अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीयांसाठी वर्षाची सुरुवात अत्यंत निराशेने झाली आहे. गेल्या महिन्यात अमिरिकेत सहा भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी ओहायोमध्ये एकोणीस वर्षीय श्रेयस रेड्डी बेनिगर हा विद्यार्थी मृतावस्थेत आढळून आला. अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांच नेमकं काय होतंय?

दरवर्षी हजारो भारतीय अमेरिकेत स्थलांतरित होतात. भारतीय विद्यार्थ्यांसाठीही अमेरिका हे एक पसंतीचे ठिकाण आहे. पण, मागील आठवड्यात घडलेल्या काही घटनांमुळे अमेरिका नोकरीसाठी स्थलांतरित होण्यासाठी किंवा शिक्षणासाठी किती सुरक्षित आहे? हा प्रश्न उद्भवला आहे. आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवलेल्या पालकांमध्येही या घटनांनी भीती निर्माण केली आहे.

Loksatta lokrang Birth centenary year of Dr Wankhade pioneer of Dalit literary movement
दलित साहित्य चळवळीचे प्रवर्तक
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
student could not bear stress of studying she became depressed and left home
मुलं मुली असे का वागतात? नैराश्य, अभ्यासाचा ताण, चिंता, घर सोडणे…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
10th student commits suicide before pre-examination
पूर्वपरीक्षेपूर्वी दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र
indians want to move abroad indians want opportunity to leave India
भारतीयांना भारत सोडण्याची संधी का हवी असते?

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांच नेमकं काय होतंय?

श्रेयस रेड्डी बेनिगेरी या विद्यार्थ्याचा मृत्यू

ही घटना अगदी ताजी आहे. गुरुवारी श्रेयस रेड्डी बेनिगर या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला. श्रेयस हा ओहायोमधील लिंडर स्कूल ऑफ बिझनेसमधील विद्यार्थी होता. तेथील अधिकाऱ्यांनी या प्रकरणात काही चुकीचे घडले असल्याची शक्यता नाकारली आहे.

ओहायोमध्ये भारतीय विद्यार्थी मृतावस्थेत आढळून आला, अशी माहिती न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने गुरुवारी दिली. “ओहायोमधील भारतीय वंशाचे विद्यार्थी श्रेयस रेड्डी बेनिगेरी याच्या दुर्दैवी निधनाने खूप दुःख झाले,” असे वाणिज्य दूतावासाने ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. “पोलीस तपास सुरू आहे. यात काही चुकीचे घडल्याचा संशय नाही,” असेही वाणिज्य दूतावासाने घटनेचा कोणताही तपशील न देता लिहिले आहे. वाणिज्य दूतावास बेनिगेरी यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. त्यांना शक्य ती सर्व मदत करत आहे, असेही त्यात म्हटले आहे.

जानेवारीमध्ये पाच भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

इंडियाना राज्यातील पर्ड्यू विद्यापीठातील संगणक विज्ञान आणि डेटा सायन्सचा विद्यार्थी नील आचार्य. (छायाचित्र-इंडियन एक्स्प्रेस)

अमेरिकेत विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटना हृदयद्रावक आहेत. गेल्या महिनाभरात अमिरिकेत पाच विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला अमेरिकेत बेपत्ता झालेल्या नील आचार्य याच्या मृत्यूची पुष्टी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी केली होती. त्याच्या आईने आपला मुलगा कुठे आहे? याची एक विनंतीपर पोस्ट शेअर केली, ज्याच्या एका दिवसानंतर मंगळवारी त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली.

इंडियाना राज्यातील पर्ड्यू विद्यापीठातील संगणक विज्ञान आणि डेटा सायन्सचा विद्यार्थी नील आचार्य २८ जानेवारीपासून बेपत्ता होता. त्याची आई गौरी आचार्य यांच्या ‘एक्स’वरील पोस्टनुसार, एका उबेर ड्रायव्हरने इन्स्टिट्यूटमध्ये सोडल्यावर त्याला शेवटचं पहिलं होतं.

मृत्यूचे कारण न सांगता आचार्य याचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आल्याचे पर्ड्यू विद्यापीठाने म्हटले. यात त्यांनी म्हटले आहे की, आचार्य याच्या वर्णनाशी मेळ खाणारा आणि त्याचा आयडी असलेला व्यक्ती रविवारी (२८ जानेवारी) सकाळी १०.३० वाजता कॅम्पसमधील मॉरिस जे झुक्रो लॅबोरेटरीजवळ मृतावस्थेत आढळून आला.

या सर्व मृत्यूंमध्ये सर्वात भयंकर मृत्यू झाला तो विवेक सैनी या विद्यार्थ्याचा. मूळ हरियाणाचा रहिवासी असलेल्या विवेकला १६ जानेवारी रोजी जॉर्जियाच्या लिथोनियामध्ये ५० वेळा हातोड्याने वार करून मारण्यात आले, ज्यात गंभीर जखमी झालेल्या विवेकचा मृत्यू झाला.

२५ वर्षीय विवेक एमबीएचे शिक्षण घेत होता. शिक्षणासोबतच तो अर्धवेळ एका दुकानात कामही करत होता, जिथे ज्युलियन फॉकनर या व्यक्तीला त्याने आश्रय दिला. यासह त्या व्यक्तीला चिप्स, पाणी आणि एक जॅकेटही दिले होते. १६ जानेवारी रोजी विवेकने फॉकनरला मोफत जेवण देण्यास नकार दिला, यामुळे विवेकवर त्या माणसाने जीवघेणा हल्ला केला. या ५३ वर्षीय हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे.

‘एनडीटीव्ही’च्या वृत्तानुसार, महिन्याच्या सुरुवातीला युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय अर्बाना-चॅम्पेनचा आणखी एक भारतीय विद्यार्थी अकुल धवन मृतावस्थेत आढळून आला होता. १८ वर्षीय तरुणाच्या शवविच्छेदनात त्याचा मृत्यू हायपोथर्मियामुळे झाल्याचे सांगण्यात आले. अकुल बेपत्ता झाल्याची तक्रार केल्यानंतर त्याच्या पालकांनी विद्यापीठाच्या पोलिस विभागावर निष्काळजीपणाचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. “हे विचित्र आहे की, एक तरुण मुलगा जो विद्यापीठाच्या केवळ एक मिनिटाच्या अंतरावर थंडीने गारठून मेला, तो सापडला नाही,” असे त्याचे वडील ईश धवन यांनी प्रकाशनाद्वारे सांगितले.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, १५ जानेवारी रोजी दोन भारतीय विद्यार्थी त्यांच्या निवासस्थानी संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळले. दिनेश (२२) हा विद्यार्थी तेलंगणातील वानापर्थीचा रहिवासी होता, तर निकेश (२१) हा विद्यार्थी आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलमचा रहिवासी होता. हे दोघेही महिनाभरापूर्वी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले होते. रूममेट असलेल्या विद्यार्थ्यांचा मृत्यू कसा झाला? हे त्यांच्या कुटुंबीयांना अद्याप माहीत नाही. दिनेशचे नातेवाईक या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यासाठी केंद्र सरकारची मदत घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

अमेरिकेमध्ये विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे सत्र कधी थांबणार?

अमेरिकेमध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या सतत मृत्यूच्या बातम्या येत आहेत. यात दोन सर्वात धक्कादायक घटना म्हणजे, २४ वर्षीय वरुण राज पुचा आणि २३ वर्षीय जान्हवी कंदुला या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू. इंडियानामधील फिटनेस सेंटरमध्ये वरुणवर जिममध्ये जाणाऱ्या सहकाऱ्याने चाकूने हल्ला केला होता. त्याला वरुण विचित्र वाटला म्हणून हल्ला केल्याचे त्याने सांगितले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सिएटल पोलिसांच्या एका वेगवान पोलिस वाहनाने धडक दिल्याने जान्हवीचा मृत्यू झाला. जान्हवीबद्दल हसताना आणि विनोद केल्याच्या पोलिसांची फुटेज व्हयरल झाल्यानंतर भारताने या विषयी कठोर चौकशीची मागणी केली होती. ही दुर्घटना जानेवारीमध्ये घडली. त्याच्या काही महिन्यांनंतर पोलिस अधिकाऱ्यांचा एक व्हिडीओ समोर आला, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, या महिलेच्या जीवनाचे मूल्य मर्यादित होते, म्हणून ती मेली. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला, ज्यावर भारतीयांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

सिएटल पोलिसांच्या एका वेगवान पोलिस वाहनाने धडक दिल्याने जान्हवी कंदुला या विद्यार्थिनीचा मृत्यू. (छायाचित्र-इंडियन एक्स्प्रेस)

आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, २०१८ पासून परदेशात शिकत असलेल्या ४०३ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ३६ जणांचा मृत्यू अमेरिकेत झाला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी डिसेंबर २०२३ मध्ये राज्यसभेत सांगितले. मृत्यूच्या कारणांमध्ये नैसर्गिक आपत्ती, अपघात आणि वैद्यकीय परिस्थितीचा समावेश आहे. परदेशात भारतीय विद्यार्थ्यांना वर्णद्वेषाचा सामना करावा लागतो आणि या द्वेषाच्या गुन्ह्यांचेच हे विद्यार्थी बळी ठरत असल्याचे बोलले जात आहे.

भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षा

२०१७ च्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, यूएसमधील भारतीय विद्यार्थी चिंताग्रस्त आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये अनेकांना स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल आणि तेथील लोकांनी आपल्याला त्यांच्यात सामावून न घेतल्याबद्दल चिंता आहे.

द इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन (आयआयई) या यूएस-आधारित संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात असे सांगण्यात आले की, भारतीय विद्यार्थ्यांना “युनायटेड स्टेट्समधील संभाव्य अभ्यासाबद्दल चिंता आहे. ८० टक्के संस्थांनी या विद्यार्थ्यांना शारीरिक सुरक्षिततेची सर्वात जास्त चिंता असल्याचे सांगितले, तर ३१ टक्के संस्थांनी लोकांनी आपल्याला त्यांच्यात सामावून न घेतल्याबद्दल चिंताग्रस्त असल्याचे संगितले. अभ्यासात असेही सांगण्यात आले आहे की, या चिंतेमुळे काही भारतीय विद्यार्थी इतर देशांकडून आलेल्या प्रवेशाच्या ऑफर स्वीकारतील.

अमेरिकेत वाढलेल्या भारतीय मुलांसाठी हा भेदभाव शाळेपासून सुरू होतो. २०२२ च्या आणखी एका नवीन अभ्यासात असे म्हटले आहे की, प्रीस्कूलच्या सुरुवातीपासूनच भारतीय अमेरिकन लोकांना नियमितपणे वांशिक भेदभावाचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या वैयक्तिक विकासावर याचा परिणाम होतो.

‘टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या अभ्यासानुसार, दुसऱ्या पिढीतील भारतीय-अमेरिकन किशोरवयीन मुले विशेषत: भेदभावाला बळी पडतात आणि त्यांची ओळख तयार करण्याचा संघर्ष करत असतात.”

सप्टेंबर २०२२ मध्ये हिंदू संघटनांनी समुदायाविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याबद्दल सांगितले. ‘एफबीआय’च्या अहवालानुसार यूएसमध्ये २०२२ मध्ये २५ हिंदूविरोधी द्वेषपूर्ण गुन्हे घडले. २०२१ मध्ये ही संख्या १२ होती, तर २०२० मध्ये केवळ ११.

भारतीयांना अमेरिकेचे आकर्षण का?

द इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन (आयआयई) सर्वेक्षणाने यापूर्वी इशारा दिला होती की, भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणात कधीही दुसऱ्या क्रमांकाचा आंतरराष्ट्रीय गट म्हणून पुढे जाऊ शकत नाही. परंतु, तरीही भारतीय अमेरिकेत जात आहेत. २०२२ ते २३ या शैक्षणिक वर्षात अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संख्येत १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे, जी ४० वर्षांच्या काळातील सर्वात मोठी एकल-वर्षाची वाढ आहे, असे स्टेट डिपार्टमेंट आणि आयआयईच्या निष्कर्षांनुसार पुढे आले. नोव्हेंबर २०२३ मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भारतातून येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

अमेरिकन महाविद्यालयांनी भारतातील जवळपास २,६९००० विद्यार्थ्यांची नोंदणी केली. ही नोंदणी संख्या वाढली असून चीननंतर दुसऱ्या क्रमांकाची आहे. यातील बहुतेक जण विज्ञान, तंत्रज्ञानाच्या पदवीधर शिक्षणासाठी आणि व्यवसायासाठी आले होते.

हेही वाचा : अर्थसंकल्प २०२४ : सरकार नील अर्थव्यवस्थेला देणार प्रोत्साहन; नील अर्थव्यवस्था म्हणजे काय? भारतासाठी किती महत्त्वाची?

पीटीआयने दिलेल्या माहितीत, शैक्षणिक देवाणघेवाणीसाठी परराष्ट्र विभागाचे कार्यवाहक उप सहायक सचिव मारियान क्रेव्हन म्हणाले, “अमेरिकेने भारतासोबत शिक्षणावरील मजबूत संबंध कायम ठेवले आहेत, जे मला वाटते की ते आणखी मजबूत होत आहे.” यूएसमध्ये अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी अनेक संधी उपलब्ध होत आहेत. मात्र, त्यांच्या सुरक्षेची चिंता वाढत असून अमेरिकेत विद्यार्थ्यांचे वाढते मृत्यूचे प्रमाण एक गंभीर विषय आहे.