वर्ल्ड गोल्ड कौन्सिलतर्फे भारतीय सोने बाजाराच्या सखोल विश्लेषणात्मक अभ्यासाचा भाग म्हणून ‘गोल्ड रिफायनिंग अॅण्ड रिसायकलिंग’ हा अहवाल आज सादर केला. भारतातील सोन्याची वाढती मागणी लक्षात घेता पुनर्वापर हा यापुढेही महत्त्वाचा मुद्दा असेल आणि काही काळानंतर आता स्थिरतेकडे वाटचाल करणाऱ्या रिफायनिंग क्षेत्रातही स्थिर गतीने प्रगती होईल, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत भारतातील गोल्ड रिफायनिंग उद्योगाने लक्षणीय प्रगती अनुभवली आहे. सध्या भारत सोने पुनर्वापरात जगात चौथ्या क्रमांकावर आहे. २०१३ ते २०२१ या काळात भारतातील गोल्ड रिफायनिंगची क्षमता १५०० टनांनी (५०० टक्के) वाढली आहे. इतकेच नाही, मागील पाच वर्षांत देशातील एकूण सोन्याच्या पुरवठ्यातील ११ टक्के सोने ‘जुन्या सोन्या’तून आले आहे. सोन्याचा बदलणारा दर, भविष्यात दर वाढण्याचा अंदाज आणि व्यापक वित्तीय दृष्टिकोन यामुळे हा बदल दिसून येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा