भारतातून परदेशात पाठविण्यात आलेल्या खाद्यवस्तू नाकारण्यात आल्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. सिंगापूर आणि हाँगकाँगने भारतीय मसाल्यांमध्ये कीटकनाशकाचे अंश आढळल्याने ते नाकारले होते. यावरून मोठा गदारोळ झाला होता. आता भारताने परदेशातून आलेली फळे, सुपारी, बिगरमद्य पेये यासह अनेक खाद्यवस्तू नाकारल्या आहेत. यामुळे या खाद्यवस्तू नाकारण्याची चर्चा सुरू झाली आहे. भारतीय मानकांनुसार या खाद्यवस्तू योग्य नसल्याने त्या नाकारण्यात आल्या आहेत. त्यात खाद्यवस्तूंची गुणवत्ता आणि त्यातील घटक या मुख्य गोष्टी आहेत. प्रत्येक देशातील खाद्यवस्तूंचे निकष वेगवेगळे असल्याने अनेक देश असे निर्णय घेतात. भारतीयांना मिळणाऱ्या खाद्यवस्तू सुरक्षित असाव्यात, या हेतूने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

कोणत्या पदार्थांना नकार?

भारताने नाकारलेल्या पदार्थांमध्ये सफरचंद, सुपारी, बिगरमद्य पेय आणि सुशी नोरी (समुद्री गवत) यांचा समावेश आहे. श्रीलंका, बांगलादेश, जपान, चीन आणि तुर्कीये या देशांतून हे पदार्थ आयात करण्यात आले होते. अन्न सुरक्षा व मानके (आयात) नियमनानुसार भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाला (एफएसएसएआय) खाद्यवस्तूंबाबत धोक्याचा इशारा देण्याचा अधिकार आहे. भारतात १०० हून अधिक देशांतून खाद्यवस्तू आयात केल्या जातात. श्रीलंकेतून आलेले वेलदोडे आणि सुपारी नाकारण्यात आली आहे. वेलदोडा आयातीस पूर्वपरवानगी नसताना ती करण्यात आली होती आणि सुपारी खराब असल्याने ती नाकारण्यात आली. याचबरोबर तुर्कीयेतून आलेले सफरचंद त्यांचे आयुर्मान कमी असल्याने नाकारण्यात आले. चीनमधून आलेली बिगरमद्य पेये नाकारण्यात आली. कारण त्यातील पीएच मूल्य कमी होते. तसेच, चीनमधून आलेले सुशी नोरी त्यात धातू आणि आर्सेनिकचा अंश असल्याने नाकारण्यात आली. बांगलादेशातून आलेली सुपारी आणि जपानमधून आलेल्या टीबॅग नाकारण्यात आल्या आहेत.

Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
40 years of the bhopal gas tragedy
३८०० मृत्यू, २० हजार बाधित… सर्वांत भीषण औद्योगिक दुर्घटना नि कोणालाच अटक नाही… भोपाळ वायूगळतीची ४० वर्षे!
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
South Korea could become the first country to disappear from Earth
‘हा’ देश होणार पृथ्वीवरून गायब? कारण काय?
Rabi sowing in the country is on 428 lakh hectares
देशातील रब्बी पेरण्या ४२८ लाख हेक्टरवर; जाणून घ्या, देशभरातील पीकनिहाय पेरणी क्षेत्र
gold reserves, Dhanteras gold, gold storage, RBI, england
विश्लेषण : १०२ टन सोने इंग्लंडकडून भारताकडे… रिझर्व्ह बँकेच्या ‘सोने वापसी’ निर्णयामागे काय कारण?

हेही वाचा >>> अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’मधील स्त्री वेशातील लूक आहे प्राचीन प्रथेचा भाग; काय आहे गंगामा जतारा उत्सव?

कारणे काय?

खाद्यवस्तू नाकारण्यामागे अनेक कारणे असतात. त्यात खाद्यवस्तू खाण्यास सुरक्षित आहे का, हा निकष प्रामुख्याने असतो. त्यानंतर त्याची गुणवत्ता हा तेवढाच महत्त्वाचा निकष असतो. खाद्यवस्तूंचे वेष्टन, त्यावरील तपशील आणि कागदपत्रे यांची तपासणी केली जाते. खाद्यवस्तूतील घटक आणि त्याचा जाहीर केलेला तपशील बरोबर असावा लागतो. त्यातून भारतातील निकषानुसार या खाद्यवस्तू योग्य आहेत की नाही, हे पडताळून पाहिले जाते. खाद्यवस्तूंमध्ये कीटकनाशक, धातू, रंगद्रव्यांचा अंश योग्य मर्यादेत आहे की नाही, हेही पाहिले जाते. खाद्यवस्तूंची गुणवत्ता तपासताना त्यातील आर्द्रता, चरबीचे प्रमाण या बाबीही महत्त्वाच्या ठरतात.

हेही वाचा >>> राज्यात आता दुचाकी चालकाप्रमाणेच सहप्रवाशासही हेल्मेटसक्ती…अंमलबजावणी कधीपासून? निर्णयामागे कारण काय?

तपासणी कशी होते?

एफएसएसएआयची तपासणीची त्रिस्तरीय पद्धत आहे. त्यात सर्वप्रथम आयात खाद्यवस्तूंच्या कागदपत्रांची छाननी केली जाते. त्यानंतर त्या वस्तूंचे नमुने गोळा केले जातात. या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. या त्रिस्तरीय पद्धतीतून आयात होणाऱ्या खाद्यवस्तूंची गुणवत्ता तपासली जाते. त्यात हे पदार्थ योग्य न आढळल्यास ते नाकारले जातात. देशात आयात होणाऱ्या खाद्यवस्तूंची सुरक्षा आणि गुणवत्ता याची जबाबदारी एफएसएआयवर आहे. देशात खाद्यवस्तूंचा प्रवेश होणाऱ्या शंभरहून अधिक बंदरात एफएसएसएआयचे अधिकारी ही जबाबदारी पार पाडत असतात. परदेशी व्यापार संचालनालय खाद्यवस्तूच्या आयातीला मंजुरी दिल्यानंतर त्यांच्या तपासणीची प्रक्रिया हे अधिकारी पार पाडतात.

मर्यादा कोणत्या?

देशातील शंभरहून अधिक बंदरातून आतमध्ये प्रवेश करणाऱ्या खाद्यवस्तू सुरक्षित असाव्यात, यासाठी प्रत्येक खाद्यवस्तूंचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. मात्र, प्रत्येक बंदराच्या ठिकाणी तपासणीसाठी प्रयोगशाळा नसते. तिथे मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत हे नमुने पाठविण्यात येतात. तपासणी अहवाल येईपर्यंत या खाद्यवस्तू त्याच बंदरात अडकून पडतात. यामुळे खाद्यवस्तूंच्या आयातीसाठी बंदरांची संख्या मर्यादित करण्यात आली आहे. त्यातून तपासणी अधिक प्रभावीपणे होते. मात्र, ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने तिला होणारा विलंब कमी करण्याचे आव्हान आहे.

पुढील प्रक्रिया काय?

एफएसएसएआयच्या खाद्यवस्तू आयात नकार इशारा (एफआयआरए) संकेतस्थळावर याची माहिती दिली आहे. त्यात या वस्तूंसह त्या कोणत्या देशातून आल्या त्यांचीही नावे देण्यात आली आहेत. या संकेतस्थळावरील इशाऱ्याच्या आधारे संबंधित देशांतील यंत्रणा तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करू शकतात आणि खाद्यवस्तू व्यापारातील पारदर्शकता कायम ठेवू शकतात. विशेष म्हणजे भारताने गेल्या दोन वर्षांत दीड हजारांहून अधिक खाद्यवस्तूंची आयात नाकारली आहे. याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर खाद्यवस्तूंच्या आयातीबाबत देण्यात येणाऱ्या इशाऱ्यांवरही बारकाईने लक्ष ठेवण्याची जबाबदारी एफएसएसएआयकडे असते. त्यातून भारतीयांना सुरक्षित खाद्यपदार्थ मिळण्याची हमी मिळते.

sanjay.jadhav@expressindia.com