या वेळच्या भारतात अस्तित्वात असलेला सर्वात मोठा आणि प्रभावशाली राजकीय पक्ष, इंडियन नॅशनल काँग्रेसने ब्रिटनला मदत करण्यापूर्वी स्वातंत्र्याची मागणी केली. परंतु, ब्रिटिशांनी नकार दिल्याने ऑगस्ट १९४२ मध्ये काँग्रेसने ‘भारत छोडो’ मोहिमेची घोषणा करण्यात आली. दरम्यान, भारतीय नेते सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली जपानने भारतीय सैनिकांची एक फौज उभी केली, जी इंग्रजांच्या विरोधात लढली.

‘भारत छोडो आंदोलना’चे एक कारण म्हणजे दुसरे महायुद्ध

महात्मा गांधी, पटेल आणि मौलाना आझाद यांच्यासह प्रमुख भारतीय नेत्यांनी नाझीवाद तसेच ब्रिटिश साम्राज्यवादाचा निषेध केला. भारत स्वतंत्र होईपर्यंत ते किंवा इतर कोणाशीही लढणार नाही, असे धोरण स्वीकारले. काँग्रेसने ऑगस्ट १९४२ मध्ये ‘भारत छोडो आंदोलन’ सुरू केले आणि स्वातंत्र्य मिळेपर्यंत सरकारशी कोणत्याही प्रकारे सहकार्य करण्यास नकार दिला. यासाठी तयार नसलेल्या सरकारने ६० हजारांहून अधिक राष्ट्रीय आणि स्थानिक काँग्रेस नेत्यांना ताबडतोब अटक केली आणि नंतर काँग्रेस समर्थकांच्या हिंसक प्रतिक्रिया दडपण्यासाठी हालचाली केल्या. प्रमुख नेत्यांना जून १९४५ पर्यंत तुरुंगात ठेवण्यात आले होते.
नेताजी सुभाषचंद्र बोस हे काँग्रेसचे सर्वोच्च नेते होते. त्यांनी काँग्रेसशी संबंध तोडले आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जर्मनी किंवा जपानशी लष्करी युती करण्याचा प्रयत्न केला. सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनीच्या मदतीने युरोपमधील भारतीय विद्यार्थ्यांमधून आणि भारतीय युद्धकैद्यांमधून भारतीय सैन्याची स्थापना केली. त्यालाच ‘इंडियन नॅशनल आर्मी’ असेही संबोधतात.

दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम

मेमध्ये जर्मनी आणि युरोप यांच्यातील युद्ध संपले. अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकल्यानंतर जपान शरण आला आणि २ सप्टेंबर, १९४५ रोजी अधिकृतपणे दुसरे महायुद्ध संपले. दुसरे महायुद्ध ही विसाव्या शतकातील सर्वात महत्त्वाची आणि प्रभावशाली घटना होती. अगणित विध्वंस या युद्धाने केला. एकूण लष्करी आणि नागरी मृत्यू अंदाजे ७० ते ८५ दशलक्ष झाले. यातील अमेरिकेचे ४ दशलक्ष आणि भारताचे ३ दशलक्ष नागरिक आहेत. या महायुद्धाचा कळस म्हणजे जपानवरील अणुहल्ले. अणुहल्ल्याची ताकद यामुळे जगाला समजली. तिथपासून अण्वस्त्रांची स्पर्धा सुरू झाली आहे. युनायटेड स्टेट्स आणि पश्चिम युरोपमधील राष्ट्रांनी सामूहिक संरक्षण वाढविण्याचे एक साधन म्हणून ‘नाटो’ची स्थापना केली आणि संयुक्त राष्ट्रांनी एक संस्था म्हणून काम करण्यास सुरुवात केली, ज्यांचे एक उद्दिष्ट पुढील युद्ध रोखणे हे होते. एके काळी कटू शत्रू असणारे देश जपान आणि युनायटेड स्टेट्स हे मित्र आहेत आणि त्यांचे संबंध मजबूत आहेत.

दुसऱ्या महायुद्धाचा शेवट हा संक्रमणाचा काळ होता. युद्धाने लाखो अमेरिकन लोकांना संधी दिली आणि युद्धाच्या समाप्तीपर्यंत हे राष्ट्र जगातील प्रबळ आर्थिक आणि लष्करी शक्ती म्हणून उदयास आले. युद्धादरम्यान ६ दशलक्ष महिलांना रोजगार मिळाला. उत्पादन उद्योगात एकूण कर्मचार्‍यांमध्ये महिलांची टक्केवारी ३५ टक्क्यांपर्यंत वाढली. १९४५ पर्यंत आणि युद्धाच्या समाप्तीपर्यंत, वंशसंबंध सुधारण्यासाठी अमेरिकन समुदायांनी ४०० हून अधिक समित्या स्थापन केल्या होत्या. १९४४ मध्ये, नागरी जीवनात परत आलेल्या सैन्याला पुन्हा कार्यक्षम करण्यासाठी कॉंग्रेसने ‘सर्व्हिसमन रीडजस्टमेंट कायदा’ संमत केला, ज्याला ‘GI बिल ऑफ राइट्स’ म्हणून ओळखले जाते. दुसरे महायुद्ध विध्वंसक ठरलेच, तसेच त्यातून विज्ञान आणि तंत्रज्ञान याची ओळख जगाला होऊ लागली.

आज ‘युरोप विजय दिना’निमित्त १० रुपयाला मिळणाऱ्या कोका-कोलाने महायुद्धात बजावलेली कामगिरी आणि महायुद्धाचे भारतावर आणि जगावर झालेले परिणाम नक्कीच महत्त्वपूर्ण आहेत.