राखी चव्हाण

वाघांची कमी होत जाणारी संख्या थांबवण्यासाठी आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी भारतात ‘प्रोजेक्ट टायगर’ची सुरुवात केली. आता पाच दशकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाघाशिवाय बिबट्या्या, बर्फाळ बिबट्या, चित्ता, सिंह, जग्वार, प्युमा या प्राण्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी ‘इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’ची (आयबीसीए) सुरुवात केली.

Science Technology Budget 2025 Nuclear Energy
विज्ञान तंत्रज्ञान: हवेतले इमले
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
China obstacle to becoming the world manufacturing hub
जगाचे उत्पादन केंद्र बनण्यात चीनचा अडसर
Indian astronomers discover a giant cosmic web filament Spread over eight and a half million light years
खगोलशास्त्रज्ञांचे महत्त्वाचे संशोधन; शोधला वैश्विक जाळ्याचा तंतू
researchers at iit bombay suggested measures to deal with future economic crises
नैसर्गिक आपत्तीमुळे भविष्यात आर्थिक संकट; आयआयटी मुंबईने सुचविल्या उपाययोजना
mumbai Municipality action under hawker-free area campaign
फेरीवालामुक्त परिसर मोहिमेअंतर्गत पालिकेचा कारवाईचा बडगा
Thousands of foreign birds arrived in Uran with flamingos moving due to Water bodies dried
उरणमध्ये फ्लेमिंगो नव्या पाणथळींच्या शोधात
Special campaign for the conservation of Kanheri Caves
कान्हेरी लेणीच्या संवर्धनासाठी विशेष मोहीम; पर्यटनदृष्ट्या विकसित करणार; खासदार पीयूष गोयल यांची घोषणा

‘इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’ कसे अस्तित्वात आले?

२०१९मध्ये जागतिक व्याघ्र दिनानिमित्त देशातील व्याघ्रगणनेचा अहवाल प्रसिद्ध करताना पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदा शिकारी आणि अवैध वन्यजीव व्यापाराविरुद्ध आंतरराष्ट्रीय गट स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. यावेळी त्यांनी वन्यप्राणी संरक्षण आणि संवर्धनासाठी देश वचनबद्ध असल्याचे सांगितले. वन्यप्राण्यांचे कमी आणि विस्कळीत होत जाणारे अधिवास तसेच त्यांच्या अवयवांच्या बेकायदेशीर व्यापाराचा धोका अधोरेखित केला. वाघ व इतर मार्जार प्रजातींतील प्राण्यांची तस्करी व त्यांच्या बेकायदेशीर व्यापार रोखण्यासाठी या प्रजाती असणाऱ्या देशांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नाही तर स्वत: पुढाकार घेऊन ‘इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’ ची स्थापना केली.

‘इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’ची भूमिका काय?

‘इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’ वाघासह बिबट्या, बर्फाळ बिबट्या, चित्ता, सिंह, जग्वार, प्युमा या प्रजातींच्या संरक्षण व संवर्धनावर काम करेल. वन्यप्राण्यांचा अवैध व्यापार थांबवण्यासाठी हे प्राणी ज्या देशात आहे, त्या देशांसोबत काम करेल. या जागतिक संघटनेत सुमारे ९७ श्रेणीतील देशांचा समावेश आहे. यामुळे इतर देशांच्या अनुभवातून संरक्षण व संवर्धन कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना एकंदर परिसंस्थेसाठी आर्थिक व तांत्रिक संसाधने एकत्र करणे सोपे ठरेल. ‘इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’च्या माध्यमातून या प्रजातींना नामशेष होण्यापासून वाचवता येईल आणि त्यांच्यासाठी सुरक्षित व निरोगी निसर्गयंत्रणा तयार करता येईल.

स्थलांतरणात ‘इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’ समन्वय कसा साधणार?

मार्जार कुळातील वन्यप्राण्यांच्या स्थलांतरणात ‘इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’ समन्वय साधणार आहे. सप्टेंबर २०२२मध्ये नामिबियाहून भारतात आठ चित्ते स्थलांतरित करण्यात आले. तर फेब्रुवारी २०२३मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात १२ चित्ते स्थलांतरित करण्यात आले. भारतातून चित्ता पूर्णपणे नामशेष झाल्यानंतर तब्बल सात दशकांनंतर भारतात चित्ता परतला. आता कंबोडियातून वाघ पूर्णपणे नामशेष झाल्यानंतर भारतातून वाघ कंबोडिया येथे पाठवण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. जगातील ८० टक्केंपेक्षा जास्त वाघ भारतात असल्यामुळेच स्थलांतरणाचे हे पाऊल उचलण्यात आले आहे. या जागतिक संघटनेमुळे स्थलांतरणाच्या प्रयत्नांना गती येईल.

मार्जार कुळातील प्राण्यांची सद्यःस्थिती काय?

सिंह सध्या धोक्यात नसले तरीही योग्य संवर्धनाच्या प्रयत्नाअभावी त्यांची संख्या कमी होऊ शकते. भारत, नेपाळ, भूतान, रशिया आणि चीनमध्ये वाघांची संख्या स्थिर आहे किंवा वर्षानुवर्षे घटल्यानंतर वाढत आहे. बर्फाळ बिबट्यांची संख्या कमी होत आहे. सुमारे १८ देशांमध्ये जग्वार आढळतात. वाघांप्रमाणे त्यांनाही जगण्यासाठी मोठ्या अधिवासाची आवश्यकता आहे. चित्ता ही प्रजाती भारतातून नाहीशी झाली. आफ्रिकेतील त्यांच्या ऐतिहासिक श्रेणीतील ७६ टक्के चित्ते त्यांनी गमावले आहेत. मार्जार कुळातील या प्राण्यांसह पर्वतीय सिंह अशी ओळख असणाऱ्या प्युमा तसेच बिबट्या या प्राण्यांनाही मानव-वन्यजीव संघर्ष, अधिवासावरील अतिक्रमण, खंडित अधिवास, जंगलतोड, तस्करी, शिकारीचा धोका आहे.

जगभरात मार्जारकुळातील प्राण्यांची संख्या किती?

आययूसीएनच्या (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर) अंदाजानुसार २३ हजार ते ३९ हजार सिंह जंगलात राहतात. ही संख्या कमी होत असल्याने २० हजारांच्या आसपास होऊ शकते. जगभरात ३,७०० ते ५००० वाघ जंगलात राहात होते. आता ही संख्या स्थिर आहे. तज्ज्ञांच्या मते जंगलात ४००० ते ६,५०० हिमबिबटे आहेत. डब्ल्यूडब्ल्यूएफच्या (वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड) अंदाजानुसार जागतिक पातळीवर जग्वारची संख्या एक लाख ७३ हजार आहे. चित्त्यांची संख्या १५ हजारवरून सात हजारपेक्षा कमी झाली आहे. भारतातून ही प्रजाती आठ दशकांपूर्वीच नामशेष झाली आहे. प्युमाची प्रजनन संख्या ५० हजार असून ती कमी होत आहे. जगभरात दोन लाख ५० हजार बिबटे अस्तित्वात आहे. तर भारतात ही संख्या १३ हजारच्या आसपास आहे.

rakhi.chavhan@expressindia.com

Story img Loader