– ऋषिकेश बामणे

चीनमधील हांगझो आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होणार, हे निश्चित असले तरी भारतीय पुरुष आणि महिला संघाच्या या स्पर्धेतील समावेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याच्या हेतूने हे पाऊल महत्त्वाचे आहे. मात्र दर्दी क्रिकेटप्रेमींसाठी ओळखल्या जाणाऱ्या भारतानेच या स्पर्धेत न खेळवण्याचे ठरवले, तर चाहत्यांचा भ्रमनिरास होईल. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेदरम्यानच भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर असेल. दुसरीकडे ऑक्टोबरमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक रंगणार असल्याने भारतीय पुरुष संघातील खेळाडूसुद्धा आशियाई स्पर्धेत सहभागी होण्याची जोखीम पत्करतील, याची शक्यता कमी आहे. पण भारताचा दुय्यम संघ दोन्ही विभागांमध्ये पाठवण्याइतपत गुणवत्ता आपल्याकडे नक्कीच आहे. या पार्श्वभूमीवर आशियाई आणि तत्सम स्पर्धांविषयी बीसीसीआयची उदासीनता ठळकपणे जाणवणारी आहे.

Rohit Sharma To Open in MCG Test Confirms India Assistant Coach Abhishek Nayar IND vs AUS
IND vs AUS: रोहित शर्मा मेलबर्न कसोटीत कितव्या क्रमांकावर फलंदाजी करणार? अखेर गूढ उकललं; कोचने दिले मोठे अपडेट
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Virat Kohli Will Face Banned or Fined Over Sam Konstas On Field Controversy ICC Rules E
IND vs AUS: विराट कोहलीवर एका सामन्याची बंदी की दंडात्मक कारवाई? कोन्स्टासबरोबरच्या धक्काबुक्कीचा काय होणार परिणाम, वाचा ICCचा नियम
IND vs AUS Boxing Day Test Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls
IND vs AUS : १९ वर्षीय खेळाडूने जसप्रीत बुमराहविरुद्ध केला मोठा पराक्रम, ११४५ दिवसांनी मोडला खास विक्रम
IND vs AUS boxing day test 2024
IND vs AUS : रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! ‘या’ स्टार खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून दाखवला बाहेरचा रस्ता
Pakistan become 1st team to whitewash South Africa at home in ODI bilaterals PAK vs SA
PAK vs SA: पाकिस्तान संघाने एकतर्फी मालिका विजय मिळवत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच संघ
Travis Head Injury Update Suffers Groin Injury in Gabba Test
IND vs AUS: ट्रॅव्हिस हेड मेलबर्न कसोटीत खेळणार नाही? गाबा कसोटीत झाली होती दुखापत, स्वत: दिले अपडेट
Rajat Patidar Protest 3rd Umpire Blunder Then Re reversed The Decision and Third Umpire Apologises
SMAT 2024: रजत पाटीदार तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर वैतागला, मैदान सोडण्यास दिला नकार; माफी मागत पंचांनी बदलला निर्णय

क्रिकेटचा आशियाई स्पर्धेत समावेश कधीपासून?

चीनमधील ग्वांगजो येथे २०१०मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत क्रिकेटचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला. या स्पर्धेत प्रत्येकी २० षटकांचे सामने खेळवण्यात येतात. त्यानंतर २०१४मध्ये दक्षिण कोरियात बुसान येथे झालेल्या आशियाई स्पर्धेतही क्रिकेट खेळ समाविष्ट होता. या दोन्ही वेळेस महिलांमध्ये पाकिस्तानने सुवर्णपदक कमावले. तर पुरुषांमध्ये अनुक्रमे बांगलादेश आणि श्रीलंकेने सुवर्णपदकावर नाव कोरले. २०१८मध्ये क्रिकेटला आशियाई स्पर्धेतून वगळण्यात आले. मात्र २०१९मध्ये झालेल्या आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या बैठकीत क्रिकेटचा पुन्हा या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच भारताचे संघही स्पर्धेत प्रथमच सहभागी होतील, असे जाहीर करण्यात आले. १० ते २५ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत एकूण किती संघ सहभागी होतील, हे अद्याप ठरवण्यात आलेले नाही.

भारताला जिंकण्याची सुवर्णसंधी आहे का?

आशियाई स्पर्धेत यंदा भारताचा पुरुष संघ सहभागी झाला, तर दुसऱ्या फळीतील खेळाडूंसह भारत सुवर्ण पदकावर मोहोर उमटवू शकतो. अन्य संघांचे मुख्य खेळाडू यावेळी आंतरराष्ट्रीय मालिकांमध्ये व्यग्र असतील. तसेच भारताप्रमाणे पाकिस्तान, श्रीलंकेचे खेळाडूसुद्धा विश्वचषकापूर्वी या स्पर्धेत खेळण्याची जोखीम पत्करण्याची चिन्हे कमी आहेत. मात्र आशिया खंडातील क्रिकेट देशांत भारताचीच सत्ता सातत्याने सिद्ध झाली आहे. त्यामुळे युवा खेळाडूंच्या साथीने भारत आशियाई स्पर्धा नक्कीच जिंकू शकतो. महिलांच्या गटात मात्र भारताला कडवी झुंज मिळू शकते.

बीसीसीआयची भूमिका काय आहे?

क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होण्याच्या दृष्टीने आशियाई स्पर्धा महत्त्वाची असली तरी आधीच ठरवण्यात आलेल्या द्विराष्ट्रीय मालिकांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी सांगितले. करोनाच्या कालखंडात बीसीसीआयलासुद्धा आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले. तसेच भारताविरुद्धच्या मालिकांद्वारे प्रतिस्पर्धी संघाचाही आर्थिक लाभ होतो. अशा स्थितीत आता आशियाई स्पर्धेत भारताचे संघ सहभागी होणार का, हे पाहणे रंजक ठरेल. बीसीसीआय ही स्वायत्त क्रिकेट संघटना आहे. त्यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या अखत्यारित ही संघटना नाही. पण आयसीसी भविष्यात ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने या स्पर्धेकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय संघ खेळत आहे का?

यंदा बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे तब्बल २४ वर्षांनी पुनरागमन होणार आहे. यापूर्वी १९९८मध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या राष्ट्रकुलमध्ये क्रिकेटचा पहिल्यांदा समावेश करण्यात आला. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला नमवून सुवर्णपदक पटकावले होते. यंदा क्रिकेटमध्ये फक्त महिलांचे संघ सहभागी होत असून २८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेत आठ संघ खेळणार आहेत. ट्वेन्टी-२० प्रकारानुसारच होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारताचा पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि बार्बाडोस यांच्यासह अ-गटात समावेश करण्यात आला आहे, तर ब-गटात इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे संघ आहेत.

Story img Loader