आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची मंगळवारी (३० एप्रिल) घोषणा करण्यात आली. भारतीय संघात फार मोठे बदल पाहायला मिळाले नसले, तरी रिंकू सिंहला केवळ राखीव फळीत स्थान देण्यावरून समाजमाध्यमांवर बरीच चर्चा रंगली आहे. तसेच अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज केएल राहुल आणि ‘आयसीसी’च्या ट्वेन्टी-२० क्रमवारीत संयुक्तरीत्या पाचव्या स्थानी असलेला लेग-स्पिनर रवी बिश्नोई यांना पूर्णपणे डावलण्यात आल्याचे काही प्रमाणात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. निवड समितीच्या या निर्णयांमागे काय कारण असू शकेल, याचा आढावा.

रिंकू सिंहवर अन्याय झाला का?

डावखुऱ्या रिंकूने गेल्या काही काळापासून विजयवीराच्या (फिनिशर) भूमिकेत चमकदार कामगिरी केली आहे. गेल्या दोन ‘आयपीएल’ हंगामांतील यशस्वी कामगिरीनंतर रिंकूला भारतीय संघात संधी मिळाली होती. त्याने या संधीचे सोने करताना ११ ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ८९च्या सरासरी आणि १७६.२३च्या स्ट्राईक रेटने ३५६ धावा केल्या. गेल्या वर्षीच्या अखेरीस त्याने दक्षिण आफ्रिकेत ३९ चेंडूंत नाबाद ६८ धावांची खेळी केली होती. त्यानंतर या वर्षी जानेवारीत अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात त्याने ३९ चेंडूंत नाबाद ६९ धावा केल्या होत्या. या सामन्यात भारतीय संघाची ४ बाद २२ अशी स्थिती झाली होती. त्यानंतर रिंकू आणि कर्णधार रोहित शर्मा (नाबाद १२१) यांनी अप्रतिम फलंदाजी करताना भारताला २० षटकांत २१२ धावांपर्यंत पोहोचवले होते. हा भारताचा अखेरचा ट्वेन्टी-२० सामना होता. या कामगिरीनंतर रिंकूला ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान न मिळणे हे नक्कीच आश्चर्यकारक आहे.

Kho-Kho World Cup Delhi, Kho-Kho ,
विश्लेषण : दिल्लीत चक्क खो-खो विश्वचषक? किती संघ सहभागी? स्पर्धेमुळे या मराठमोळ्या खेळाला संजीवनी मिळेल?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
Jasprit Bumrah : Kapil Dev shoots down 1983 World Cup teammates controversial take on Bumrah's workload
Jasprit Bumrah : ‘बुमराहशी माझी तुलना करू नका…’, वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे वर्कलोड मॅनेजमेंटबाबत मोठं वक्तव्य
Rohit Sharma Practice With Mumbai Ranji Trophy Team at Wankhede Stadium
Rohit Sharma: रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत, हिटमॅनने घेतला मोठा निर्णय; मुंबई संघासह…
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Virat Kohli Didnt Liked Ambati Rayudu Robin Uthappa Reveals 2019 World Cup Team Selection
Robin Uthappa on Virat Kohli: “विराटला तो आवडत नव्हता”, स्फोटक फलंदाजाला २०१९ च्या वर्ल्डकप संघातून वगळण्याबाबत रॉबिन उथप्पाचा मोठा खुलासा
Bumrah may lose out on Test captaincy
कसोटी कर्णधारासाठी दीर्घकालीन पर्यायाची गरज; बुमराच्या क्षमतेवरून निवड समितीमध्येच संभ्रम

हेही वाचा : विश्लेषण : तुमच्या स्मार्टफोनचीही बॅटरी ‘स्लो’ झालीय? हा  कडक तापमानाचा परिणाम असू शकतो…

‘आयपीएल’मधील कामगिरीचा कितपत फटका?

रिंकूला यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये फारशी फलंदाजी मिळालेली नाही. कोलकाता नाइट रायडर्सने पाचव्या-सहाव्या क्रमांकापेक्षा वर खेळण्याची त्याला क्वचितच संधी दिली आहे. याचा निश्चित रिंकूला फटका बसला आहे. यंदाच्या स्पर्धेतील आठ डावांत मिळून रिंकू केवळ ८२ चेंडू खेळला आहे. याचा अर्थ, एका डावात तो सरासरी केवळ १० चेंडू खेळत आहे. तो फलंदाजीला येतो, तेव्हा एक-दोन षटकेच शिल्लक असतात. त्यामुळे त्याला फारसा प्रभाव पाडण्याची संधी मिळालेली नाही. भारतीय संघातील स्थानसाठी त्याच्यात आणि शिवम दुबेमध्ये स्पर्धा होती, असे म्हटले जात आहे. यात चेन्नई सुपर किंग्जसाठी यंदाच्या हंगामात केलेल्या चमकदार कामगिरीचा दुबेला फायदा झाला आहे. त्याने या हंगामातील नऊ सामन्यांत मिळून २०३ चेंडू खेळले असून यात ३५० धावा केल्या आहेत. त्याने एकूण २६ षटकार आणि २४ चौकारांची आतषबाजी केली आहे. याउलट रिंकूला नऊ चौकार आणि सहा षटकारच मारता आले आहेत. तसेच दुबे मध्यम गती गोलंदाजही असल्याने त्याला पसंती मिळाल्याची शक्यता आहे.

राहुलला संघात स्थान का नाही?

रिंकूची केवळ राखीव खेळाडूंत निवड, यासह केएल राहुलला ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान न मिळाल्याबाबतही बरीच चर्चा होत आहे. यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना पसंती देण्यात आली आहे. पंतचे भारतीय संघातील स्थान जवळपास निश्चित मानले जात होते. दुसऱ्या यष्टिरक्षकाच्या स्थानासाठी सॅमसन आणि राहुल शर्यतीत होते. अखेरीस मधल्या षटकांत फिरकीपटूंविरुद्ध आक्रमक शैलीत खेळण्याच्या क्षमतेमुळे सॅमसनला झुकते माप मिळाल्याची शक्यता आहे. राहुल डावाच्या सुरुवातीला वेळ घेतो. तसेच ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये मधल्या फळीत तो फारसा खेळलेला नाही. आघाडीच्या फळीत भारताकडे रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल आणि सूर्यकुमार यादव यांसारखे फलंदाज आहेत. त्यामुळे तेथेही राहुलला फारशी संधी नाही. याच कारणास्तव, त्याची निवड झाली नाही असे मानले जात आहे.

हेही वाचा : विश्लेषण : उत्तराखंडमधील वणवा आटोक्यात का येत नाही? वणव्यांची समस्या जगभर उग्र का बनतेय?

बिश्नोईला का वगळण्यात आले?

केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सकडून ‘आयपीएल’मध्ये खेळणाऱ्या लेग-स्पिनर रवी बिश्नोईलाही भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. बिश्नोई सध्या जागतिक ट्वेन्टी-२० क्रमवारीत गोलंदाजांमध्ये संयुक्त पाचव्या स्थानावर आहेत. त्याने भारताकडून २४ ट्वेन्टी-२० सामन्यांत ३६ बळी मिळवले आहेत. मात्र, यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामातील साधारण कामगिरीमुळे त्याला वगळण्यात आल्याची शक्यता आहे. भारताची संघनिवड होण्यापूर्वी त्याला यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये नऊ सामन्यांत केवळ पाच बळी मिळवता आले. त्यातच राजस्थान रॉयल्ससाठी खेळणाऱ्या यजुवेंद्र चहलने ९ सामन्यांत १३ गडी बाद केले आहेत. त्यामुळेच लेग-स्पिनर म्हणून चहलला पसंती देण्यात आली आहे.

अन्य कोणत्या खेळाडूंची नावे चर्चेत होती?

‘आयपीएल’मधील चमकदार कामगिरीमुळे रियान पराग, अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा हे फलंदाज, तसेच मयांक यादव, टी. नटराजन आणि संदीप शर्मा यांसारख्या वेगवान गोलंदाजांची नावे चर्चेत होती. परंतु, निवड समितीने विश्वचषकासाठी अनुभवी खेळाडूंनाच प्राधान्य दिले आहे. या ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर होणाऱ्या मालिकांसाठी मात्र युवा खेळाडूंचा विचार होण्याची दाट शक्यता आहे.

Story img Loader