भारताच्या शस्त्रागारात लवकरच ‘हंटर किलर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या MQ-9B या ड्रोनचा समावेश होणार आहे. दहशतवाद्यांसाठी कर्दनकाळ ठरलेले हे ड्रोन चीन आणि पाकिस्तानसाठी काळ ठरतील आणि सीमारेषांवरही भारताची ताकद वाढवतील. नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत अमेरिका आणि भारत यांच्यात लवकरच MQ-9B ड्रोनसंबंधीचा मोठा आणि महत्त्वाचा करार होणार आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या अहवालानुसार ३१ ड्रोनसाठीची चर्चा आता प्रगतीच्या टप्प्यात आहे. त्यातील १५ ड्रोन नौदलाला आणि प्रत्येकी आठ-आठ ड्रोन सैन्य व हवाई दलाला मिळतील. सध्या भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये संघर्षाचे वातावरण आहे. बांगलादेशमध्ये हिंसक आंदोलने सुरू आहे. त्यात चीन आणि पाकिस्तानचा हस्तक्षेप असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. अशा काळात ही घोषणा भारतासाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

विशेष म्हणजे चीन आणि भारत दोन्ही देश पाच वर्षांपासून लष्करी वादात अडकले आहेत. चीनने सीमारेषेवरील आपल्या हालचाली वाढवल्या आहेत. चीनकडून पाकिस्तानला हाँग-४ व विंग लूंग-२ या ड्रोनची डिलिव्हरीही वाढवण्यात आली आहे. फेब्रुवारीमध्ये अमेरिकेने ३१ MQ-9B रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट (RPA) आणि संबंधित उपकरणांच्या विक्रीस मान्यता दिली होती. भारताने यासाठी ३.९९ अब्ज डॉलर्सची (३३,०६० कोटी) गुंतवणूक केली; परंतु, MQ-9B ड्रोन नेमके काय आहे? आणि भारताला हे ड्रोन का हवे आहेत? याविषयी जाणून घेऊ.

India successfully tests anti tank missile Nag Mk 2
शत्रूचा थरकाप उडवणाऱ्या ‘नाग’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; पाकिस्तान-चीनच्या कारवायांना चाप बसणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Atal Setu , Atal Setu one year , Atal Setu Transport ,
वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण
Gold, charas, ganja, Mumbai airport,
मुंबई विमानतळावर सोने, चरस, गांजा जप्त
Permission , robotic parking lot, Mumbadevi,
मुंबादेवीतील अत्याधुनिक रोबोटिक वाहनतळाच्या कामाला परवानगी द्यावी, मुंबई महापालिकेचे राज्य सरकारला साकडे
Mahakumbh mela 2025 Drone Show fact check video
महाकुंभ मेळ्यात पाहायला मिळेल डोळे दिपवणारा भव्य ‘ड्रोन शो’? व्हायरल होणारा ‘तो’ व्हिडीओ नेमका कुठला? सत्य जाणून तुम्हीही व्हाल हैराण
Drones will monitor illegal fishing and boat entry in Thane and Palghars bay
अनधिकृत मासेमारी आणि नौकांवर ड्रोनद्वारे नजर
pune Municipal Corporation plans to open Pimpri flyover by March
पिंपरी : डेअरी फार्म येथील उड्डाणपूल मार्चअखेर खुला?
भारताच्या शस्त्रागारात लवकरच ‘हंटर किलर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या MQ-9B या ड्रोनचा समावेश होणार आहे. (छायाचित्र-पीटीआय)

हेही वाचा : स्वतंत्र भारताची पहिली सकाळ अन् सनईचा तो सूर भारतीयांच्या मनात अजरामर

हंटर किलर – MQ-9B

जनरल अॅटोमिक्स एरोनॉटिकल सिस्टीम्सद्वारे निर्मित MQ-9B ड्रोन कुठल्याही प्रकारच्या मिशनवर पाठवले जाऊ शकतात. हे ड्रोन अमेरिकन कंपनी अॅटोमिक्सने तयार केले आहेत. हे ड्रोन ११ मीटर लांब असून, याचे विंग्स २२ मीटरपेक्षा लांब आहेत. या ड्रोनमध्ये सलग २७ तास टेहळणी करीत उड्डाण करण्याची क्षमता आहे. या ड्रोनमध्ये ५० हजार फूट उंचीवरून शत्रूला लक्ष्य करण्याची क्षमता आहे. हा ड्रोन १,७४६ किलोग्रॅम वजनापर्यंतचे शस्त्र घेऊन उडू शकतो. त्याची रेंज अंदाजे १९०० किलोमीटर इतकी आहे.

इलेक्ट्रो-ऑप्टिकल/इन्फ्रारेड (EO/IR), लिंक्स मल्टी-मोड रडार, मल्टी-मोड मेरिटाइम सर्व्हिलन्स रडार, इलेक्ट्रॉनिक सपोर्ट मेझर्स (ESM), लेझर डिझायनेटर आणि अशा प्रकारची विविध शस्त्रे व पेलोड पॅकेज वाहून नेण्याची क्षमता या ड्रोनमध्ये आहे. अमेरिकेच्या वायुसेनेनुसार या ड्रोनमध्ये आठ लेझर क्षेपणास्त्रे, हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र -११४ हेलफायर वापरता येणे शक्य आहे. ही अचूक मारा करणारी शस्त्रे आहेत. इराक आणि अफगाणिस्तान युद्धांदरम्यान त्यांचा वापर करण्यात आला होता. या ड्रोनने येथे अचूक मारा केला होता; ज्यात मोठ्या संख्येने नागरिक मारले गेले, असे वृत्त ‘द गार्डियन’ने दिले. RQ-1/MQ-1Predator ला २०१७ मध्ये अमेरिकी वायुसेनेने निवृत्त केले आणि त्यांची जागा या मानवरहित ड्रोनने घेतली.

आज MQ-9B ड्रोन यूएस फोर्स, नासा, ब्रिटन रॉयल एअर फोर्स, इटालियन एअर फोर्स, फ्रेंच एअर फोर्स व स्पॅनिश एअर फोर्सद्वारे वापरले जात आहेत. जपाननेदेखील एप्रिल २०२३ मध्ये MQ-9B आपल्या शस्त्रागारात समाविष्ट केले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे जानेवारी २०२० मध्ये इराकमध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात इराणी जनरल कासिम सुलेमानी मारला गेला होता. तर MQ-9B पूर्वी MQ-9A रीपरने २०२२ साली काबूलमध्ये अल-कायदा नेता अयमान अल-जवाहिरीला ठार मारले होते.

MQ-9B ड्रोनसाठी भारत दीर्घकाळापासून प्रतीक्षेत

भारतीय नौदल २०२० पासून भाडेतत्त्वावर दोन नि:शस्त्र सी-गार्डियन ड्रोन चालवत होते. सी-गार्डियन ड्रोन हा MQ-9B चाच एक प्रकार आहे; जो सागरी सुरक्षेसाठी वापरला जातो. त्यानंतर भारताने MQ-9B मध्ये स्वारस्य दाखवले. हा करार पाच वर्षांहून अधिक काळ चालू आहे आणि १५ जून २०२३ रोजी संरक्षण मंत्रालयाने ३१ MQ-9B ड्रोनच्या खरेदीला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी जून २०२३ मध्ये अमेरिकेच्या दौर्‍यावर गेले होते. त्याआधीच या विषयावर चर्चा झाली होती. त्यानंतर सप्टेंबर २०२३ मध्ये जी-२० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या बैठकीपूर्वी भारताने अमेरिकी सरकारला ड्रोनसाठी औपचारिक विनंती जारी केली आणि विनंतीचे तपशीलवार पत्र (LoR) पाठवले होते.

भारतासाठी ड्रोन ठरणार गेम चेंजर

उड्डाण करण्याची क्षमता आणि अचूक मारा करण्याच्या क्षमतेसह MQ-9Bs भारताच्या सशस्त्र दलांच्या इंटेलिजन्स-सर्व्हायलन्स-रीकॉनिसन्स (ISR) क्षमता वाढवू शकतात. टाइम्स ऑफ इंडियानुसार हे ड्रोन भारतीय महासागर क्षेत्रात (IOR) आणि जमिनीच्या सीमेवर लांब पल्ल्यापर्यंत नजर ठेवण्याच्या आणि स्ट्राइक क्षमतांमध्ये भारताला मदत करू शकतात. भारतीय लष्करी नियोजकांनी ‘इंडिया टुडे’ला जानेवारीमध्ये माहिती दिली की, सशस्त्र ड्रोन भारतीय सैन्याला आणखी ताकद देईल. रिमोट नियंत्रित ऑपरेशन्स आणि सर्जिकल स्ट्राइक, जसे की पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी लपलेली ठिकाणे आणि चीनच्या सीमारेषेवरील हालचालींवर या ड्रोनद्वारे लक्ष ठेवता येईल.

हेही वाचा : ‘गरिबांचे कोकेन’ म्हणून ओळखले जाणारे कॅप्टॅगॉन नक्की काय आहे? या गोळ्या चर्चेत येण्याचं कारण काय?

विशेष म्हणजे हे ड्रोन कोणत्याही हवामानात ऑपरेट करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे भारत-चीन सीमारेषेवर हे ड्रोन तैनात करण्याला भारत प्राधान्य देईल. जनरल ॲटॉमिक्स ड्रोन किफायतशीर असल्याचेदेखील संगितले जाते. जास्तीत जास्त ४८० किलोमीटर प्रतितास वेगाने हवेत संचार करण्याचे कौशल्य या ड्रोनमध्ये आहे. एका अधिकाऱ्याने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले, “एकदा करार पूर्ण झाला आणि वितरण सुरू झाले की, ड्रोन बहुधा हिंद महासागर क्षेत्रासाठी अरकोनम, पोरबंदर, सरसावा व गोरखपूर येथे आयएसआर कमांड आणि कंट्रोल सेंटरवर तैनात केले जातील. “लांब पल्ल्याचा मारा करण्याची क्षमता असणार्‍या ड्रोनची आवश्यकता भारताला होती. कारण- चीनचे नौदल आक्रमण आणखी वाढणार आहे.”

Story img Loader