संरक्षण क्षेत्रात भारताने एक मोठा पल्ला गाठला आहे. डीआरडीओने आज स्वदेशी बनावटीच्या पहिल्या अँटी रेडिएशन मिसाइलची यशस्वी चाचणी केली. या क्षेपणास्त्रामुळे भारताची शत्रूवर हवाई हल्ला करण्याची क्षमता कैकपटीने वाढली आहे. या क्षेपणास्त्रामुळे भविष्यात युद्धाची समीकरणं नेमकी कशी बदलू शकतात ते आपण आज समजून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ब्रह्मोस, निर्भय, शौर्य नंतर आता रुद्रम एकची यशस्वी चाचणी

मागच्या काही दिवसांपासून संरक्षण संशोधन विकास संस्था म्हणजे DRDO ने क्षेपणास्त्र चाचण्यांचा सपाटा लावला आहे. ब्रह्मोस, निर्भय, शौर्य या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्यानंतर, डीआरडीओने शुक्रवारी पहिल्यांदाच रुद्रम १ या अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. रुद्रम १ ने आपल्या पहिल्याच चाचणीत ठरवलेले निकष पूर्ण करणं हे फक्त साधसुध यश नाहीय, कारण या क्षेपणास्त्रामुळे भारताची लष्करी, हवाई शक्ती कैकपटीने वाढली आहे.

रुद्रम १ मुळे काय फायदा?
रुद्रम १ हे एक नव्या जनरेशनच अँटी रेडिएशन क्षेपणास्त्र आहे. अँटी रेडिएशन म्हणजे किरणोत्सर्ग विरोधी क्षेपणास्त्र. शत्रूच्या रडाराचे सिग्नल किंवा लहरी पकडून ते रडार उद्धवस्त करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे. भारताकडे अशा प्रकारचं तंत्रज्ञान उपलब्ध असणं, ही चीन-पाकिस्तानसाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे.
भारताने शुक्रवारी या रुद्रम १ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. इंडियन एअर फोर्सच्या सुखोई-३०MKI या फायटर विमानातून हे क्षेपणास्त्र डागता येते. आपल्यावर लक्ष ठेवणारी शत्रूची टेहळणी यंत्रणा, रडार सिस्टिम या क्षेपणास्त्राच्या सहाय्याने उद्धवस्त करता येईल. चाचणीच्यावेळी या क्षेपणास्त्राचा माच २ स्पीड होता. ध्वनीच्या वेगापेक्षा हा दुप्पट वेग आहे.

एअर फोर्सची शक्ती कशी वाढणार ?
डीआरडीओने हे नव्या पिढीचं शस्त्र विकसित केलं आहे. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता ओदिशाच्या किनाऱ्याजवळील बालासोर येथील टेस्ट रेंजवर रुद्रम १ ची चाचणी करण्यात आली. डीआरडीओच्या या यशावर एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने संरक्षण क्षेत्रातील हे खूप मोठ पाऊल असल्याचं म्हटलं आहे. या क्षेपणास्त्रामुळे इंडियन एअर फोर्सकडे शत्रूच्या प्रदेशात खोलवर घुसून, त्यांची हवाई सुरक्षा यंत्रणा उद्धवस्त करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे.

डीआरडीओने विकसित केलेल्या या तंत्रज्ञानामुळे इंडियन एअर फोर्सला भविष्यात कुठल्याही अडथळयाविना आपल्या मोहिमा पार पाडता येतील. रुद्रम १ क्षेपणास्त्र सुखोई-३० एमकेआय या फायटर विमानामध्ये बसवले जाईल. सुखोई हे भारताचे चौथ्या पिढीचे अत्याधुनिक फायटर विमान आहे. युद्ध काळात रशियन बनावटीच्या या विमानांवर भारताची मुख्य भिस्त आहे. फायटर विमान किती उंचीवर उड्डाण करतंय, त्यावर या क्षेपणास्त्राची रेंज अवलंबून आहे. ५०० मीटर ते १५ किलोमीटर उंचीवरुन हे क्षेपणास्त्र डागता येऊ शकतं. २५० किलोमीटरच्या रेंजमध्ये किरणोत्साराचे उत्सर्जन जिथून होतेय, त्या टार्गेटवर प्रहार करु शकते.

रुद्रम १ चं वैशिष्टय म्हणजे हे क्षेपणास्त्र आधी आपलं टार्गेट ठरवतच पण ते डागल्यानंतरही टार्गेटची निवड करु शकतं. रुद्रम १ डागल्यानंतर शत्रूने आपलं स्थान समजू नये, यासाठी रडार यंत्रणा बंद केली, तरी ते टार्गेटवर अचूकतेने प्रहार करण्यास सक्षम आहे.

रुद्रम १ ची अमेरिकेच्या AGM-88 E या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रा बरोबर याची तुलना होऊ शकते. AGM-88 E हे एक अॅडव्हान्स अँटी रेडिएशन क्षेपणास्त्र आहे. अमेरिकन नौदलात २०१७ साली या क्षेपणास्त्राचा समावेश झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिहं यांनी रुद्रम १ च्या यशाबद्दल डीआरडीओच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केलं आहे.