India Starts iNCOVACC Nasal Vaccines: केंद्र सरकारने इंट्रानेजल व्हॅक्सिनला म्हणजेच नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी बुस्टर डोस म्हणून नाकावाटे दिली जाणारी ही लस देता येणार आहे. चीनमध्ये नव्याने करोनाची लाट आल्याच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये नाकावाटे लसीकरणाला सुरुवात करण्यात आल्याने वेगाने लसीकरण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नाकावाटे दिली जाणारी लस कशी काम करते आणि ती कुठे मिळणार आहे यासंदर्भात जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाकावाटे विषाणू करतो शरीरात प्रवेश

नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीमुळे विषाणू जिथून शरीरामध्ये प्रवेश करतो तिथेच ही नेजल व्हॅक्सिन परिणामकारक ठरणार आहे. म्हणजेच विषाणू नाकावाटे शरीरामध्ये प्रवेश करण्याआधीच थांबवण्याचे प्रयत्न या लसीच्या माध्यमातून केले जाणार आहे. अनेक वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासामधून विषाणू नेजल कॅव्हिटी म्हणजेच नाकाच्या माध्यमातून शरीरामध्ये प्रवेश करतात आणि नंतर शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचवतात. करोनाचा विषाणू फुफ्फुसांना सर्वाधिक धोका पोहचवतो.

हेही वाचा – नाकावाटे देता येणाऱ्या लसीवर संशोधन सुरू – पंतप्रधान मोदी

सध्या देण्यात येणाऱ्या लसींमध्ये आणि नेजल व्हॅक्सिनमध्ये काय फरक?

सध्या भारत सरकारने करोना लसीकरण मोहिमेसाठी सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी सुरुवातीला परवानगी दिली होती. मात्र या दोन्ही लसी इंटरामस्कूलर म्हणजेच पेशींमध्ये दिल्या जाणाऱ्या लसी आहेत. त्यापेक्षा ही नाकावाटे देण्यात येणारी लस पूर्णपणे वेगळी असल्याचा दावा केला जातोय. तसेच या नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीमुळे लसीकरण आणखीन स्वस्त होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जातेय. तसेच सध्या देण्यात येणाऱ्या सर्व लसी या दोन डोसच्या असल्या तरी ही नेजल व्हॅक्सिन एका डोसची असणार आहे. तसेच या नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीचे दुष्परिणाम कमी असणार आहेत. लसीच्या कुप्या, इंजेक्शन, सुया असा मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा निर्माण होत आहे. नेजल व्हॅक्सिनमुळे या समस्या निर्माण होणार नाहीत…

आणखी वाचा – भारत बायोटेकच्या नेझल लसीची किंमत जाहीर! जाणून घ्या सरकारी आणि खासगी रुग्णालयात किती रुपये मोजावे लागणार

कसा आणि कोणाला घेता येईल हा डोस?

> नकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीमध्ये दोन थेंबांचा डोस दिला जाईल.

> भारतामध्ये तयार करण्यात आलेल्या या इंट्रानेजल व्हॅक्सिनचं नाव एनकोव्हॅक असं आहे.

> या लसीच्या नोंदणीचा पर्याय कोवीन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.

> ही लस भारत बायोटेक कंपनीने निर्माण केलेली आहे.

> सध्या ही लस केवळ खासगी केंद्रांवर उपलब्ध असेल.

> कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या व्यक्तींना ही लस बुस्टर डोस म्हणून घेता येणार आहे.

> हेट्रोलोगस बुस्टींग प्रकारामध्ये देशात सर्वाधिक वापर झालेल्या दोन्ही लसींच्या लाभार्थ्यांना ही नेजल व्हॅक्सिन घेता येणार आहे.

> हेट्रोलोगस बुस्टींगमध्ये लस घेणाऱ्याला व्यक्तीला पहिल्या डोसचीच लस पुन्हा दिली जात नाही. या हेट्रोलोगस बुस्टींगमध्ये बुस्टर लस ही पहिल्या लसीऐवजी वेगळ्या कंपनीची असते.

> सुई किंवा इंजेक्शनच्या माध्यमातून न दिल्या जाणाऱ्या या लसीला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने नोव्हेंबर महिन्यामध्ये आपत्कालीन स्थितीमध्ये वापरण्यास परवानगी दिली होती.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India starts incovacc nasal vaccines where can you get it who can take this everything you need to know scsg