आज प्रत्येकजण भारतीय संघाच्या यशाचं गुणगान गात आहे. मात्र, अॅडिलेड कसोतील मानहानीकारक पराभव पाहिल्यानंतर कोणालाही वाटलं नसेल की हा संघ मालिका जिंकेल…. भारताचा डाव अवघ्या ३६ धावांवर संपुष्टात आला होता. या पराभवानंतर अनेकांनी राग, नाराजी आणि संताप व्यक्त केला. त्यातच उर्वरित सामन्यासाठी कोहलीही अनुपस्थित होता. त्यामुळे नेतृत्वाचा काटेरी मुकूट अजिंक्य रहाणेच्या शिरपेचात रोवण्यात आला. पण त्यानंतर घडला तो खरा इतिहास होय.. म्हणतात ना प्रत्येक ऐतिहासिक गोष्टीतून आपल्याला काही ना काही शिकायला मिळतंच.. तसेच ऑस्ट्रेलियातील या रोमांचक विजयाने अनेक Life Lessons शिकवलेत. याचा दररोज आपल्याला नक्कीच फायदा होईल… तर चला पाहूयात यातून आपण काय शिकलं पाहिजे…

१) दबाव घेऊ नका, कर्तुत्वावर विश्वास ठेवा –
प्रत्येकवेळा अनुभव असणेच गरजेचं नाही. उलट कर्तुत्व असेल तर कशावरही मात करता येते. मॅनेजमेंट गुरु एन रघुरामन म्हणतात की, मी लहान आहे, नवीन आहे, प्रतिस्पर्धी ताकदवर आहे… या गोष्टी विसरुन जा.. आपल्यामध्ये असणारी क्षमता आणि कर्तुत्वाच्या जोरावर कशावर आणि कोणावरही मात करु शकतो. भारतीय संघानेही हेच केलं. रोहित, रहाणे आणि पुजारा वगळता एकाही खेळाडूकडे पुरेसा अनुभव नव्हता…नवख्या खेळाडूंनी कोणताही दबाव न घेता ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.

२) नेतृत्व –
नेतृत्व कसं असावं, हे अजिंक्य रहाणेनं संपूर्ण जगाला दाखवून दिलं. कठीण परिस्थितीत सहकाऱ्यावर ओरड्यापेक्षा किंवा रागवण्यापेक्षा स्वत: समोर येऊन लढा कसा द्यायचा, हे राहणेनं दाखवून दिलं. नेतृत्व करताना शांत आणि संयमीपणे आक्रमक कसं काम करायचं… राहाणेचा हा गुण आपल्याला वैयक्तिक आयुष्ताही कामाला येऊ शकतो..

३) ताकद, विश्वास आणि जबाबदारी
यशस्वी होण्यासाठी स्वत:ची किंवा संघाची ताकद ओळखायला हवी. जी औस्ट्रेलियात रहाणेनं ओळखली होती. त्यानंतर आपल्या सहकाऱ्यावर विश्वास दाखवावा आणि त्यांना योग्य ती जबाबदारी द्यायला हवी. अजिंक्य रहाणेनं शुबमन गिल, ऋषभ पंत, शार्दुल ठाकुर, सिराज, सुंदर यांना विश्वास दिला आणि जबाबदारी शांतपणे समजावली. तसेच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभाही राहिला. त्यामुळे या युवा खेळाडूंनी आपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली.

४) कामाचा आनंद घ्या-
कोणतेही काम करत असाल तर ते एन्जॉय करा. कोणतं काम केल्यानंतर तुम्हाला आनंद मिळतो? ते पाहा… चौथ्या कसोटी सामन्यात पंत फलंदाजीला येण्यापूर्वी भारतीय संघ धावासाठी झगडत असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, पंतनं आपल्याच शैलीत फलंदाजी करत संघाची धावसंख्या वाढवली, अन् विजयीही खेचून आणला. खेळाताना ऋषभ पंत फलंदाजी करत नव्हता तर तो एन्जॉय करत असल्याचं दिसत होतं. आपणही काम करतानाही एन्जॉय केलं पाहिजे.

५) घाबरु नका किंवा अतिउत्साही होऊ नका –
एखादी गोष्ट चांगली झाल्यास उतावळीपणा दाखवू नका किंवा अडचणीत घाबरुनही जाऊ नका. दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावल्यानंतर रहाणेन अतिउत्साहीपणा केला नाही. किंवा तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभव होत असताना घाबरलाही नाही. त्यानं शांतपणे आलेल्या प्रसंगाचा सामना केला. रहाणेनं आपल्या स्वभावानं आक्रमकतेचा अतिशय चांगल्या पद्धतीनं वापर केला. रहाणेच्या नेतृत्वात प्रत्येक खेळाडूंमध्ये विश्वास दिसत होता.

६) अखेरपर्यंत लढत राहा-
कोणत्याही परिस्थितीत पराभव मान्य करु नका, अखेरच्या क्षणापर्यंत लढतच राहा. जोपर्यंत हारत नाही तोपर्यंत तुम्ही अजिंक्यच असता… या दौऱ्यातून ही महत्वाची गोष्ट सर्वांनी शिकायला हवी. तिसऱ्या कसोटी सामन्यात हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी दुखापतीनंतरही अखेरपर्यंत लढा दिला. पळताही येत नव्हत, अशा परिस्थितीत त्यांनी लढा दिला…

७) बॅकअप प्लॅन –
काहीही करत असेल तर प्रत्येकाकडे बॅकअप प्लॅन असायला हवा. कारण प्रत्येकवेळा आपण नियोजन करतो तसं होईल असं नसतं. आपली अनेक समिकरणं बिघडतात. अशा प्रस्थितीत आपला प्लॅन बी तयार हवा. संघातील एकापाठोपाठ एक खेळाडू दुखापतग्रस्त होत असताना रहाणेनं आपला प्लॅन बी… चा वापर करत नवख्या खेळाडूंना विश्वासात घेतलं. सिराज, शार्दुल, सुंदर, पंत यांनी कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला.

८) लढणाऱ्यालाच नशीबाची साथ मिळते –
आपलं लक्ष डोळ्यांसमोर ठेवून तुम्ही लढत नसाल किंवा आपलं काम चोख करत नसाल तर नशीबही साथ देत नाही. भारतीय संघ ज्या पद्धतीनं लढला ते कौतुकस्पद होतं. खेळाडूंच्या अव्वल कामगिरीसोबत त्यांना नशीबाचीही साथ मिळाली होती. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, घरात बसून तुम्हाला नशीबाची साथ मिळणार नाही.

९) टीकाकरांकडे दुर्लक्ष करा –
प्रत्येकांवर टीका होत असते, पण त्याकडे दुर्लक्ष करुन आपण आपं काम चोख बजवालं पाहिजे. भारतीय संघाची मालिका सुरु झाल्यानंतर अनेक खेळाडूंना टिकेचा सामना करावा लगला होता.ऋषभचं उदाहर घ्यायचं झालं तर मेलबर्न कसोटीत गचाळ क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीमुळे अनेकांनी त्याला ट्रोल केलं. पंतने मात्र त्याकडे दुर्लक्ष करत स्वत:वर काम केलं. पंतची ही गोष्ट तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुषाला नवं वळण देईल.

१०) शेवट महत्वाचा –
तुमची सुरुवात कशीही असो, शेवट कसा होतो हे महत्वाचं आहे. अनेकदा तुम्ही कशी सुरुवात केली यापेक्षा शेवट कसा केला, याला महत्व दिलं जातं. ३६ धावांवर सर्वबाद होणारा भारतीय संघ चषकासह भारतात परतत आहे. त्यामुळे सुरुवात कशी होते, त्यापेक्षा शेवट कसा करता हे महत्वाचं आहे.

Story img Loader