पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्या उपस्थितीत २८ ऑक्टोबर रोजी बडोद्यात टाटा-एअरबस एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सचे उद्घाटन झाले. या प्रकल्पामध्ये सी-२९५ या भारतीय हवाईदलाच्या बहुद्देशीय समारिक मालवाहू विमानाची निर्मिती होणार आहे. भारतीय हवाईदलाप्रमाणेच भारतातील खासगी क्षेत्रासाठीही हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल. सी-२९५च्या निमित्ताने भारतात प्रथमच एखाद्या विमानाची पूर्ण निर्मिती, देखभाल-दुरुस्ती, भविष्यात निर्यात या सगळ्या बाबी घडून येतील.

सी-२९५ विमानाचे वैशिष्ट्य

सी-२९५ हे बहुद्देशीय सामरिक महत्त्वाचे मालवाहू विमान आहे. भारतासारख्या मोठ्या देशात आणि विविध भौगोलिक प्रदेशांतील लष्करी महत्त्वाच्या आस्थापनांदरम्यान सैनिक, सामग्री, रसद वाहतुकीसाठी या विमानाचा उत्तम उपयोग होऊ शकतो. चीन सीमेवर मोठ्या प्रमाणात सैनिक व सामग्रीची ने-आण करण्यासाठी रस्त्यांपेक्षा हवाई वाहतूकच अधिक सोयीची ठरते. सध्या भारताच्या ताफ्यात या कामासाठी असलेली अॅव्हरो विमाने खूप जुनी झाली आहेत. १९६०च्या दशकात निर्मिलेल्या या विमानांची डागडुजी करणेही सध्या शक्य होत नाही. सैनिक आणि सामग्री वाहतुकीबरोबरच सी-२९५ विमान वैद्यकीय आणीबाणी, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची ने-आण, हवाई मार्गाने आगी विझवणे आणि टेहेळणी अशा कामांसाठी वापरले जाणार आहे. ते ३० हजार फूट उंचीपर्यंत उडू शकते. नऊ टन वजन किंवा ७० सैनिकांना वाहून नेऊ शकते. चटकन उड्डाण घेण्याबरोबरच कमी टणक, गवताळ किंवा भुसभुशीत धावपट्टीवरही उतरू शकतो.

hibox scam bharati singh elvish yadav
हायबॉक्स गुंतवणूक घोटाळ्यात भारती सिंगसह एल्विश यादवचे नाव; काय आहे हा १००० कोटी रुपयांचा घोटाळा?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
jaya kishori troll dior bag
दोन लाखांच्या बॅगवरून सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु चर्चेत; कोण आहेत जया किशोरी? ही बॅग गाईच्या कातड्यापासून तयार झाली आहे का?
Armenia has emerged as India's leading defence export destination
भारताचा सर्वांत मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश ठरला आर्मेनिया; भारताला याचा किती फायदा?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?

हे ही वाचा… आध्यात्मिक गुरु जया किशोरी कोण आहेत? त्या खरंच गाईच्या कातड्यापासून तयार झालेली बॅग वापरतात का?

भारतात किती विमानांची निर्मिती?

सी-२९५ ही विमाने एअरबस कंपनी बनवत असे. आता लवकरच त्यांची निर्मिती भारतात एअरबसच्या सहकार्याने टाटा समूहाकडून होणार आहे. असा ५६ विमानांची मागणी भारताने नोंदवली. त्यांतील १६ स्पेनमधील सेव्हिया येथे बनवली जातील. उर्वरित ४० विमानांची निर्मिती भारतात होईल.

हा प्रकल्प ऐतिहासिक का?

विमानांची निर्मिती या अत्यंत गुंतागुंतीच्या तंत्रज्ञान प्रकाराची मुहूर्तमेढ या निमित्ताने भारतात रोवली जात आहे. जगातील फारच थोड्या देशांना स्वबळावर संपूर्ण विमाने बनवता येतात. ‘संपूर्ण’ ही संकल्पना महत्त्वाची, कारण भारतात एरवी काही लढाऊ विमानांची जुळणी केली जाते. परंतु ती संपूर्ण निर्मिती नव्हे. तसेच या विमानांची देखभाल-दुरुस्ती आणि भविष्यात निर्यात होण्याचीही शक्यता आहे. अशा रीतीने विमाननिर्मिती आणि विमान निर्यातीच्या महत्त्वाच्या क्षेत्रात भारताचे पदार्पण होईल.

हे ही वाचा… Jama Masjid a protected monument?: जामा मशीद, शाही इमाम आणि संरक्षित स्थळाचा वाद; न्यायालयासमोरचा नेमका तिढा काय?

टाटा समूहाची भूमिका…

भारतात खासगी संरक्षण सामग्रीनिर्मितीसाठी खासगी कंपन्यांना आमंत्रण देण्याचे नरेंद्र मोदी सरकारचे धोरण आहे. यातून परदेशी कंपन्यांवर अवलंबित्व कमी होईल, आणीबाणीच्या वेळी योग्य ती सामग्री उपलब्ध होईल आणि तिच्यासाठी अव्वाच्या सव्वा खर्चही करावा लागणार नाही ही ‘मेक इन इंडिया’मागील भूमिका आहे. याअंतर्गत एअरबसच्या सहकार्याने या विमानांची निर्मिती टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम (टीएएस) या कंपनीकडून होत आहे. ती बडोद्यातील टाटा-एअरबस प्रकल्पात होईल. टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिमने यापूर्वी बोईंग कंपनीच्या साह्याने हवाईदलात समाविष्ट झालेल्या अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरचे सांगाडे बनवण्यास सुरुवात केली आहे. टीएएस ही संरक्षण सामग्री निर्मितीमधील देशातली सर्वांत मोठी कंपनी आहे. चिलखती वाहने, मिसाइल लाँचर वाहने आदी अनेक सामग्री या कंपनीकडून बनवली जात आहेत.

स्पेनचा काय संबंध?

एअरबस ही युरोपियन कंपनी व्यापारी विमाने, संरक्षण क्षेत्रात लढाऊ आणि मालवाहू विमाने, हेलिकॉप्टरची निर्मिती करते. फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन आणि स्पेन येथे या कंपनीचे कारखाने आहेत. यातील स्पेनमधील कारखाना पूर्वी ‘कासा’ या कंपनीच्या ताब्यात होता. नवीन सहस्रकाच्या सुरुवातीला ‘कासा’चे फ्रेंच आणि जर्मन कंपन्यांबरोबर विलीनीकरण होऊन, युरोपियन एरॉनॉटिक डिफेन्स अँड स्पेस (ईएडीएस) ही कंपनी स्थापन झाली. यांतील कासाच्या कारखान्यात म्हणजे स्पेनमध्ये सी-२९५ विमानाची निर्मिती होत होती. त्यामुळेच स्पेनचे पंतप्रधान या विमानाच्या भारतातील निर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटनाला आले होते.

Story img Loader