History of Buddhism in China: भारत ही बौद्ध धर्माची जन्मभूमी आहे. असे असले तरी उर्वरित आशिया खंडात बौद्ध धर्माचा प्रसार वेगाने झाला. त्यातही भारताच्या शेजारील देशामध्ये चीनमध्ये बौद्ध धर्माने काळाच्या ओघात पकड मजबूत केली. परंतु चीनमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी जी एक गोष्ट कारणीभूत ठरली ती म्हणजे, एका सम्राटाला पडलेलं स्वप्न. या सम्राटाने स्वप्नात बुद्धाला पाहिलं आणि भारतात एक दूत मंडळ पाठवलं. हीच घटना चीनमधील बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरल्याचे मानले जाते.

Indian-style Buddhist Temple in Luoyang, China
चीनमधील भारतीय शैलीतील बौद्ध मंदिर

चीनमधील सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक स्थळांमध्ये हेनान प्रांतातील लुओयांग येथील व्हाईट हॉर्स मंदिर संकुल भारतीय आणि चिनी संस्कृतींमध्ये अधिक दृढ संबंध निर्माण करणारे ठरते. इ.स. ६८ मध्ये हान राजवंशातील सम्राट मिंग किंवा मिंगदी यांच्या कारकिर्दीत हे मंदिर चीनमधील पहिले बौद्ध उपासना स्थळ ठरले. याच ठिकाणाहून बौद्ध धर्म पुढे व्हिएतनाम, जपान आणि कोरियामध्ये पसरला. हा इतिहास असला तरी २०१० साली भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी याच परिसरात भारतीय शैलीतील बौद्ध प्रार्थना स्थळाचे उद्घाटन केले. हे स्थळ भारतीय आणि चिनी संस्कृतींच्या संगमाचे अद्वितीय प्रतीकच आहे, असे गौरवोद्वागार राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी उद्घाटनप्रसंगी काढले होते.

Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हस्तक्षेपास एवढा विलंब का झाला?
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
guru and shukra yuti | Gaj Lakshmi Rajyog
Gaj Lakshmi Rajyog : मिथुन राशीमध्ये १२ वर्षानंतर निर्माण होणार गजलक्ष्मी राजयोग, या तीन राशींचे नशीब चमकणार, होणार आकस्मिक धनलाभ
Gajakesari Yoga
१६ नोव्हेंबरला निर्माण होणार शक्तीशाली गजकेसरी योग! ‘या’ राशींचे लोक जगणार आलिशान आयुष्य, नव्या नोकरीसह होईल धनलाभ
two kerala ias officers suspended over hindu muslim whatsapp group
अन्वयार्थ : ‘कर्त्यां’चा बेभानपणा!
Luoyang, China - Baima Si (Buddha temple of White Horse)
लुओयांग, चीन – बायमा सी (पांढऱ्या घोड्याचे बुद्ध मंदिर)

एका प्रचलित कथेनुसार या मंदिराच्या बांधकामाचा तसेच चीनमध्ये बौद्ध धर्माच्या आगमनाचा प्रारंभ एका स्वप्नामुळे झाला. या कथेत उत्तर हान किंवा इस्टर्न हान राजवंशाचा सम्राट मिंगदी यांना स्वप्न पडले की, एक सुवर्णमूर्ती त्यांच्या राजवाड्यावर उडत होती आणि तिच्या डोक्यामागे सूर्य आणि चंद्र चमकत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी हे स्वप्न आपल्या मंत्रिमंडळास सांगितले. ते ऐकून ती मूर्ती बुद्धाची असू शकते असे मंत्रिमंडळातील अनेकांनी सुचवले. त्या काळात फक्त चीनमधील पंडित आणि विद्वानांना बौद्ध धर्माची माहिती होती. कारण बौद्ध धर्माची शिकवण व्यापारी आणि प्रवासी यांच्याद्वारे चीनमध्ये पोहोचली होती. त्याच वेळी, देशात प्रमुख धर्म म्हणून कन्फ्युशियन धर्म प्रचलित होता.

अधिक वाचा: Constitution Day: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे महिलांना संविधानात कोणते हक्क मिळाले?

The shanmen at White Horse Temple, in Luoyang, Henan, China.
व्हाईट हॉर्स टेंपलमधील शानमेन

चीनमध्ये काय घडत होते?

भारतात बौद्ध धर्म विकसित होत असताना चीनमध्ये काय घडत होते, हेही जाणून घेणे गरजेचे आहे. बौद्ध धर्माचे अमेरिकन अभ्यासक केनेथ सॉंडर्स यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या जर्नल ऑफ रिलिजनमध्ये (१९२३) मध्ये लिहिलेल्या शोधनिबंधात म्हटले आहे की, ‘ज्यावेळी गौतम बुद्ध गंगेच्या खोऱ्यात उपदेश करत होते, त्याचवेळी कन्फ्युशियस आणि लाओ-त्से प्राचीन चिनी ‘अ‍ॅनिमिझम’ किंवा ‘युनिव्हर्सिझम’ या परंपरेत त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शिकवणींची कलमे जोडत होते. ज्याकाळात भारत आणि त्याच्या शेजारच्या देशांमध्ये थेरवाद बौद्ध धर्म महायान बौद्ध धर्मात परिवर्तित होत होता त्यावेळी, चिनी धर्माचा हा महान मुख्य स्त्रोत नवीन उपदेश स्वीकारण्यासाठी सुसज्ज होत होता.’

सॉंडर्स यांनी नमूद केले आहे की, मिंगदी यांना स्वप्न अचानक पडले नसावे. ‘सम्राटाच्या मनात आधीच असलेल्या विचारांमध्ये आणि चीनमध्ये आधीपासूनच प्रसारित होत असलेल्या बौद्ध प्रतिमा किंवा बौद्ध शिकवणीत त्या दृष्टिकोनाचे काहीतरी मूळ असले पाहिजे’ असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटल्याप्रमाणे इसवी सनपूर्व १२१ साली एका मोहिमेद्वारे गौतम बुद्धांची एक प्रतिमा चीनमध्ये आणण्यात आली होती. मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर मिंगदी यांनी बौद्ध धर्माबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी भारतात एक दूतमंडळ पाठवले. १८ जणांचे हा गट भारताकडे पश्चिमेकडे प्रवास करत, सध्याच्या झिनजियांग प्रदेशातून मार्गक्रमण करत निघाला. या मोहिमेने त्यांनी सामान्य नागरिक आणि बौद्ध भिक्षूंशी व्यापक संवाद साधला.

धोकादायक प्रवास

असे मानले जाते की, मिंगदीच्या मोहिमेने दोन भारतीय भिक्षूंना चीनमध्ये जाण्यासाठी राजी केले. त्यापैकी एक होते कश्यप मातंग. कश्यप मातंग हे मध्य भारतातील ब्राह्मण कुटुंबातून आले होते आणि महायान सूत्रांमध्ये पारंगत होते. तर दुसरे विद्वान धर्मरतन होते. सॉंडर्स यांच्या मते, हे भिक्षू आधीच मध्य आशियामध्ये धर्मप्रसारासाठी काम करत होते. त्यांनी सध्याच्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या काही भागांमध्ये वसलेल्या यूची लोकांमध्ये बुद्धाचा संदेश पसरवण्याचा प्रयत्न केला होता. मिंगदीच्या दूतमंडळाबरोबर चीनला प्रवास करताना, या दोन्ही भिक्षूंनी बरोबर एक पांढरा घोडा नेला होता, ज्यावर बुद्ध सूत्रांचे गठ्ठे आणि प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. हा प्रवास खूप लांब आणि कष्टदायक होता, ज्यामुळे भिक्षूंना खूप त्रास सहन करावा लागला.

Sculpture at the White Horse Temple in Luoyang
लुओयांगमधील व्हाईट हॉर्स टेंपलमधील शिल्प

नैतिक शिकवणीचे ग्रंथ

मात्र लुओयांगमध्ये त्यांना मिळालेल्या भव्य स्वागताने हा थकवा भरून निघाला. इ.स. ६७ मध्ये, त्यांनी राजधानीत वास्तव्य केले. त्यांच्यावर नैतिक शिकवणींचे मार्गदर्शक ग्रंथ तयार करण्याचे काम सोपवण्यात आले होते. हा एक असा ग्रंथ होता जो कन्फ्युशियन किंवा ताओवाद्यांना काहीही त्रासदायक वाटणार नाही आणि ते थेरवाद तसेच महायान बौद्ध दोघांनाही सहज स्वीकारतील,” असे सॉंडर्स यांनी म्हटले आहे. ते दोन्ही भिक्षु राजवाड्याच्या ग्रंथालयात कार्यरत होते. त्यांनी चिनी मनोवृत्तीला समजून घेण्यासाठी वापरलेल्या बारकावे आणि कौशल्याचा हा ग्रंथ पुरावा आहे. परंतु एका प्राचीन नोंदीत या भिक्षूंनी आपले ज्ञान लपवले असे म्हटले आहे. सगळ्याच ग्रंथांचे भाषांतर केले नाही, अशी पुस्तीही जोडण्यात आली आहे.

अधिक वाचा: Dancing Mouse: ८१ वर्षांनंतर सापडले ‘डान्सिंग माऊस’ या दुसऱ्या महायुद्धातील युद्धनौकेचे अवशेष; इतिहास नेमकं काय सांगतो?

पांढरा घोडा

व्यापक मान्यता असलेल्या कथेप्रमाणे भिक्षूंच्या लुओयांगमधील आगमनानंतर वर्षभरात, मिंगदीने त्या घोड्याच्या स्मरणार्थ पांढऱ्या घोड्याच्या मंदिराची स्थापना केली, जो त्या धर्मप्रचारकांबरोबर आला होता. निश्चितच, काही विद्वान या कथेला आव्हान देतात. “आम्हाला हे आश्चर्य वाटले की, बौद्ध मंदिराचे नाव पांढऱ्या घोड्यावर ठेवले गेले, जो प्राचीन भारतीय बौद्ध धर्माशी कोणतेही संबंध नसलेला प्रतीक आहे,” असे गॉडफ्रे लियू आणि विल्यम वॅंग यांनी १९९६ साली ‘चायनीज जर्नल ऑफ लिंग्विस्टिक्स’ मध्ये लिहिले आहे. त्यांनी असा युक्तिवाद केला की, मंदिराचे नाव संस्कृतमधील कमळ (पद्म) या शब्दावरून आले आहे आणि चिनी शब्द ‘बाई मा’ (पांढरा घोडा) हा मुळात एक लिप्यंतर आहे. पांढऱ्या घोड्याचे प्रतीक हे लोकव्युत्पत्तीच्या प्रक्रियेमुळे तयार झाले आहे. लियू आणि वॅंग यांनी पुढे स्पष्ट केले, ‘ही अशी प्रक्रिया आहे जिथे स्रोत भाषा X मधील एखाद्या अभिव्यक्तीचा अर्थ लक्ष्य भाषा Y मध्ये स्पष्ट नसल्यामुळे, Y भाषेतील ध्वनिशास्त्रीयदृष्ट्या समान परंतु वेगळा अर्थ असलेल्या अभिव्यक्तीशी जोडला जातो.” लियू आणि वॅंग यांनी दिलेले स्पष्टीकरण शक्य वाटते. बौद्ध धर्मामध्ये कमळ हे एक महत्त्वाचे प्रतीक मानले जाते, आणि चीन तसेच आशियातील इतर भागांतील अनेक प्राचीन मंदिरे या फुलाच्या नावावर आधारित आहेत. तरीदेखील, मंदिराच्या नावाचा उगम काहीही असो, बहुतेक यात्रेकरू आणि मंदिर प्रशासन पांढऱ्या घोड्याचीच कथा स्वीकारतात.

दोन मार्गदर्शकांची परंपरा

पांढऱ्या घोड्याबरोबर प्रवास करणाऱ्या साथीदारांचं आयुष्य फारकाळ नव्हतं. चिनी इतिहासकारांच्या मते, कश्यप मातंग, यांना चिनी भाषेत जिया येमोतेन्ग म्हटलं जातं, त्यांचे निधन इ.स. ७३ मध्ये झाले. धर्मरतन यांना चिनी भाषेत झू फालान म्हटले जाते, कदाचित ते कश्यप मातंग यांच्या काही वर्षांनंतर मरण पावले. “हे दोन मार्गदर्शक राजधानीत आल्यानंतर फार काळ जगले नाहीत, पण त्यांनी सखोल विद्वत्ता आणि प्रामाणिक परिश्रमांची परंपरा निर्माण केली. त्यांच्या पांढऱ्या घोड्याच्या मठाने त्यानंतर उभ्या राहिलेल्या अनेक मठांसाठी आदर्श निर्माण केला,” असे सॉन्डर्स सांगतात. ‘जसा बैल चिखलातून डोळे उघडे ठेवून ध्येयाकडे चालत जातो, तशाच प्रकारे मेहनत करा’ या त्यांच्या एका सूत्तातील शब्दांमध्ये त्यांच्या ठाम प्रयत्नांचे प्रतिबिंब दिसते आणि हेच त्यांचे योग्य स्मृतिशिल्प आहे” असे सॉन्डर्स सांगतात.

झुआन झांग

दोन्ही भारतीय भिक्षूंना पांढऱ्या घोड्याच्या मठाच्या परिसरात दफन करण्यात आले, हा चीनमध्ये धार्मिक व्यक्तींसाठी मिळणारा एक दुर्मिळ सन्मान होता. शतकांनंतर महान विद्वान आणि प्रवासी झुआन झांग, यांनी भारतात प्रवास (इ.स. ६२९-६४५) केला आणि ते चीनमध्ये परतले आणि पांढऱ्या घोड्याच्या मठाचे ते अभाट (प्रधान) झाले. कश्यप मातंग आणि धर्मरतन यांच्या मृत्यूनंतर, भारत आणि अफगाणिस्तानातील अनेक भिक्षूंनी लुओयांगपर्यंत पोहोचण्यासाठी कठीण प्रवास करण्यास सुरुवात केली.

अधिक वाचा: Discovering the Blue-Eyed Child: १७ हजार वर्षांपूर्वीच्या निळ्या डोळ्यांच्या बालकाचे अवशेष कोणती जनुकीय व इतर माहिती सांगतात?

“भारतीय भिक्षूंनी चीनमध्ये प्रवास करण्याचा निर्णय घेतला, तरी प्रवासाच्या अडचणी आणि आपल्या मातृभूमीला परतण्याची शक्यता अत्यंत कमी होती, तरीही त्यांचे स्वागत आणि सन्मान यामुळे त्यांनी हा कठीण निर्णय घेतला,” असं मत माधवी थम्पी यांनी व्यक्त केलं आहे. माधवी थम्पी यांनी दिल्ली विद्यापीठात ३५ वर्षे चीनचा इतिहास शिकवला असून त्यांच्या ‘इंडियन्स इन चायना, १८००-१९४९’ या पुस्तकात हे मत त्यांनी व्यक्त केले आहे. “चिनी सम्राट, राजपुत्र आणि समाजातील इतर घटकांकडून भारतीय भिक्षूंना दिला गेलेला आदर आणि सन्मान त्यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करतो,” असेही त्या सांगतात. भारतीय बौद्ध भिक्षू ११ व्या शतकाच्या अखेरपर्यंत प्राचीन रेशीम मार्गावर नियमित प्रवास करीत असत, त्यानंतर भारतात बौद्ध धर्माचा पूर्णपणे ऱ्हास झाला. स्वतंत्र भारताचे पहिले चीनमधील राजदूत आणि लेखक-कूटनीतिज्ञ के. एम. पणिक्कर यांनी असे म्हटले की, बौद्ध धर्मप्रसारकांमुळे घडलेला या दोन देशांमधील सहस्रकभराचा संवाद आशियायी इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना होती.