दोन दिवसांपूर्वी टर्कीमध्ये भूकंपाच्या मोठ्या धक्क्यांमुळे भीषण नैसर्गिक संकट ओढवलं. आत्तापर्यंत हजारो नागरिकांना या भीषण दुर्घटनेत आपला जीव गमवावा लागला आहे. लाखो लोक बेघर झाले आहेत. निसर्गासमोर टर्कीमध्ये मानवजात हतबल होऊन गतप्राण होऊ लागलेली असताना भारतानं धीरोदात्तपणे आपल्या परंपरेला जागत मदतीचा पहिला हात पुढे केला. टर्कीमधील संहारक भूकंपाची माहिती मिळताच भारतानं तिथे तातडीनं आर्मी मेडिकल टीम, नॅशनल डिजास्टर रिलीफ फोर्स (NDRF)च्या तुकड्या आणि वैद्यकीय मदत पाठवली. पाकिस्ताननं इथेही आगळीक करत भारतीय विमानांना हवाई हद्दीत प्रवेश नाकारला. पण अडवणूक करणाऱ्या पाकिस्तानला वळसा घालून भारतीय विमानं टर्कीच्या हद्दीत दाखल झाली!

भारतानं टर्कीला मदत पाठवण्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासांत भारतीय वायूदलाची विमानं टर्कीच्या दिशेनं झेपावण्यासाठी सज्ज होती. “क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट टीम, ऑर्थोपियाडिक सर्जिकल टीम, जनरल सर्जिकल टीम, मेडिकल स्पेशालिस्ट टीम आणि इतर मेडिकल टीम या विमानांमधून टर्कीमध्ये दाखल झाली आहेत”, अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे.

Bahujan samaj vidhan sabha election 2024
बहुजन समाजातील संधीसाधूपणावर उपाय काय?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
candidature of Sameer Bhujbal Nirmala Gavit Rajshree Ahirrao remains in nashik
महायुती, मविआ दोघांनाही बंडखोरीचा त्रास; समीर भुजबळ, निर्मला गावित, राजश्री अहिरराव यांची उमेदवारी कायम
traffic jam on pune Bengaluru highway
पुणे – बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या रांगाच रांगा
Loksatta anvyarth Ten elephants died in the Bandhavgarh tiger project in Madhya Pradesh
अन्वयार्थ: हत्तीएवढ्या दुर्लक्षाचे बळी
Number of people injured while bursting firecrackers on Diwali rises to 49 mumbai print news
दिवाळीत फटाके फोडताना जखमी झालेल्यांची संख्या ४९ वर
terror among the villagers after tiger kills man in melghat
मेळघाटात वाघाच्‍या हल्‍ल्‍यात एकाचा मृत्‍यू ; गावकऱ्यांमध्‍ये दहशत
Pune Crime Unsafe City Pune City Issues Education Assembly Election 2024
लोकजागर : ‘पुण्य’कीर्तीचे पतन

पण अशा प्रकारे तातडीनं आणि शक्य ती सर्व मदत पुरवण्याची ही भारताची पहिलीच वेळ नाही. गेल्या १५ वर्षांचाच विचार जरी करायचा झाला, तरी टर्कीसारख्या इतरही अनेक देशांना भारतानं अशा संकटकाळात मदतीचा हात पुढे केला आहे. भरभरून मदत केली आहे आणि यातूनच या देशांसोबत असणारे संबंध वृद्धिंगतही केले आहेत.

विश्लेषण : तुर्कस्तान-सीरियामध्ये वारंवार भूकंप का होतात?

अमेरिका…

१३ सप्टेंबर २००५ रोजी अमेरिकेला कटरिना चक्रीवादळातचा तडाखा बसला. भारतीय वायूदलाच्या आयएल-७६ या विमानानं अर्कान्सासमधील लिटल रॉक एअरफोर्स बेसवर तब्बल २५ टन इतकं मदत साहित्य पोहोचवलं होतं. यामध्ये ३ हजार ब्लँकेट्स, बेडशीट्स, टारपोलिन आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या सामग्रीचा समावेश होता.

मालदीव…

२००४मध्ये मालदीवमध्ये त्सुनामीच्या तडाख्यामुळे उद्भवलेल्या भीषण परिस्थितीत भारत सरकारने मदतीसाठी ५ कोटींचं पॅकेजच जाहीर केलं होतं. मदतकार्यासाठी ऑपरेशन कॅस्टोर सुरू करण्यात आलं होतं. यामध्ये ४ विमानं आणि नौदलाची दोन जहाजं मदतकार्यात गुंतली होती. यासोबतच त्सुनामीग्रस्त भागातील जनरेटर्स दुरुस्त करणं, संपर्कयंत्रणा पूर्ववत करणं, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कऱणं आणि या जहाजांवर वैद्यकीय मदतीची सोय करणं या गोष्टीही यावेळी करण्यात आल्या होत्या.

श्रीलंका…

२६ डिसेंबर २००४ मध्ये श्रीलंकेला त्सुनामीचा जोरदार तडाखा बसला. यावेळी बचाव आणि मदतकार्य करण्यासाठी भारतानं ऑपरेशन रेनबो सुरू केलं. याशिवाय भारतानं स्थानिक प्रशासन आणि लष्कराच्या मदतीने जखमींसाठी वैद्यकीय शिबिरांची उभारणी करून हजारो त्सुनामीग्रस्तांवर उपचार केले.यासोबतच प्रतिबंधात्मक औषधे आणि लसींचाही पुरवठा केला.

विश्लेषण: ३३ हजार लोकांचा बळी घेणारा टर्कीमधला ‘तो’ भूकंप; तुर्कस्थानातली सर्वात भयंकर नैसर्गिक आपत्ती!

म्यानमार…

२००८ मध्ये म्यानमारला नर्गिस चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. या नैसर्गक संकटात २० हजार नागरिक मृत्यूमुखी पडले होते. म्यानमारच्या मदतीसाठी सर्वप्रथम भारत धावून गेला होता. भारतानं या काळात म्यानमारला तब्बल १२५.५ टन इतकं मदतीचं साहित्य पुरवलं. यामध्ये औषधं, कपडे, रोजच्या वापराच्या काही वस्तू, पाण्याच्या टाक्या, तंबू, टारपोलिन अशा गोष्टींचा समावेश होता.

जपान…

२०११मध्ये जपानमध्ये त्सुनामीनं हाहाकार उडवला. यावेळी भारतानं फक्त मदतीसाठी साहित्यच पुरवलं नाही, तर ओनागावा भागात अडकलेल्या किंवा हरवलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी, त्यांना वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या ४६ जवानांची तुकडीही तिथे पाठवली होती. तेव्हा तिकडे गेलेल्या जवानांचं ते पहिलं विदेशातलं बचावकार्य होतं. या टीममध्ये एक डॉक्टर, तीन अधिकारी, सहा निरीक्षक, दोन पॅरामेडिक्स आणि हवालदार यांचा समावेश होता. या टीमसोबत ९ हजार किलो मदतीचं साहित्य आणि फळंही पाठवण्यात आली होती.

नेपाळ…

२०१५मध्ये नेपाळमध्येही टर्कीप्रमाणेच भूकंप झाले. यावेळी भारतानं तब्बल १६ शोथपथक नेपाळला पाठवली. यामध्ये देशभरातील जवळपास ७०० सदस्यांचा समावेश होता. या सगळ्यांनी मिळून एकूण ११ जखमींना त्या संकटातून वाचवलं, तर प्रचंड मोठ्या मलब्याखालून १३३ मृतदेह बाहेर काढले. या पथकानं नेपाळमध्ये ६ वैद्यकीय केंद्र उभारून तिथे १२१९ जखमींवर उपचार केले होते. या नैसर्गिक संकटात भारतानं तब्बल ११७६ टन मदतीचं साहित्य नेपाळला पाठवलं होतं.