संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलैपासून सुरू होणार असून २३ जुलै रोजी अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. तसेच १२ ऑगस्ट रोजी अर्थसंकल्पाचा शेवट होईल, अशी माहिती केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी (६ जुलै) दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर आता एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्पही त्याच सादर करणार आहेत. सलग सातवेळा केंद्रीय अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या पहिल्याच व्यक्ती ठरणार आहेत. याआधी माजी पंतप्रधान आणि अर्थमंत्री असलेल्या मोरारजी देसाई यांनी सलग सहावेळा अर्थसंकल्प सादर केला होता. मात्र, भारतातील पहिला अर्थसंकल्प कसा सादर झाला होता आणि तो कुणी सादर केला होता, याविषयी माहिती घेणे रंजक ठरेल. भारतातील पहिला अर्थसंकल्प भारतावर ब्रिटिशांची राजवट असतानाचा सादर केला गेला होता. अर्थातच, तो ब्रिटिशांकडून ब्रिटीश सदस्यांसमोरच सादर करण्यात आला होता. भारतातील हा पहिला अर्थसंकल्प १८६० साली सादर करण्यात आला होता. आता अर्थमंत्री निर्मला सीतारामण २३ जुलै रोजी देशातील ९३ वा अर्थसंकल्प सादर करतील. १८६० पासून भारताने आतापर्यंत ७७ नियमित आणि संपूर्ण तर १५ अंतरिम अर्थसंकल्प सादर केले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा