पर्वतीय क्षेत्रातील युद्धासाठी विक्रमी वेळेत विकसित केलेला झोरावर हा वजनाने हलका रणगाडा अंतर्गत चाचण्या पूर्ण होऊन आता सीमावर्ती भागातील चाचण्यांसाठी सज्ज झाला आहे.

झोरावरची निर्मिती कशी झाली?

पूर्व लडाखमध्ये भारत-चीनचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले असताना सरकारने हलक्या वजनाच्या स्वदेशी रणगाड्याची रचना व विकासाला मान्यता दिली होती. त्यानंतर अवघ्या २४ महिन्यांच्या आत संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) आणि एल. अॅण्ड टी. या खासगी उद्याोगाने झोरावरचा आद्या नमुना विकसित केला. प्राथमिक चाचणीत सुचविलेल्या सुधारणा केल्यानंतर नुकतीच गुजरातमधील हजरा येथे झोरावरची अंतर्गत चाचणी पार पडली. भारतीय लष्करात हलक्या वजनाच्या रणगाड्यांच्या सहा रेजिमेंट तयार करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी टप्प्याटप्प्याने ३५० रणगाडे खरेदी करण्यात येणार आहेत. प्रारंभी लष्कराने ५९ रणगाड्यांची मागणी नोंदविली आहे.

book review Navi Pidhi Navya Vata book by Prakash Amte
पुढच्या पिढीची कर्तबगारी!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Pakistan professor claims India is developing Surya missile
अर्धी पृथ्वी टप्प्यात येईल असे ‘सूर्या’ क्षेपणास्त्र भारताकडे खरेच आहे का? पाकिस्तानी तज्ज्ञाचा दावा काय?
onion crisis in maharashtra loksatta analysis how long shortage of onion remain in india
विश्लेषण : कांद्याचा तुटवडा का आणि किती दिवस?
midc conversion land in thane belapur belt for residential complexes
नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातीलही भूखंड खासगी विकासकाकडे!
semiconductor technology to china
चिप-चरित्र: चिनी धोरणसातत्याची फळे!
mmrda squad action on three warehouse of sneha patil after file nomination as a independent candidate
स्नेहा पाटील यांच्या बंडखोरीनंतर गोदामांवर कारवाई
लेख: भारत-चीन समझोता की डावपेच?

वैशिष्ट्ये काय?

झोरावर हा २५ टन वजनाचा पहिला रणगाडा आहे, ज्याची रचना व विकास अल्पावधीत होऊन चाचणीसाठी तयार करण्यात आला. लष्कराकडील सध्याच्या रणगाड्यांच्या तुलनेत त्याचे वजन निम्म्याहून अधिकने कमी आहे. त्यामुळे डोंगरावरील चढाई असो की, नद्या वा अन्य जलस्राोत असो, तो तुलनेत अगदी सहजपणे पार करू शकतो. रशिया-युक्रेन युद्धाचा धडा घेऊन झोरावर मानवरहित विमाने (यूएव्ही) आणि ‘लोइटरिंग’ युद्धसामग्रीने सुसज्ज आहे. रणगाड्याच्या संरक्षणासाठी ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. स्थिर व उडणारे लक्ष्य शोधून त्यावर हल्ला चढविण्याची क्षमता त्यास प्राप्त होते. नवीन रणगाडा हा रणगाडे, चिलखती वाहने, यूएव्ही आणि मार्गदर्शित क्षेपणास्त्र युद्धसामग्री लक्ष्य करण्यास सक्षम असणे आवश्यक असल्याची लष्कराची अपेक्षा होती. अत्याधुनिक शस्त्रसामग्री व प्रणालींनी सुसज्ज झोरावर ती पूर्ण करण्यास सक्षम असल्याचे मानले जाते. लडाख आणि पश्चिम तिबेटमध्ये सशस्त्र कारवायांचे नेतृत्व करणारे १९ व्या शतकातील डोगरा जनरल झोरावर सिंग यांच्या नावावरून त्याचे नामकरण झाले आहे.

हेही वाचा >>> संगीत ऐकणे, हुक्का पिणे आणि महिलांच्या सजण्यावरही बंदी; अफगाणिस्तानमध्ये नक्की घडतंय तरी काय?

चीन सीमेवर आवश्यकता का?

भारत-चीन दरम्यान जवळपास चार हजार किलोमीटरची भूसीमा असून यातील बहुतांश उत्तुंग पर्वतीय क्षेत्र आहे. या भागात चीनने मोठ्या संख्येने आपले हलके रणगाडे तैनात केले आहेत. लडाखमधील संघर्षात भारतीय सैन्याने वजनदार टी – ९०, टी – ७२ रणगाडे या क्षेत्रात नेले. सीमेवरील भौगोलिक स्थितीत भारतीय लष्करास हलक्या वजनाचे, डोंगरावर सहजपणे चढाई करतील आणि पाण्यातूनही मार्गक्रमण करतील, अशा उभयचर रणगाड्यांची आवश्यकता आहे. सध्याचे ५० ते ६८ टन वजनी रणगाडे जलदगतीने आघाडीवर तैनात होऊ शकत नाहीत. त्यांची विमानाने वाहतूक शक्य नसते. चिनी रणगाड्यांचा मुकाबला करण्यासाठी अतिउंच क्षेत्रात जलद तैनाती व हालचालींची क्षमता राखणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या वजनाने हलक्या रणगाड्याचा प्रस्ताव मांडला गेला होता.

भारतात कधीपर्यंत येणार?

झोरावरची कार्यक्षमता आता वेगवेगळ्या भूप्रदेशांत आणि हवामानात जोखली जाईल. लष्कराच्या समन्वयाने हा रणगाडा वाळवंटी प्रदेश आणि लडाखसारख्या उत्तुंग क्षेत्रात चाचणीसाठी नेण्यात येणार आहे. कडाक्याच्या थंडीत कामगिरीचे अवलोकन होईल. विविध पातळीवरील चाचण्या पूर्ण होण्यास एक ते दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे. सर्व काही योग्य प्रकारे पार पडले तर २०२७ पर्यंत हा रणगाडा भारतीय सैन्यात समाविष्ट होईल, असा विश्वास डीआरडीओचे प्रमुख अध्यक्ष डॉ. समीर कामत यांना आहे.

हेही वाचा >>> मुस्लीम महिला पतीकडे मागू शकतील पोटगी; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक का आहे? याविषयी पूर्वी कायद्यात काय होते?

रणगाड्यांचे महत्त्व काय?

जबरदस्त प्रहारक क्षमता, आव्हानात्मक भूप्रदेशात गतिशीलतेने कारवाई यामुळे रणगाडे शत्रूला धक्के देत नामोहरम करू शकतात. त्यामुळे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांचा विकास होऊनही युद्धभूमीवर आजही रणनीतीसाठी त्यांचे महत्त्व अबाधित राहिलेले आहे. भूभाग ताब्यात घ्यायचा असेल किंवा एखाद्या शहर वा विशिष्ट प्रदेशावर प्रभुृत्व सिद्ध करावयाचे असल्यास रणगाडे वापरले जातात, असे निरीक्षण शस्त्रे कशी वापरली जातात, याचे अत्यंत बारकाईने अवलोकन करणारे लष्करी तज्ज्ञ नोंदवितात. गेल्या दोन दशकांत चिनी सैन्याची वेगवेगळ्या भागांतील घुसखोरीचे यापेक्षा वेगळे कारण नाही. सीमेवर मोठ्या संख्येने रणगाडे, चिलखती वाहनांची सज्जता राखणाऱ्या चिनी सैन्याची उत्तुंग पर्वतीय क्षेत्रातील घुसखोरी रोखण्यात आगामी काळात झोरावर महत्त्वाची भूमिका निभावू शकतो.

aniket.sathe@expressindia.com