राखी चव्हाण
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारत जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, पण स्वित्झर्लंडमधील हवा गुणवत्ता तपासणाऱ्या ‘आयक्युएयर’ने केलेल्या सर्वेक्षणानंतर या वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या सर्वेक्षणानुसार बांगलादेश आणि पाकिस्तानपाठोपाठ भारत हा जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे. ‘वर्ल्ड एअर क्वॉलिटी रिपोर्ट २०२३’ च्या निष्कर्षांनुसार १३४ देशांच्या यादीत भारत प्रदूषित हवेच्या निकषांवर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याशिवाय जगभरातील सर्वाधिक प्रदूषित ५० शहरांमध्ये एकट्या भारतातील ४२ शहरांचा समावेश आहे.
प्रदूषण मोजण्यासाठी कोणती मापके?
जगभरातील प्रदूषणाची माहिती गोळा करण्यासाठी १३४ देशांमधील सात हजार ८१२ ठिकाणी तब्बल ३० हजार हवा गुणवत्ता मापक स्थानके उभारण्यात आली. तर हवेचा दर्जा तपासण्यासाठी पीएम २.५ म्हणजेच अतिसूक्ष्म धुळीच्या कणांचे प्रमाण हे मापक म्हणून वापरण्यात आले. त्यानुसार भारतात प्रत्येक क्युबिक मीटर क्षेत्रात ५४.४ मायक्रोग्रॅम पीएम २.५ चे केंद्रीकरण झाल्याचे निदर्शनास आले. बांगलादेशमध्ये हे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच ७९.९ मायक्रोग्रॅम प्रतिक्युबिक मीटर, तर त्यापाठोपाठ पाकिस्तानमध्ये हे प्रमाण ७३.७ मायक्रोग्रॅम प्रतीक्युबिक मीटर इतके आढळून आले.
आणखी वाचा- विश्लेषण : स्मृती मनधानाचे ‘डब्ल्यूपीएल’मधील यश भारतीय क्रिकेटसाठी का महत्त्वाचे?
२०२३ च्या तुलनेत २०२२ची स्थिती काय होती?
२०२२ मध्ये भारत सर्वाधिक प्रदूषित देशांच्या यादीत आठव्या क्रमांकावर होता. २०२२ या वर्षात भारतात पीएम २.५ म्हणजेच अतिसूक्ष्म धुळींच्या कणांचे प्रमाण ५३.३ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर नोंदवले गेले. तर आता २०२३ च्या यादीत भारत आठव्या क्रमांकावरुन तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. प्रदूषणाच्या बाबतीत १३४ देशांपैकी तिसरा क्रमांक हे चित्र अतिशय वाईट आहे. २०२३ मध्ये पीएम २.५ म्हणजेच अतिसुक्ष्म धुळींच्या कणांचे प्रमाण ५४.४ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतके नोंदवण्यात आले.
कोणत्या शहरांना इशारा?
या अहवालातून दक्षिण आशियाई शहरांसाठी इशारा देण्यात आला आहे. आयक्युएयरचे मुख्य कार्यकारी अधिकारी फ्रँक हेम्स यांच्या मते स्वच्छ, निरोगी आणि टिकाऊ वातावरण हा सार्वत्रिक मानवी हक्क आहे. मात्र, अहवालातीन निष्कर्षातून दक्षिण आशियातील शहरांसाठी इशारा देण्यात आला आहे. त्यांच्या मते प्रदूषणाला आळा घालण्यासाठी डिझेल-पेट्रोल वाहनांचे प्रमाण टप्प्याटप्प्याने कमी केले पाहिजे. यासोबतच सायकल आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित ट्रॅक बांधणेही या दिशेने परिणामकारक ठरू शकते.
वायू प्रदूषणामुळे कोणते आजार?
वायू प्रदूषणामुळे अनेक प्रकारचे आजार उद्भवू शकतात. त्यापैकी दमा, डोळ्यांची जळजळ आणि त्वचेची सामान्य समस्या आहे. प्रदूषणाच्या अतिसंसर्गामुळे डोळ्यात जळजळ होणे, डोळ्यात पाणी येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला येणे अशा अनेकांना त्रास होतो. याशिवाय लहान मुलांमध्ये न्यूमोनियाची समस्या वाढते. यासोबतच हृदय आणि फुप्फुसांशी संबंधित आजार, स्ट्रोक, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, ब्रॉन्कस आणि फुप्फुसाचा कॅन्सर, गंभीर दमा आणि लोअर रेस्पीरेटरी इन्फेक्शनचा धोका असतो.
आणखी वाचा- पाकिस्तानने चोरला भारताचा बासमती तांदूळ; परिस्थिती खरंच किती चिंताजनक?
वायू प्रदूषणामुळे दरवर्षी किती मृत्यू?
वायू प्रदूषणामुळे दरवर्षी ७० लाख लोकांचा मृत्यू होतो. पीएम २.५ म्हणजेच अतिसूक्ष्म धुळींच्या कणामुळे दमा, कर्करोग, पक्षाघात आणि फुप्फुसांचे आजार यासह अनेक आजार होऊ शकतात. १३४ देशांतील ७,८१२ शहरांमधील हवेच्या गुणवत्तेच्या डेटाचे विश्लेषण करून स्वित्सर्लंडची संघटना असणाऱ्या आयक्युएयरने हा अहवाल तयार केला आहे.
वायू प्रदूषण वाढण्यामागील कारणे काय?
कार, ट्रक आणि इतर वाहने कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड आणि पार्टिक्युलेट मॅटर यांसारखे प्रदूषक उत्सर्जित करतात. तर उंच इमारतींच्या बांधकामामुळे वायू प्रदूषणातही भर पडते. सिमेंटसारख्या बांधकाम साहित्यातील हानिकारक कण थेट हवेत मिसळतात. वायू प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण औद्योगिक उपक्रम आहेत. कारखाने आणि उत्पादन संयंत्रे प्रदूषक उत्सर्जित करतात. पीक जाळणे, कीटकनाशके वापरणे आणि पशुधनाची शेती हवेत अमोनिया आणि मिथेन सोडते. हवेला प्रदूषित करणारे हे सर्वात धोकादायक वायू आहेत. खाण प्रक्रियेदरम्यान, यंत्रांच्या मोठ्या तुकड्यांचा वापर करून पृथ्वीच्या खाली असलेली खनिजे काढली जातात. खाणकाम करताना सोडण्यात येणारी धूळ आणि रसायने केवळ हवाच प्रदूषित करत नाहीत तर आसपासच्या भागात राहणारे कामगार आणि लोकांचे आरोग्यदेखील बिघडवतात. जंगलतोडीमुळे वायू प्रदूषणाच्या समस्येत भर पडत आहे. वनांचे नुकसान झाल्यामुळे ग्रहाची कार्बन डायऑक्साइड शोषण्याची क्षमता कमी होते.
rakhi.chavhan@expressindia.com